सध्या अॅमेझॉनचे जेफ बेझॉस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
मित्रांनो बेझॉस यांची संपत्ती आहे १४३०० करोड डॉलर्स दुसर्या क्रमांकावर आहेत मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस. बिल गेटस यांची संपत्ती आहे ९३३० करोड डॉलर्स. म्हणजे या दोघांच्या संपत्तीमधील फरक आहे ४९७० करोड डॉलर्स. आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती आहे ४२३० करोड डॉलर्स. याचाच अर्थ जगातील पहिल्या आणि दुसर्या क्रमांकामध्ये जो फरक आहे त्याहूनही कमी संपत्ती मुकेश अंबांनींची आहे. अर्थात या आकड्यांमधील फरक सांगण्यासाठी काही मी ही पोस्ट लिहित नाही आहे मला इथे वेगळाच मुद्दा मांडायचा आहे १. जेफ बेझॉस आणि बिल गेट्स हे दोनीही स्वकर्तुत्वा वर उभे राहिले आहेत. त्या दोघांनीही शून्यापासून सुरुवात केली होती. मुकेश अंबांनीं प्रमाणे त्यांना वडिलोपार्जित व्यवसाय मिळाला नव्हता. तेव्हा माझ्या आई बाबांनी पैसा कमावला नाही म्हणून मला व्यवसाय करता येत नाहीये, किंवा त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो बिझनेस करतोय आणि माझ्याकडे नाही म्हणून मला जमत नाही ही कारणे जगाला आणि मुख्य म्हणजे स्वतःला द्यायची सोडून द्या. २. मुकेश अंबांनी काळाची पाऊले ओळखून बरोबर पुढे जात आहेत. डेटा हाच एकमेव मोठा बिझनेस आहे हे ओळखूनच त्यांनी "जिओ" ची सुरुवात केली आहे. अॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स ई-कॉमर्स क्षेत्रात उतरत आहेत. तेव्हा पुढील १०-१५ वर्षात अंबांनी बेझॉसच्या पुढे किंवा जवळपास जाऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच वडीलोपार्जित आहे आणि चांगला चाललं आहे म्हणून आहे ते तसच पुढे चालवण्यात धन्य मानू नका. नविन संधी काय आहेत ते शोधून त्यावर उडी मारायला तयार रहा. त्यासाठी सतत अभ्यास करत राहिलं पाहिजे. तुम्ही नव्या संधी शोधण्यासाठी काय करताय ? ३. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा - मुकेश आणि अनिल अंबांनी यांच्या अंतर्गत वादामुळे जेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीज दोन भावांमध्ये वाटली गेली तेव्हा टेलिकॉम व्यवसाय अनिल अंबांनी यांच्याकडे गेला. करारानुसार दहा वर्षे मुकेश अंबांनी यांना टेलिकॉम उद्योगात येता येणार नव्हते. त्यामुळे तसं म्हंटलं तर जिओ यायला दहा वर्षे उशिरच झाला. अन्यथा एव्हाना कदाचित मुकेश अंबांनी हे संपत्तीचं समीकरण बदलवू शकले असते. इतिहासामध्ये अंतर्गत कलहामुळे अपिरीमित हानी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, परंतु आपण त्यातून काही शिकत नाही. आपल्या मित्रमंडळींवर आणि नातेवाईकांवर विश्वास ठेवून सलोख्याने गोष्टी सोडवता आल्या पाहिजेत. मित्रांनो, हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि लेख आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा ! ------------------------------------------------------------------ आता नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर देखील उपलब्ध आहे. नेटभेट चा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://chat.whatsapp.com/8yooBdNGgI05Ud12Hda80Q ---------------------------------------------------------------------------------------------- ======================================= आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही. नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक मराठी कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत. अधिक माहितीसाठी भेट द्या - http://www.netbhet.com मातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा ! नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे मराठी ऑनलाईन कोर्सेस - - वेळ व्यवस्थापन - https://goo.gl/VGDU5u - युट्युबच्या माध्यमातून पैसे कमावण्याची कला ! - https://goo.gl/4wFkwo - मायक्रोसॉफ्ट एक्सेल कीबोर्ड शॉर्टकट्स - https://goo.gl/yJFwcX - जीमेलचा प्रभावी वापर - https://goo.gl/cCkQu9 - फेसबुकसाठी महत्वाच्या टिप्स - https://goo.gl/UVcFu3 - उद्योगवाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञान ! - https://goo.gl/ZNNj4E - ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती ! - https://goo.gl/sSP59a - फोटोशॉप - बेसिक ते अॅडवान्स - https://goo.gl/QCTbVL - कोरल ड्रॉ - बेसिक ते अॅडवान्स - https://goo.gl/Ldkntv - मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट - https://goo.gl/xxRrNE - मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट - https://goo.gl/hCTnyA - मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट - https://goo.gl/C542j3 - वेबसाईट बनवायला शिका ! - https://goo.gl/CwZdey - व्यवसाय वाढीसाठी Linkedin मधील डावपेच ! - https://goo.gl/DMxYmp - सोशल मिडीयाचा प्रभावी वापर ! - https://goo.gl/sSe8oY - मुलाखतीची तयारी - https://goo.gl/iMB9NG - उद्योजकांनो जागे व्हा ! - https://goo.gl/8jkqqZ ======================================= धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया ! नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स www.netbhet.com |