• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

सहज सोपी पासवर्ड सुरक्षा

3/6/2019

Comments

 
Picture
पासवर्ड सुरक्षा ही व्यावसायिक आणि त्यांच्या व्यवसायाकरिता खूप महत्वाची बाब आहे. डेटा हॅकमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत २०१६ मध्ये ५७ अब्ज डॉलर्स आणि १०९ अब्ज डॉलर्सचा खर्च झाला. लहान व्यवसायासाठी, डेटा हॅकची किंमत आणि नुकसान अपरिवर्तनीय असू शकते.

८१% कंपनींचा डेटा खराब पासवर्डमुळे भंग झाला आहे. पासवर्डशी संबंधित काही सोप्या आणि प्रभावी पद्धती वापरून व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात होणाऱ्या हानीपासून स्वतःचे संरक्षण करता येईल.

पुढील ९ सर्वोत्तम पासवर्ड पध्दतीमुळे हॅकर्स तुमच्या व्यवसायापासून लांब राहतील.
पहा पासवर्ड सुरक्षेच्या ह्या ९ सर्वोत्तम पद्धती

*१) मजबूत पासवर्ड बनवा*
एका चांगल्या आणि मजबूत पासवर्डमुळे हॅकर्सना तंत्रप्रणालीला तोडणे कठीण जाते. एका चांगल्या पासवर्ड मध्ये ८ अक्षरे असली पाहिजेत तसेच अंक आणि चिन्ह ह्यांचा समावेश असला पाहिजे.

*२) अंक आणि चिन्ह एकत्रित वापरणे टाळावे*
अंक आणि चिन्ह असे एकत्रित कधीही वापरू नये, ते पासवर्ड मध्ये विखुरलेले असावे.
अंक आणि चिन्ह एकत्रित लिहिल्याने पासवर्ड हॅक होण्याची जास्त शक्यता असते.

*३) तुमच्या पासवर्ड चे परीक्षण करा*
तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे ना, ह्याची ऑनलाइन टूल्स द्वारा खात्री करून घ्या. “मायक्रोसॉफ्ट सेफ्टी अँड सेक्युरीटी सेन्टर” मध्ये आपल्याला आपल्या पासवर्डची खात्री करून घेता येईल. अनेक व्यवसाय ह्याचा वापर करतात.

*४) पासवर्ड खूप मोठे बनवू नयेत*
पासवर्ड ८-१० अक्षरांचा असावा. १० अक्षरांपेक्षा जास्त मोठा पासवर्ड लक्षात ठेवायला पण कठीण जातो.

*५) प्रत्येक अकाऊंट ला वेगळा पासवर्ड ठेवा*
एकच पासवर्ड सगळीकडे ठेवला की तो लक्षात ठेवायला सोपा जातो पण त्यामुळे हॅकर्स चे काम सोपे होते.
एकाच वेळी ते तुमची सगळी अकाऊंट्स हॅक करू शकतात. त्यामुळे प्रत्येक अकाऊंटला वेगळा पासवर्ड देणे योग्य आहे.

*६) पासवर्ड मॅनेजरचा वापर करा*
अधिकाधिक व्यावसायिक आणि व्यवसाय पासवर्ड सुरक्षेसाठी पासवर्ड मॅनेजरचा वापर करतात. ह्यात तुम्हाला एकच पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो आणि पासवर्ड मॅनेजर तो पासवर्ड लक्षात ठेवून इतरही अकाउंट्सचे पासवर्ड बनवतो.
उदाहरण- *LastPass Password Manager.*

*७) पासवर्ड नियमितपणे बदला*
बरेच वर्ष एकच पासवर्ड ठेवू नये.पासवर्ड वरचेवर बदलणे आवश्यक आहे.

*८) कर्मचारी ऑफिस सोडून गेल्यानंतर पासवर्ड बदला*
कर्मचारी ऑफिस सोडून गेल्यानंतर पासवर्ड बदलणे गरजेचे असते. माजी कर्मचाऱ्यांना आपल्या व्यवसायाच्या अथवा ऑफिसच्या खात्याचा पासवर्ड माहीत असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते.

*९) ऑफलाइन रहा*
आपले अकाऊंट वापरून झाल्यावर अथवा काम करून झाल्यावर अकाऊंट मधुन साईन आऊट होणे हे नेहमीच फायद्याचे असते. तसेच आपले काम झाले की कोणत्याही परवानग्या रद्द कराव्यात.

सुरक्षित आणि लक्षात ठेवण्यास सोपा पासवर्ड तयार करण्यासाठी नेटभेट चा हा व्हिडीओ अवश्य पहा - https://youtu.be/v9ZOOISrQQE
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा!
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
================

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect