• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

८ वर्षाचा मुलगा बनला या वर्षाचा सगळ्यात जास्त कमवणारा युट्युबर

12/21/2019

Comments

 
Picture

फोर्ब्स मॅगझिन ने बुधवारी प्रकाशित केलेल्या २०१९ च्या लिस्ट नुसार रेयान काजी हा फक्त आठ वर्षाचा मुलगा या वर्षी २६ मिलिअन डॉलर
म्हणजेच १८४ करोड कमवून या वर्षाचा सगळ्यात जास्त कमवणारा युट्युबर बनला आहे.हा मुलगा २०१८ मध्ये सुध्दा व्हीडीओ प्लॅटफॉर्म वरुन
सगळ्यात जास्त कमवणार्‍यांच्या यादीत २२ मिलिअन डॉलर कमवून टॉप मध्ये होता.

रेयान काजी याचं खर नाव रेयान गुआन अस आहे. रेयान चा जन्म ८ ऑक्टोबर २०११ मध्ये अमेरिकेतील टेक्सास मध्ये झाला 
आणि आता तो ८ वर्षाचा आहे. रेयान काजीच्या युट्युब चॅनल च नाव ' रेयान्स वर्ल्ड ' असं आहे. हे चॅनल मार्च २०१५ मध्ये रेयानच्या 
आईवडीलांच्या माध्यमातून सुरु झालं होत. तेव्हा रेयान फक्त ३ वर्षाचा होता. आता या चॅनलचे २३ मिलिअन सबस्क्राइबर आहेत.

इतके सबस्क्राइबर्स आणि करोडो कमवणारा हा मुलगा त्याच्या व्हीडीओज मध्ये नक्की करतो तरी काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तर हा मुलगा आपल्या युट्युब चॅनल वर खेळण्यांबरोबर खेळून आपले रिव्ह्युज (मत) देतो. म्हणजे रेयान त्याला गिफ्ट म्हणून मिळालेली
खेळणी अनबॉक्स करतो , त्या खेळण्याबरोबर खेळतो आणि आपलं मत सांगतो कि ते खेळण खेळायला कसं आहे. त्याच्या आशा बर्‍याचश्या
व्हीडीओज ना मिलिअन व्ह्युज आहेत. हे चॅनल आता रेयान च्या वयानुसार  खेळण्यांच्या रिव्ह्युज बरोबरच एज्युकेशनल व्हीडीओज सुध्दा बनवतं.

रेयानच्या चॅनल ने टेक्सास मधील काही मुलांनी बनवलेलं चॅनल ' डूड परफेक्ट ' ला सुध्दा मागे काढलं आहे. डूड परफेक्ट ने गेल्या वर्षी २० मिलिअन डॉलर
कमवले होते. डूड परफेक्ट या वर्षी दुसर्‍या स्थानावर आहे तर रशिया मधिल अनास्टासिया रॅडझिन्साकाया हि फक्त ५ वर्षाची मुलगी १८ मिलिअन डॉलर
कमवून तिसर्‍या स्थानावर आहे.


================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE
​असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect