• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

Blogs, Thoughts & Updates

मिश्कीन इंगावले - एक संशोधक, एक उद्योजक !

9/19/2012

Comments

 
 मी माझ्या आवडत्या TED.com या साईटला भेट दिली. आणि TED वर अगदी सुरुवातीलाच एक व्हीडीओ पाहिला मिश्कीन इंगावले (Myshkin Ingawale) या तरुणाचा. एका मराठी, महाराष्ट्रीय, भारतीय तरुणाला TED सारख्या जगभरात नावाजलेल्या व्यासपीठावर आपल्या संशोधनाबद्दल उस्फुर्तपणे बोलताना पाहून अतीशय अभिमान वाटला.
Picture

​मिश्कीन इंगावले ने एक असे यंत्र बनविले आहे  ज्यामुळे अ‍ॅनिमीया सारख्या रोगाची तपासणी करणे अतिशय सोपे झाले आहे. मूळात अ‍ॅनिमीया हा आजार बरा करण्यासारखा आहे आणि त्यासाठीची औषधे सहज आणि स्वस्तात उपल्ब्ध देखिल आहेत. मात्र तरीही केवळ अ‍ॅनिमीयाची वेळीच तपासणी न केल्यामुळे जगभरात दर मिनिटाला २ व्यक्ती मरण पावतात. 

National Institute of technology, Bhopal मधून विद्युत अभियांत्रीकीची पदवी मिळवलेल्या मिश्कीनने IIM Calcutta मधून पीएचडी केली आहे. त्याचसोबत तो MIT (Massachusetts Institute of Technology) मध्ये कोपनहेगन बाईक या ईलेक्ट्रीक सायकलच्या प्रोजेक्टवर काही काळ काम करत होता. सुट्टीमध्ये एकदा मुंबई पासुन २ तासांवर असलेल्या पारोल या गावी मिश्कीन  त्याच्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्याचा मित्र अभिषेक सेन तेथे डॉक्टर आहे. तेथे मिश्कीन पोहोचला तेव्हा तेव्हा अभिषेक एक बाळंत बाईला तपासण्यासाठी गेला होता. मात्र अ‍ॅनीमीया मुळे बाळ व आई दोघेही वाचू शकले नाहीत. मिश्कीनला हे कळल्यावर त्याला वाटले की जर हा बरा करता येण्यासारखा आजार आहे तर केवळ वेळीच आजार न ओळखला गेल्यामुळे असे मृत्यु का ओढवावेत. त्याने आपल्या डॉक्टर मित्राच्या सहाय्याने यावर उपाय शोधायचे ठरवले.

अ‍ॅनीमीया तपासण्यासाठी रक्ताचा नमुना घेतला जातो आणि असे रक्त मग एका यंत्रामध्ये तपासले जाते. हे यंत्र महाग असून ग्रामीण आणि दुर्गम भागात उपलब्ध नसते. तेव्हा अशा ठीकाणी काम करणार्‍या आशा-वर्कर्सना (गावोगावी प्राथमिक उपचार करणार्‍या परिचारीका ) सहजगत्या अ‍ॅनीमीयाची तपासणी करता यावी, त्यांना सोबत नेता यावे असे हलके यंत्र बनविण्याचे मिश्कीनने ठरवले. मुख्य म्हणजे रक्ताचा नमुना न घेता, म्हणजेच सुई न टोचता तपासणी करणारे यंत्र बनवण्याचा त्याचा मानस होता.

अथक प्रयत्नांनंतर मिश्कीनने हे काम पूर्ण केले. त्याने खिशात मावेल असे ToucHB नावाचे एक यंत्र बनवले ज्यामुळे साधी सुईदेखिल न टोचता जागच्या जागीच अ‍ॅनीमीयाची चाचणी करता येते. हे यंत्र २ AA बॅटरीवर चालणारे हे यंत्र एखाद्या Calculator सारखे दिसते. 

समाजातील एका वरकरणी साध्या पण तरीही गुंतागुंतीच्या समस्येवर मात करण्याच्या विचाराने प्रेरीत होऊन मिश्कीनने हे उपकरण बनविले. आणि आता २०२० पर्यंत जगाच्या नकाशावरुन अ‍ॅनीमीया नावाचा राक्षस मिटविण्याचे त्याने ठरवले आहे.

TED.com वरील मिश्कीनच्या भाषणाचा व्हीडीओ येथे देत आहे, तो अवश्य पहा. त्याच्या संशोधना ईतकाच त्याचे presentation skills, आत्मविश्वास, उस्फुर्तता हे सारे गुण वाखाणण्याजोगे आहेत. मला त्याची presentation स्टाईल खुप आवडली. तेव्हा हा व्हीडीओ अवश्य पहा. आणि आवडला तर आपल्या मित्रांसोबत जरुर share करा.
​
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet