-जर तुम्हाला आरामदायी आयुष्य हवे असेल….तर तुम्ही स्टार्टअप करू नका.
-जर तुम्ही सहजपणे माघार घेत असाल...तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्हाला फक्त जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी बिझनेस सुरु करायचा आहे...तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुंम्ही दिवसाचे 14 ते -16 तास काम करू शकत नसाल...तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्ही नवीन बदल स्वीकारायला आणि ते आत्मसात करायला उत्सुक नसाल आणि तुम्ही जसे आहात तसेच राहण्यात समाधान मानत असाल…तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्ही टीका सहन करायला सक्षम नसाल आणि होणाऱ्या टीकेचा त्रास करून घेत असाल…तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्ही बिझनेसमध्ये येणारे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी किंवा बिझनेस मध्ये काही ध्येय साध्य करायला कधीच उत्सुक नसाल... तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्हाला प्रत्येक महिन्यात मोठ्या सुट्टीवर जायचे असेल…तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्हाला नेहमी सुरक्षितरित्या काम करायचे असेल आणि कोणतीही जोखीम किंवा रिस्क घेण्याची इच्छा नाही...तर तुम्ही स्टार्टअप करू नका. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ -जर तुम्हाला तुमची एनर्जी आणि उत्साह जराही कमी न करता एका अपयशातुन दुसऱ्या अपयशाला सहजपणे सामोरे जाता येत नसेल ... तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्ही असा विचार करत असाल की बिझनेस फक्त फंडिंगपुरते आहे आणि आपण एकदा फंड उभा केला कि नंतर सर्व गोष्टी आपोआप होत राहतील… तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांशी तुम्हाला चांगलेच वागायचे आहे,जरी ते त्यांचं काम योग्य रीतीने करीत नसले तरीहि आणि ते तुम्हाला त्यांना स्पष्टपणे सांगता येत नसेल…तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्हाला वाचन करायला आवडत नाही किंबहुना वाचन हे नवीन काहीतरी शिकण्याची आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची सर्वात सोपी आणि चांगली पद्धत असताना...तर तुम्ही स्टार्टअप करू नका. जर तुम्ही योग्य संधीची वाटच बघत असाल...(अगदी काही वर्षे निघून गेल्यानंतर सुद्धा...) ...तर तुम्ही स्टार्टअप करू नका.. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com . |