मित्रानो,फार पूर्वीपासून ऐकत आलेली अल्लादिन आणि जिन ची गोष्ट तर तुम्हाला माहीतच आहे. अल्लादिनला जादूचा दिवा काय सापडतो,तो घासल्यावर त्यातून एक जिन काय बाहेर येतो, तो अल्लादिनच्या तीन इच्छा काय पूर्ण करतो आणि अल्लादिन अचानक श्रीमंतही होतो.गोष्ट जरी किती हि छान वाटत असली तरी त्यातली काल्पनिकता आजच्या युगात लागु होणार नाही. खरंच अश्या पद्धतीने आजच्या काळात जिन जर आपल्या इच्छा पूर्ण करायला लागला तर…? पण पुराणकाळातील जिनने आजच्या बदललेल्या युगात खरंच इच्छा पूर्ण कराव्या का?? आजच्या काळातला जिन हा त्याच्या पूर्वजांसारखा फक्त ‘हुकूम मेरे आका’ असे बोलून इच्छापूर्ती करणारा जिन नसेल. तो हि अर्थात खूप स्मार्ट झाला असेल.असे मानुयात कि तो एक आधुनिक जिन आहे. अल्लादिन ला जेव्हा तो भेटतो तेव्हा त्याच्या इच्छा पूर्ण करण्याआधी त्याबदल्यात काहीतरी अल्लादिनलाहि द्यावे लागेल अशी अट समोर ठेवतो.अर्थात झटपट इच्छापूर्तीच्या आशेने अल्लादिन त्याच्या या म्हणण्याला होकार देतो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ अल्लादिन जेव्हा त्याच्या इच्छा सांगतो कि त्याला झटपट श्रीमंत व्हायचे आहे त्यासाठी जीनकडे तो 100 मिलियन डॉलरची मागणी करतो. या पैशांच्या बदल्यात जिन अल्लादिनकडे त्याचे कान मागतो.कान जर द्यायचे आहेत तर मग अजून श्रीमंत का होऊ नये असा विचार करून अल्लादिन अजून पैशांची मागणी करतो. पण त्याबदल्यात जिन अल्लादिनचे डोळे मागतो. पुन्हा अल्लादिन विचार करतो, ‘डोळे पण द्यायचे आहेत तर मग अजून जास्त श्रीमंत होऊयात’,म्हणून मग अल्लादिन अजून पैसे मागतो आता त्याबदल्यात जिन त्याचा मेंदू मागतो.आता मात्र अल्लादिन विचारात पडतो, कि आपले कान,डोळे,मेंदू देऊन आपण जरी खूप श्रीमंत झालो तरी त्याचा खरच उपयोग आहे का?त्याला असे विचारात पडलेले पाहून जिन त्याच्या जादूच्या दिव्यात परत जाण्यास निघतो आणि अल्लादिनला म्हणतो, मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही ,कारण मला असं वाटतं कि तू आधीच खुप श्रीमंत आहेस.अल्लादिनकडे किती मौल्यवान गोष्टी आहेत याची जिन जाणीव करून देतो. आपलं हि असंच काहीसं झालं आहे.झटपट यश,पैसे कमावण्याच्या नादात आपण आपल्याजवळ असलेल्या क्षमतेचा,हुशारीचा विचारच करत नाही.किंबहुना आपल्याला याची पुसटशी जाणीवहि नसते कि आपण खरोखरंच किती श्रीमंत आहोत. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com |