• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

पारंपारिक बिझनेस मॉडेल्स !

11/10/2018

Comments

 

नमस्कार मित्रांनो, आपण मागील काही भागांमध्ये बिझनेस मॉडेल बद्दल पाहिलं. या भागात आपण काही ट्रॅडिशनल बिझनेस मॉडेल्स बद्दल बघणार आहोत. ट्रॅडिशनल बिझनेस मॉडेल म्हणजे पूर्वापार चालत आलेले बिझनेस मॉडेल्स. पाहिलं ट्रॅडिशनल बिझनेस मॉडेल जे आपण पाहणार आहोत ते आहे रिटेल बिझनेस मॉडेल्स. 

१. रिटेल बिझनेस मॉडेल:
रिटेल बिझनेस मॉडेल म्हणजे थोडक्यात दुकान. दुकानात आपण कुठूनतरी माळ घेऊन येतो दुकानात ठेवतो आणि जसजसे ग्राहक येतील तसतसे आपण त्यांना माल विकतो. हे अगदी साधं आणि सरळ वर्षानोवर्ष चालत आलेलं बिझनेस मॉडेल आणि मॅनेजमेंट भाषेत त्याला रिटेल असं म्हणतात. 

हेच रिटेल जेव्हा आपण ऑनलाईन करतो तेव्हा त्याला इ-कॉमर्स असं म्हणतात. परंतु तो भाग आपण नंतर बघूया. सध्या आपण ट्रॅडिशनल बिझनेस मॉडेल बद्दल चर्चा करूयात. 

२. डिस्ट्रिब्युशन बिझनेस मॉडेल: 
ज्यांचा फॅक्टरी किंवा जे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात, त्यांना तो माल एकएक ग्राहकाला शोधून विकणंखूप कठीण असत. आणि त्यामुळे तसं न करता मधे डिस्ट्रिब्युटरची नेमणूक करतात. हा डिस्ट्रिब्युटर मॅन्युफॅक्चर कडून घाऊक माल विकत घेतो आणि त्यानंतर तो रिटेलर्सना विकतो. तर हे झालं डिस्ट्रिब्युशन बिझनेस मॉडेल किंवा यालाच होलसेल बिझनेस मॉडेल असं देखील म्हणतात. 

३. फ्रँचाइजी बिझनेस मॉडेल: 
हा एक अतिशय इंटरेस्टींग बिझनेस मॉडेल आहे. तुम्ही याआधी सुद्धा याबद्दल ऐकलं असेल. यामध्ये एखादी कंपनी आपला ब्रँड, आपल्या कंपनीचं नाव, आपली उत्पादनं, किंवा आपली उत्पादनं बनवण्याची प्रोसेस हि इतर बिझनेसेस ला वापरण्यासाठी देते आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून फ्रँचाइजी फी च्या स्वरूपात पैसे आकारते. उदा. मॅकडॉनल्ड्स. प्रत्येकाने मॅकडॉनल्ड्स मध्ये काहीतरी खाल्लं असेलच. तर त्याच प्रत्येक दुकान हे मॅकडॉनल्ड्सच नसत. छोट्या उद्योजकांना मॅकडोनाल्ड आपलं ब्रँड देतो, प्रोसेस देते, आपलं प्रॉडक्ट कसं बनवायचं त्याची माहिती देते, प्रॉडक्ट कसे विकायचे ते शिकवत. आणि त्याबदल्यात छोट्या उद्योजकांकडून मॅकडॉनल्ड्स रॉयल्टी फी म्हणजेच फ्रँचाइजी फी घेते. आणि त्यांच्या होणाऱ्या विक्रीवर कंमिशन देखील घेते. हे बिझनेस मॉडेल अतिशय चांगलं आहे कारण यात दोघांचाही फायदा होतो. कंपनीचा जास्तीत जास्त दुकाने एकत्र बनवता येतात. त्यासाठी त्यांना जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज भासत नाही. इतर छोटे उद्योजक ते करतात.  तसेच उद्योजकांना देखील ते फायद्याचे आहे, त्यांना स्वतःहून उत्पादनं शोधावं लागत नाही, बनवावं लागत नाही, ब्रँड नेम बनवण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागत नाही. या बिझनेसमध्ये चुका कमीत कमी होतात कारण कंपनीमध्ये हे शिकवून एक प्रोसेस तयार केलेली असते, संपूर्ण बिझनेस मॉडेल उभा केलेला असतो. आणि छोट्या उद्योजकांना कमी रिस्क मध्ये फ्रँचाइजी मिळते. आणि त्यांना बिझनेस सुरु करता येतो. म्हणून फ्रँचाइजी बिझनेस मॉडेल अतिशय यशस्वी आहे. जगभरात तो विविध उद्योगांमध्ये तो वापरला जातो.  

४. ऍडव्हर्टायझिंग बिझनेस मॉडेल: 
हे बिझनेस मॉडेल सुद्धा तुम्हाला माहित असेलच. टीव्हीवर जे चॅनेल्स असतात ते प्रोग्रॅम दाखवतात आणि त्याच्यामध्ये जाहिरात दाखवतात. आणि चॅनेल्स हे मुख्य करून जाहिरातींमधून जास्त पैसे कमावतात. किंवा मग न्यूजपेपर किंवा मॅगझिन्स जाहिराती विकून त्यातून पैसे कमवतात. 

५. सब्स्क्रिप्शन बिझनेस मॉडेल:
सब्स्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. मासिक किंवा न्यूजपेपर महिन्याची किंवा वर्षभराची वर्गणी आकारतात आणि त्यानंतर आपले अंक पाठवत असतात. सब्स्क्रिप्शन बिझनेस मॉडेल हा अतिशय चांगला आहे. कारण यामध्ये जेव्हा तुम्ही एखादा ग्राहक घेतलात तर तो काही काळापर्यंत तरी तुमच्याकडे असतो. जर वार्षिक वर्गणी असेल तर तो ग्राहक पूर्ण वर्षभर तुमच्याकडे राहतो. DNA या न्यूजपेपरने सब्स्क्रिप्शन चा खूप चांगला वापर केला होता. DNA हा न्यूजपेपर बाकी न्यूजपेपर पेक्षा नवीन होता. तर त्या न्यूजपेपर सोबत स्पर्धा देण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. त्यांनी आपल्या न्यूजपेपरची सब्स्क्रिप्शन किंमत खूप कमी केली. एकटी कमी केली की अगदी ५० पैशांपर्यंत त्या न्यूजपेपर ची किंमत झाली होती. इतकी कमी किंमत असल्यामुळे लोकांनी त्याचे सब्स्क्रिप्शन विकत घेतले. DNA ने याच ग्राहकांचा डेटा जाहिरातदारांकडे नेला आणि त्यांना सांगितलं की, बघा आता आमच्याकडे एवढे सारे ग्राहक आहेत आणि आता आम्हाला जाहिराती द्या. म्हणजेच DNA ने सब्स्क्रिप्शन बिझनेस मॉडेलचा चांगलाच उपयोग करून घेतला. त्यानी खूप जास्त ग्राहक आधी स्वतःकडे आणले.आणि त्यानंतर तेच ग्राहक वापरून आणखी जाहिराती मिळवल्या आणि पैसे कमवले. हे बिझनेस मॉडेल चांगल्या पद्धतीने वापरलं तर नक्कीच आपला बिझनेस वाढू शकतो. 

तर मित्रांनो हे झालं ट्रॅडिशनल बिझनेस मॉडेल्स. वर्षानुवर्षे हे बिझनेस मॉडेल्स चालत आलेले आहेत. तुम्ही जर तुमचा बिझनेस सुरू करणार असाल तर या बिझनेस मॉडेल्सचा जरूर विचार करा. त्याव्यतिरिक्त आता इंटरनेट, मोबाईल, नवीन टेकनॉलॉजि यांच्या प्रगतीमुळे नवीन बिझनेस मॉडेल देखील उदयाला येत आहेत. ते अतिशय उपयुक्त आणि बिझनेस मॉडेलच्या बेसिसवरच तयार झालेले आहेत. आणि ते काय आहेत आणि ते कसे वापरायचे आणि आपण आपला उद्योक कसा सुरु करू शकतो ते आपण बघुयात पुढील व्हिडीओमध्ये.
ऑल द बेस्ट! धन्यवाद !!
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect