भारतीय क्रिकेट विश्वात ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, आपल्या जबाबदाऱ्या चोख पडणारा म्हणून नेहमीच नावाजला जातो. त्याच्यात असलेल्या कमालीच्या नेतृत्वगुणामुळे आंततराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचं नाव विलक्षण आदराने घेतले जाते. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळापासूनच धोनीच्या वाट्याला आलेली प्रत्येक जबाबदारी त्याने पूर्ण निष्ठेने पार पाडली . मग ते भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद किंवा यष्टीरक्षण करणं असो किंवा मग संघ अडचणीत असताना विजयासाठी दमदार खेळी खेळणं या सारख्या गोष्टी त्याने सहजरित्या हाताळल्या. परिणामी, धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले. कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये आपले मानसिक संतुलन कायम ठेवत तसेच संघावर कोणतेही दडपण न येऊ देता आपल्या संघाला विजेतेपदाकडे घेऊन जाण्याचा त्याचा हाच गुण त्याला सर्वार्थाने परिपूर्ण खेळाडू बनवतो. त्याच्या अशाच आणखी एका गुणाविषयी भारतीय क्रिकेट संघाच्या माजी mental conditioning coach असणाऱ्या पॅडी अपटन यांनी आपल्या 'द बेअरफूट कोच' या पुस्तकातुन आपले विचार व्यक्त केले आहेत.धोनीचा संयम आणि शांत वृत्ती बद्दल सांगताना अपटन यांनी धोनीने संघातील खेळाडूंसाठी दिलेल्या शिक्षेबद्दलही उल्लेख केला आहे.काय होती ती शिक्षा? ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ पॅडी याबाबद्दल लिहितात, 'मी ज्यावेळी संघाशी जोडलो गेलो, तेव्हा अनिल कुंबळेकडे कसोटी संघाचं कर्णधार पद होतं, तर धोनी एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता.स्वत:च परीक्षण करण्यासाठी म्हणून संघाला विचारण्यात आलं कि सरावसामने आणि मिटिंगसाठी सर्वांनी वेळेवर येण्याची गरज आहे का? यावर सर्वांनीच होकारार्थी उत्तर दिलं. मग उशिरा येणाऱ्यासाठी काय करावं याबद्दलही चर्चा झाल्या आणि शेवटी हा निर्णय कर्णधारावरच सोपवण्यात आला '.सरावासाठी उशिरा येणाऱ्या खेळाडूने शिक्षा म्हणून १० हजार रुपयांचा दंड द्यावा असा निर्णय अनिल कुंबळेने घेतला. तर, धोनीने या शिक्षेला वेगळ्याच प्रकारे सर्वांसमोर ठेवलं.धोनीने १० हजाराचा दंड कायम तर ठेवलाच पण जर एकाही खेळाडूला उशिर झाला तरीही संपूर्ण संघातील इतर खेळाडूंनाही त्याच्या चुकीसाठी दहा हजारांचा दंड भरावा लागणार अशी शिक्षा त्याने दिली. त्या दिवसापासून एकदिवसीय क्रिकेट संघात सरावासाठी कोणताही खेळाडू उशिरा आला नाही', हा महत्त्वाचा उलगडा त्यांनी केला. संघातील खेळाडूंना वेळेचं महत्त्व कळावं म्हणून धोनीने लढवलेली ही शक्कल पाहता, त्याचं कौतुक करावं तितकं कमीच. मित्रानो team work शिकविणारा हा एक उत्तम किस्सा आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची , यश आणि अपयशाची जबाबदारी कोण्या एकाची नसून पूर्ण संघाची असते. महेंद्रसिंग धोनीची ही युक्ती खरंतर संघभावना अधिक दृढ करणारी होती आणि म्हणूनच हा मॅनेजमेंटचा एक महत्वाचा धडा आहे. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |