• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

CavinKare case study|कमी किंमत?मोठा फायदा!

5/30/2019

Comments

 
Picture
आजचा हा लेख अशा व्यक्तीबद्दल आणि व्यवसायाबद्दल आहे ज्यांनी FMCG च्या सगळ्या नियमांना पार करून स्वतःच्या बिझनेस ला एका उंचीवर नेऊन ठेवले.या व्यक्तीने सॅशे प्रॉडक्ट पद्धत व्यवसायात आणून पारंपरिक उद्योजकतेला नवी दिशा देण्याचे काम केले.आज त्यांची कंपनी यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचली आहे.या व्यक्तीचं नाव आहे सी.के.रंगनाथन.आणि त्यांची कंपनी आहे  केविनकेयर. त्यांची आतापर्यंतची वाटचाल नक्कीच सोपी नव्हती.खूप संघर्ष आणि कठोर मेहनतीने त्यांनी कंपनीला कश्या पद्धतीने आणि किती उंचीवर नेऊन ठेवले हे जाणून घेऊ.

तामिळनाडूमधील एका लहानश्या खेड्यात सी.के.रंगनाथन यांचा जन्म झाला.त्यांच्या वडिलांचा शेती सोबतच एक लहानसा व्यवसाय होता.रंगनाथन यांची अभ्यासातील गती फारशी चांगली नव्हती.त्यामुळे त्यांच्या वडिलांची त्यांनी शेती किंवा बिझनेस यापैकी एक काहीतरी करावे अशी इच्छा होती.महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी रंगनाथन यांच्यावर आली.
रंगनाथन यांनी शाम्पू बनवण्याचा एक लहानसा व्यवसाय सुरु केला.वडिलांच्या नावावरून त्यांनी चिक इंडिया नावाने कंपनी सुरु केली.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
​सुरुवातीला शाम्पूच्या बाटल्यांची विक्री काही खास होत नव्हती.म्हणून रंगनाथन यांनी प्रथमच शाम्पूच्या लहान पाकिटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि किंमत फक्त 1 रुपया इतकी ठेवली. शाम्पूच्या मोठ्या  बाटलीच्या तुलनेत एक रुपयाचे शाम्पूचे पाकीट घेणे लोकांना परवडू लागले आणि विक्रीची हि आयडिया चिक शाम्पूच्या विक्रीसाठी अतिशय उपयुक्त ठरली. त्यांची ही कल्पना एवढी चांगली चालली की दक्षिण भारतामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर सारख्या मोठ्या कंपन्यांना देखील चिक शाम्पू ने मागे टाकले.एका लोकल ब्रँडने ग्लोबल ब्रँडवर मात करणारे हे एक चांगले उदाहरण ठरले.

कमी पैशामध्ये गुणवत्तापूर्वक उत्पादनाही विक्री करून लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला.सुरुवातीला फक्त शाम्पूचे उत्पादन करणारी कंपनी हळूहळू इतरसौंदर्यप्रसाधने निर्माण करू लागली. पुढे रंगनाथन यांनी आपल्या कंपनीचे नाव केविन केयर असे ठेवले.केविन केयरचा अर्थ होतो प्राचीन सौंदर्य.

नंतर रंगनाथन यांनी शाम्पूचे सुगंधी प्रकार आणि सुवासिक अत्तर यांची निर्मिती केली.सतत निरनिराळे प्रयोग करत कंपनीच्या यशाचा आलेख चढता ठेवला.नंतरहि नाईल हर्बर शाम्पू, इंडिका हेअर,नीरा हेअर वॉश पावडर तसेच अनेक सौंदर्यप्रसाधने यासारख्या उत्पदनांची निर्मितीआणि यशस्वी विक्री देखील केली.आज आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील कंपनीचे प्रॉडक्ट्स प्रसिद्ध आहेत.


मित्रानो रंगनाथन यांच्या प्रवासातून आपण काही गोष्टी नक्कीच लक्षात घेऊ शकतो.आपल्या उत्पादनाविषयी नेहमी ग्राहकांच्या मनात विश्वास कायम ठेवला पाहिजे.उत्पादनाची कमी असलेली किंमत देखील व्यवसायात खूप मोठा फायदा करून देऊ शकते.आपले उत्पादन ग्राहकांच्या गरजेनुसार कसे बदलता येईल हे अभ्यासणे  व्यवसाय वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
​================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect