• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

Blogs, Thoughts & Updates

उद्योजकाच्या नजरेतून उत्पन्न मिळविण्याचे प्रकार !

11/7/2018

Comments

 
नमस्कार मित्रांनो, उद्योजकांबद्दल किंवा Entrepreneurship बद्दल माहिती घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे उद्योजक पैसे कमावण्याकडे कसे बघतात. सर्वप्रथम आपण इन्कमचे दोन ढोबळ प्रकार करूया, ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. आता हा नक्की काय कन्सेप्ट आहे ते समजून घेऊया. 


बहुतेक लोकांना ऍक्टिव्ह इन्कम हि फक्त एकंच इन्कम पद्धत माहित असते. म्हणजे कोणी आपल्याला काम करायला सांगितलं आणि आपण ते केलं आणि त्याबदल्यात पैसे घेतले. तुम्ही नोकरी करत असाल, फ्रीलान्सर असाल, शिक्षक असाल किंवा कोणत्याही प्रोफेशनमध्ये असाल तेव्हा ऍक्टिव्ह इन्कम मिळवण्याची पद्धत असते. उद्योजक मात्र असं करत नाही. उद्योजक हे पॅसिव्ह इन्कम मिळविण्यात भर देतात. पॅसिव्ह इन्कम म्हणजे ऍडिशनल काम करण्याची गरज न भासता जे इन्कम मिळवलं जातं ते पॅसिव्ह इन्कम असत. म्हणजे जसं ऍक्टिव्ह इन्कममध्ये आपण आठ तास काम करून त्याचे पैसे घेतो. तर पॅसिव्ह इन्कम मध्ये तसं नसतं. उदारणार्थ, इन्व्हेस्टमेंट हे एक पॅसिव्ह इन्कमच उदाहरण आहे. जेव्हा एखादा इन्व्हेस्टर शेअर्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्या शेअरची किंमत वाढण्यासाठी तो काही करत नाही. किंवा तो काही काम करत नाही. फक्त तो शेअर निवडताना मात्र काम करतो. आणि त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर जेव्हा त्याची किंमत वाढत जाते त्यावेळेला ते पॅसिव्ह इन्कम असतं.त्यामध्ये इन्व्हेस्टरचा डायरेक्ट रोल नसतो. 


उद्योजक जे असता ते अशाप्रकारे पॅसिव्ह इन्कम जनरेट करणाऱ्या कंपन्या बनवण्यात भर देतात. त्याला म्हणतात व्हॅलू क्रिएटिंग वेहिकल्स (Value Creating Vehicles ) म्हणजे एक अशी कंपनी जी बनवण्यामध्ये त्यांना सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करावी लागते, काम करावं लागतं परंतु, ती कंपनी बनल्यानंतर आपोआप रेव्हेन्यू जनरेट करायला लागते. उदाहरणार्थ, ओला किंवा उबर यांच्यामध्ये ते अँप बनवणं , नवीन गाड्या किंवा ड्राइव्हर्स, इ. ओलमध्ये सामावून घेणं हे ओलाच्या संचालकांनी केलं आणि त्याच्यानंतर तो मात्र सेल्फ रनिंग झाला. याचा अर्थ त्यांना ओला अँप परत परत बनवावा लागतं नाही त्यामुळे त्यांना ऍक्टिव्ह काम करावं लागत नाही. ते चालू ठेवण्यासाठी जे काही काम करावं लागत तेवढंच. परंतु तो बिझनेस आता वाढत चालला आहे, मोठा होत चालला आहे. जो काही प्लॅटफॉर्म तयार झाला आहे त्याच्यावर आता ते काम करतात. 


दुसरं उदाहरण आता मी माझंच देतो, नेटभेट इ- लर्निंग सोलुशनच. मी यामध्ये फक्त एकदाच कोर्स बनवतो.आणि तो मी कितीही वेळा विकू शकतो. कारण तो डिजिटल कोर्स आहे. तो फक्त एकदाच बनवून अपलोड करायचा आहे. त्यामुळे हे एक व्हॅलू क्रिएटिंग वेहिकल आहे.जेव्हा मी कोर्स बनवला तेव्हा मी एक व्हॅल्यू तयार केली. आणि आता ती व्हॅल्यू मला पुढचे कित्येक वर्ष त्यामधून इन्कम मिळवून देईल. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. मला तो पुन्हा कोर्स बनवायची गरज नाही. तो मी एकदाच रेकॉर्ड करून ऑनलाईन उपलब्ध करून दिला. 


आता आपण बघितलं की उद्योजक पॅसिव्ह इन्कम बनवण्यात भर देतात. पॅसिव्ह इन्कम मध्ये दोन चांगल्या रेवेन्यु जनरेट करणाऱ्या सिस्टम्स आहेत. सगळ्यात पहिली प्रसिद्ध जी आहे लेझर आणि ब्लेड या नावाने. तुम्ही कदाचित याबद्दल ऐकलं असेल. दाढी करण्यासाठी जो लेझर वापरला जातो तो त्या कंपन्या स्वस्तात विकतात.आणि नंतर त्यासाठी त्यांना ब्लेड्स विकता येतात. या बिझनेस मॉडेलला लेझर अँड ब्लेड बिझनेस मॉडेल असं म्हणतात. झेरॉक्स मशीन च्या ज्या कंपन्या असतात त्या सुद्धा मशीन थोडं स्वस्तात विकतात आणि नंतर त्या प्रिंटरची शाई म्हणजेच कारट्रिज ते जास्त विकून पैसे कमावतात. खूप साऱ्या कंपन्या किंवा बिझनेस मॉडेल्स हे या मॉडेलवर काम करतात. आणखी उदाहरण द्यायचं झालं तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे एकदा घेतल्यानंतर सारखं त्याला अपग्रेड करावं लागतं. अशाप्रकारे तुम्ही रिकरिंग रेव्हेन्यू साठी रेझर अँड ब्लेड मॉडेल तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये वापरू शकता. 


आणखी एक दुसरी गोष्टी जी उद्योजक खूप हुशारीने करतात ती म्हणजे, प्लॅन ऑबसेलेन्स (Plan Obselence ). प्लॅन ऑबसेलेन्स म्हणजे तुम्ही बनवलेल्या प्रॉडक्टच आयुष्य हे आपोआप संपतं. तुम्ही लक्षात घेतलं असेल की, आपण जे मोबाईल फोन्स, टॅबलेट इ. वापरतो काही वर्षानंतर ते जरी दिसायला चांगले असले तरी तो डिवाइस खूप स्लो होतो. किंवा त्यामध्ये मेमरी चे प्रॉब्लेम्स येतात. तर हा एक प्लॅन ऑबसेलेन्स चा एक भाग आहे. कारण कंपन्यांना नवीन प्रॉडक्ट्स विकायचे असतात. जर तुम्हाला घड्याळ बनवणारी एच एम टी (HMT ) कंपनी माहित असेल तर त्यांचे घड्याळ इतके चांगले होते की, ते कधी खराब च होत नव्हते. आणि त्यामुळे त्या कंपनीला नवीन सेल्स मिळायचा नाही. त्यांचा बिझनेसच व्हायचा नाही. आणि परिणामी ती कंपनीचं लयाला गेली. म्हणून प्लॅन ऑबसेलेन्स हा सध्याचा नवीन फंडा आहे. आजकाल सर्वच कंपन्या वापरतात. आणि ते एखादं प्रॉडक्ट लाँच करण्याआधीच ठरवतात की हे किती वर्ष प्रॉडक्ट मार्केटमध्ये असलं पाहिजे. आणि त्याला अपग्रेड करण्यासाठी नवीन प्रॉडक्ट लाँच करतात. उदाहरणार्थ अँपल आय फोन. आय फोन ५, ६ आणि आता आय फोन १० सुद्धा लाँच झाला. हे असं दर एक किंवा दोन वर्षानंतर नवनवीन प्रॉडक्ट अपग्रेड करून लाँच करत असतात. कारण त्यांना मागचं प्रॉडक्ट ओबसोल्यूट करायचं असतं. म्हणून ते प्लॅन ऑबसेलेन्स करतात. 


मित्रांनो तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये यापैकी नक्की काही करत आहात का? तुम्ही नक्की ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह इन्कम वर भर देताय का? जर तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम वर भर देत आहात तर तुम्ही तुमच्याच बिझनेसमध्ये नोकरी करत आहात. आणि जर तुम्हाला खरंच तुमचा   बिझनेस मोठा करायचा असेल तर पॅसिव्ह इन्कम वर भर देणं गरजेचं आहे. तुमच्याकडे रिकरिंग रेव्हेन्यू स्ट्रीम असेल तर अगदी चांगलं. रेझर अँड ब्लेड बिझनेस मॉडेल असेल तरीही चांगलं. आणि जर तुमच्या बिझनेसच प्लॅन ऑबसेलेन्स असेल तर ते नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा सेल मिळेल. एकदाच बनवून एकदाच विकून तुम्हाला तुमची कंपनी भविष्यामध्ये मोठी करता येणार नाही. तर मित्रांनो या काही छोट्या टिप्स उद्योजकांसाठी उपयोगी ठरतील आणि त्या तुम्हाला आवडतील याची खात्री आहे.
​ऑल द बेस्ट ! धन्यवाद ! 
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet