तुम्ही कधी तुमचे इअरफोन्स किंवा चार्जर घरी विसरला आहात आणि तुम्हाला ते हवेच आहेत.
तुम्हाला एका खास दुकानातून काही सामान विकत घ्यायचीय? एखाद्या दूरच्या हॉटेल मधून तुमची आवडती डिश ऑर्डर करायचीय? किंवा एखादे महत्त्वाचे पेपर्स झेरॉक्स करायचे आहेत?पण वेळ मिळत नाहीय? मित्रानो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत पण वेळ नाहीय. अशा सर्व लहानातल्या लहान अथवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी तुम्ही सहज करू शकता Dunzo app वापरून.हे अॅप सुरु करण्याचं मुळात हेच उद्दिष्ट होत कि जी कामे तुमच्या लिस्टमध्ये आहेत पण ती पूर्ण होत नाहीत अशा गोष्टी तुम्ही Dunzo app वापरून करू शकाल. खरंतर Dunzo app चे सी इ ओ कबीर विश्वास यांची हि एक साधी कल्पना होती कि त्यांना जी कामे करायला वेळ मिळत नाहीय किंवा आवडत नाहीत अशी कामे करून देणारी काहीतरी सर्व्हिस असायला हवी. म्हणून त्यांनी आधी हि कल्पना व्हॉटस ग्रुप वर करून पहिली. त्यांनी ग्रुप वरील मेम्बर्सची पेंडिंग कामे करून देण्यास सुरुवात केली. यातून बऱ्याचश्या गोष्टी त्याना अभ्यासता आल्या जसे कि नक्की कशा प्रकारची कामे,मग त्यांचे वर्गीकरण मग त्यासाठी इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांशी सांगड कशी घालता येईल अशा प्रकारे अनेक प्रश्नोत्तरातून अखेरीस डंझो अॅपची निर्मिती झाली.गमतीची गोष्ट अशी आहे कि याआप साठी चे गुंतवणूकदार देखल कबीर यांना या व्हॉटस ग्रुप द्वारेच मिळाले. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ Dunzo आपल्या शहरामध्ये काहीही वितरीत करतो,आपले आवडते पिझ्झा किंवा बर्गर, फार्मसी, किराणा, कपडे धुण्याचे यंत्र, पाळीव प्राणी , पुस्तके, आपला फोन किंवा इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू या सारख्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण डंझोअॅप द्वारे मागवू शकतो.किंवा इतर कोणाला पाठवू हि शकतो. याव्यतिरिक्त आपण जर का आपल्या घरी काही वस्तू विसरलो असू तर त्या सुद्धा Dunzo आपल्याला आणून देतो.फळे,भाज्या एवढंच काय किराणा खरेदी देखील करू शकतो. या मागे खूप सारा अभ्यास आणि अतिशय कणखर असे मॅनॅजमेन्ट जे कि तुम्हाला हे आप वारंवार वापरण्यास प्रवृत्त करते. जुलै २०१५ मध्ये विकसित झालेल्या या Dunzo app ची सेवा सध्या बंगलोर, पुणे, गुडगाव, दिल्ली, नोएडा, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांमध्ये 24x7 उपलब्ध आहे.अशा या सर्व प्रकारच्या ऑन डिमांड सेवा पुरवणाऱ्या आप मध्ये नुकतीच गुगल ने थेट गुंतवणूक केली आहे.चार वर्षात एका व्हॉटस ग्रुपने सुरु होऊन एका २१० करोड गुंतवणूक असणाऱ्या यशस्वी स्टार्टअप ची ही गोष्ट. अश्या प्रकारच्या स्टार्टअप्स ना Hyper locals business म्हंटले जाते.छोट्या कार्यक्षेत्रांमध्ये सेवा देणे हे अनेक मोठ्या कंपन्यांना शक्य होत नाही त्यामुळे नविन व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वाना hyper local business ही सुवर्णसंधीच आहे.व्हाट्सअप्प सारख्या सेवेचा वापर करून तुम्हालाही असाच एखादा सर्विस बिझनेस सुरू करता येईल त्यासाठी गुंतवणुकीची ही अजिबात गरज नाही.बघा तर मग तुम्हालाही काही सुचतं का! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com |