• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

जगातील पाहिले ३D प्रिंटेड हृदय! तंत्रज्ञान अवघे जगणेच बदलून टाकणार?

4/23/2019

Comments

 
Picture
​खेळणी, वाहनांचे सुटे भाग अश्या गोष्टी बनविण्यासाठी आतापर्यंत ‘३डी प्रिन्टर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता. नाक-कानासारखे अवयव तयार करण्यासाठीही अलिकडे त्याचा उपयोग होऊ लागला आहे.
 मात्र इस्रायलमधील तेलअवीव विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी त्याच्याही पुढे जाऊन, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी पेशी आणि रक्तवाहिन्या वापरून चक्क हृदयाची निर्मिती केली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे जगभरातील वैद्यकशास्त्राला नवी दिशा आणि नवीन आव्हाने मिळणार आहेत . .

हे संशोधन यशस्वी करणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ.ताल डवीर यांच्या म्हणण्यानुसार, आजवर ३डी प्रिंटरच्या साहाय्याने अनेकांनी हृदयाच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. पण प्रत्यक्ष मानवी पेशी, रक्तवाहिन्या, कप्पे आदी असलेले हे हृदय पहिल्यांदाच बनविण्यात आले आहे.
वैज्ञानिकांनी अखेरीस जगातील पहिले 3D प्रिंटेड हृदय बनविण्यात यश मिळविले आहे. हे हृदय आकाराने छोटे असले तरीही ते पूर्णपणे मानवाच्या हृदयाप्रमाणेच बनविण्यात आले असून त्याचप्रमाणे कामही करते.
या प्रिंटेड हृदयात मानवी हृदयासारखे कप्पे, रक्तवाहिन्या बनविण्यात आल्या आहेत.हे हृदय रुग्णाच्या पेशींपासून बनविण्याचे मुख्य कारण म्हणजे मानवी शरीर या हृदयाला प्रतिसाद देईल.या शोधामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा असा कि यापुढे तातडीने गरज भासल्यास अवयव दात्याची बराच काळ वाट पाहावी लागणार नाही.या हृदयामध्ये सेल्स म्हणजेच पेशींचे रोपण केल्यावर ते लगेचच रक्त ढकलण्यास सुरुवात करते. भविष्यात यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचतील. 

===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
===================

खरंतर काही देशांमध्ये  आपल्या शरीराचे भाग आधीपासूनच 3D प्रिंट होत आहेत,
फिनलंडच्या टँपेर विद्यापीठात मानवी डोळ्यांचा एक नाजूक भाग ‘कॉर्नियास’ ३D प्रिंट होत आहे ज्यामुळे अंधत्वावर उपचार केले जात आहेत.चीनने देखील मानवी पोटाचे यशस्वीपणे 3D प्रिंट केले आहे.
ऑस्ट्रेलियन रूबेन लिटर हि व्यक्ती 3 डी प्रिंटेड पायचे हाड मिळवणारा जगातील पहिली व्यक्ती होती तसेच डेंटल इम्प्लांट आणि हाडे बदलण्यामध्ये 3 डी प्रिंटिंग मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे.
 स्वीडनमध्ये  रूग्णांच्या स्वतःच्या पेशी वापरुन 3 डी प्रिंटेड त्वचा, नाक आणि कान देखील बनवले गेले आहेत. 
 गेल्या दोन वर्षांपासून इटलीमध्ये 3 डी प्रिंटिंग केस बनवले गेले आहेत आणि त्याद्वारे पूर्ण केस प्रत्यारोपण केले जात आहेत.

येत्या दशकात, सर्वच मोठ्या हॉस्पिटलमध्ये अवयव प्रिंटर उपलब्ध असतील अशी या टीमची अपेक्षा आहे.तसेच प्रिंट करण्यायोग्य अवयव तयार करण्याचे प्रमाणही येणाऱ्या दशकात खूप वाढलेले असेल. आपण आपल्या शरीरातील बऱ्याच अवयवांमध्ये हवे ते बदल करू शकतो इतके तंत्रज्ञान वेगाने विकसित होईल. सध्या आपण एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर आहोत, जिथे आपण मानव म्हणून काय विचार करतो,कृती करतो हे खूप महत्तवाचे असेल कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थ केवळ स्मार्ट रोबोट नसून कृत्रिम मनुष्य देखील असू शकतो.

याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतं? ही चांगली गोष्ट आहे का? कि तंत्रज्ञानाचा तोटा आहे? किंवा दोन्ही?
===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
================ 

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect