• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

भगवान बुद्ध आणि भेटवस्तू

5/19/2019

Comments

 
Picture
एकदा एका माणसाला भगवान बुद्धांचा अपमान करण्याची लहर आली.म्हणून तो त्यांचा सर्वांसमोर अपमान करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ पोहोचला.त्यांच्या जवळ जाताच त्यांच्यावर ओरडू लागला, ‘तुम्हाला लोकांना शिकवण्याचा आणि ज्ञान देण्याचा काहीएक अधिकार नाही,तुम्ही खोटे आहात’. असं खूप काही अपमानास्पद बरळू लागला.
इतके होऊनही भगवान बुद्धांनी मुखातून एकही अक्षर काढले नाही आणि ते स्मितहास्य करत शांत मुद्रेने स्थितप्रज्ञ राहिले.
भगवान बुद्धांना शांत बसलेले पाहून तो माणूस अधिकच चिडला. आपण इतके अपशब्द बोलूनही बुद्धांना शांत पाहून त्याला कमालीचे आश्चर्य वाटले. वैतागून आणि रागानेच त्याने बुद्धांना विचारले, “मी तुमचा इतका अपमान केला, शिव्या दिल्या तरी तुम्ही माझ्यावर का चिडत नाही आहात?”
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================

यावर भगवान बुद्धांनी सुरेख उत्तर दिले.ते म्हणाले,
“हे भल्या माणसा मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तू एखाद्या व्यक्तीसाठी काही भेटवस्तू घेतलीस आणि त्या व्यक्तीला दिलीस,पण त्या व्यक्तीने तुझी भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला किंवा स्वीकारलीच नाही तर त्या भेट्वस्तूचं तू काय करशील?”
तो माणूस भगवान बुद्धांच्या या अनपेक्षित प्रश्नाने विचारात पडला. तो म्हणाला, “ज्याअर्थी मी ती भेटवस्तू घेतली आणि समोरच्या व्यक्तीने स्वीकारण्यास नकार दिला तर ती भेटवस्तू माझ्याकडेच राहील.”
यावर बुद्धांनी शांतपणे उत्तर दिले,“'त्याच प्रमाणे तू माझा अपमान करण्याच्या उद्देशाने इथे आलास,तू दिलेल्या शिव्या,अपमानास्पद शब्द मी स्वीकारले नाहीत.म्हणून ते सर्व तुझ्याकडेच राहिले. खरतरं या गोष्टीचा तुला त्रास होईल ,दुःख होईल हे मला माहित होते म्हणूनच मला तुझा राग आला नाही”.
मित्रानो इतक्या सहज आणि सोप्या शब्दात मूल्यवान गोष्ट भगवान बुद्धांनी सांगितली आहे जी आपल्या रोजच्या आयुष्यात हि उपयोगी पडते. जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतो,विनाकारण अपमान करतो तेव्हा त्याचा त्रास करून घेण्याऐवजी त्याचा स्वीकार न करता संयम बाळगणे हेच शहाणपणाचे ठरते.अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे केव्हाही चांगले.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect