लोकांना नेहमी असं वाटतं की यशस्वी लोक खुप नशीबवान किंवा ईश्वरी देणगी लाभलेले असतात. पण खरंतर नशीबाने त्यांच्या यशाबद्दल काहीच ठरवलेलं नसतं, अथक परीश्रम, अभ्यास आणि संघर्ष करुन त्यांनी ते यश खेचून आणलेलं असतं.....
खरंतर असं यश मिळविण्याची, महान बनण्याची सुरुवात त्या दिशेने टाकलेल्या छोट्या पावलाने होते. महान बनण्याची सुरुवात तुम्ही स्वतःसाठी पाहिलेल्या एका स्वप्नाने होते. त्या स्वप्नाचे एक ध्येय बनतं आणि ते ध्येय मी साध्य करणारंच या विश्वासानेच माणूस महानतेच्या दिशेने चालू लागतो. आणि जेव्हा तुम्ही या ध्येयाच्या दिशेने चालू लागतो तेव्हा मार्गात येणारा सगळ्यात मोठा अडथळा तुमच्या भोवतालच्या जगातून कधीच येत नसतो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ तुमचा संघर्ष विरुद्ध खेळणार्या संघाबरोबर नसतो, शर्यतीत आपल्याबरोबर धावणार्या खेळाडूसोबत नसतो, तुमच्या बिझनेस मधील स्पर्धकांसोबत नसतो, किंवा ऑफीसमधील सहकार्यांसोबत नसतो तुमचा खरा संघर्ष स्वतःशीच आपला आपल्याशीच असतो. तुम्हीच तुमचा सगळ्यात मोठा अडथळा असता. तुमच्या यश किंवा अपयशाचं मुख्य कारण तुम्हीच असता दररोज सकाळी उठून एक सर्वसाधारण आयुष्य जगायचं की काहीतरी विलक्षण साध्य करायचं हे तुम्ही ठरवता. तुमचा दृष्टीकोन ते ठरवत असतो. जेव्हा कोणीही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नाही आणि हाती घेतलेलं काम अशक्य वाटू लागतं तेव्हा तुमचा आत्मविश्वासच कामी येतो. तुमच्या स्वप्नांच्या मध्ये कोणताही अडथळा उभा असेल, तो पार करणं कितीही अशक्य वाटत असेल तरी तो पार करता येईल.......फक्त आरशात तुमच्याकडे पाहणार्या व्यक्तीला तसा विश्वास वाटला पाहिजे !! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |