मित्रांनो, तुम्ही हॉटेल मध्ये जाता का?
मग तुम्हाला हे माहीतच असेल कि कुठल्याही हॉटेल मध्ये जाऊन वेटरला मेनू विचारला, कि तो भली मोठी नावांची यादीच सांगतो, किंवा शे-दोनशे मेनू असलेले मेनूकार्ड आपल्या पुढ्यात आणून ठेवतो. पण मुंबई मधल्या एका हॉटेल मधले चित्र थोडे वेगळे आहे. पवई हिरानंदानी बिझनेस पार्क मध्ये स्थित "मिरची अँड माईम" हॉटेलची खासियत काही औरच आहे. येथे सांकेतिक खाणा-खुणांच्या द्वारे तुमची ऑर्डर विचारली जाते. आणि तुम्हीही सांकेतिक भाषेत पदार्थ सांगायचा असतो. कारण "मिरची अँड माईम" मध्ये काम करणारे कर्मचारी हे मूकबधिर आणि कर्णबधिर आहेत. मिरची अँड माईम मध्ये भारतीय पद्धतीचे जेवण मिळते. मिरची हे भारतीय जेवणातील महत्वाचे घटक आहे, आणि इथे प्रत्येक गोष्ट मूकअभिनय (MIME) करून दाखवावी लागते, त्यामुळे ह्या हॉटेलचे नाव मिरची अँड माईम ठेवले आहे. त्यांच्या मेनू कार्डवर सांकेतिक भाषेच्या सूचना आहे. त्यानुसार मूकअभिनय करून तुम्ही हवे ते अन्न मागवू शकता. हॉटेलचे बुकिंग सहजासहजी मिळत नाही, इतके लोकांच्या पसंतीस उतरले आहे हे हॉटेल. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ समाजासाठी काहीतरी करावे ह्या उद्देशाने प्रशांत इस्सर आणि अनुज शाह या मध्यमवयीन गृहस्थांनी हे हॉटेल सुरु कले आहे. 'आमच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांसारख्या आणखी लोकांना भविष्यात हॉस्पिटॅलिटी उद्योगात स्थान मिळावं. एकटा-दुकटा नव्हे तर संपूर्ण टीम याच लोकांची असावी, हे आमचं ध्येय असल्याचंही त्यांनी सांगितलं.अशा कर्मचाऱ्यांना घेऊन हॉटेल सुरू करणं हे एक आव्हान होतं. हॉटेलमध्ये काम करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या आई-वडिलांना विश्वासात घ्यावं लागणार होतं. त्यासाठी प्रशांत व अनुज यांनी अनेक संस्थांची मदत घेतली आणि अखेर एक स्वप्न प्रत्यक्षात आलं. 'कोणाचीही सहानुभूती वा शाबासकी मिळवण्यासाठी आम्ही हे हॉटेल उघडलेलं नाही. मूक व्यक्ती आदरातिथ्याचं काम जितकं चांगलं करू शकते, तितकं नॉर्मल व्यक्तीही करू शकत नाही, असा आमचा विश्वास आहे. तो सार्थही ठरला आहे. ग्राहक आमच्यावर प्रचंड खूष आहेत,' असं प्रशांत यांनी सांगितलं. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मिरची अँड माईम म्हणजे -स्वादिष्ठ अन्न, उत्तम वातावरण आणि मूकबधिर आणि कर्णबधिर व्यक्तींना मदत करणारी एक अनोखी व्यावसायिक संकल्पना. (शेवटचा मुद्दा भारतात खूप कमी आढळतो). समाजाचे आपण काही देणे लागतो ह्या विचारानेच अशा अनोख्या व्यावसायिक संकल्पना जन्माला येतात. मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण "सेवा कॅफे" या अनोख्या हॉटेलबद्दल माहिती घेतली. (त्यबद्दल इथे वाचा - https://www.netbhet.com/blog/seva-cafe ) आणि आज "मिरची अँड माईम" बद्दल ! या दोनीही हॉटेल्सने बिझनेस मध्ये नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्या. केवळ जेवणाची चव, किंमत किंवा हॉटेलचे इंटीरीअर या नेहमीच्या गोष्टींपेक्षा ग्राहकाला एक अनपेक्षीत अनुभव देण्यात ही दोन्हीही हॉटेल्स यशस्वी झाली आहेत. आपणही आपल्या बिझनेस मध्ये ग्राहकांना असे "अनुभव" देण्यावर भर देतो का ? ग्राहक बाहेर जाऊन आपल्या बद्दल इतरांशी बोलतील असे काही मुद्दे आपल्या बिझनेसमध्ये आणू शकतो का याचा विचार करा आणि ते अमलात आणा ! त्यानंतर पहा ग्राहकच आपली मार्केटिंग करु लागेल्...आणि आपोआप व्यवसाय वाढू लागेल ! स्टीव्ह जॉब्ज आपल्याला आधीच सांगून गेला आहे " Think Different" ! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! https://www.netbhet.comhere to edit. |