BBC ने काल बातमी दिली कि फेसबुक २०२० पर्यंत आपले स्वतःचे डिजिटल क्रिप्टोकरन्सी चलन- ‘GlobalCoin’ बाजारात आणणार आहे.
ह्याचाच अर्थ फेसबुक आपले स्वतःचे चलन छापणार आहे. आणि फक्त फेसबूकच नाही, तर इतरही अनेक मेसेजिंग ऍप्स सुद्धा तसेच करणार आहेत. रशियन भावंड- निकोलाय दुरोव आणि पावेल दुरोव ह्याने मिळून सुरु केलेल्या टेलिग्राम या चॅट ऍपने, सहा महिन्यांपूर्वी १.७ डॉलर अब्ज एवढी ग्राम (Gram) नामक क्रिप्टोकरन्सी जमा केली. तसेच जपानच्या लाईन (LINE) आणि कोरियाच्या काकाओ (Kakao) ने पण आपले स्वतःचे डिजिटल चलन, म्हणजेच क्रिप्टोकरन्सी बाजारात आणले आहे. मित्रांनो, आता हे मेसेजिंग ऍप्स आपल्या डिजिटल चलनाने सरळसरळ बँकांचीच जागा घेऊ पाहत आहेत. नजीकच्या काळात बँकांसाठी हे मोठे आव्हान असणार आहे. ह्यात बँकाही मागे राहिल्या नाही आहेत. अमेरिकेतली सर्वांत मोठी बँक- जे. पी मॉर्गन ही फेब्रुवारी मध्ये स्वतःचे चलन- JPM Coin ही क्रिप्टोकरन्सी बाजारात आणणारी पहिली बँक आहे. याच जे. पी मॉर्गन चे CEO जेमी डिमॉन काही वर्षांपूर्वी बोलले होते की , “बीटकॉइन हे एक फॅड आहे. मला बिटकॉइन मुळे जराही फरक पडत नाही.” ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ जे. पी मॉर्गनने आता एका इंटरबँक प्रोजेकट- USC(Utility Settlement Coin) साठी एकत्रितरित्या क्रिप्टोकरन्सी छापून वापरण्यासाठी डच बँक, क्रेडिट सुईस, UBS, बारक्लेस, HSBC, सॅण्डटॅनडर शी हातमिळवणी केली आहे. जर कंपन्या आणि बँका आपल्या ग्राहकांच्या वापरासाठी स्वतःच्या क्रिप्टोकरन्सी बनवू लागल्या, तर काय होईल? आणि जेव्हा सर्व कंपन्या त्या चलनाचा स्वीकार करू लागतील तेव्हा काय होईल? जपान चे ऍमेझॉन समजले जाणारे रकुटेन (Rakuten) ने क्रिप्टोकरन्सी चा स्वीकार करण्यासाठी आपल्या ‘रकुटेन पे’ मध्ये बदल केला आहे. एवढच नाही तर क्रिप्टोकरन्सी च्या देवाणघेवाण साठी ह्या जून मध्ये रकुटेन वॅलेट बाजारात येत आहे. ह्या बातमीमुळे रकुटेन चे शेअर बाजारातील भांडवल २ बिलियन डॉलर्स ने वाढले. त्यानंतर आता ऍमेझॉन होल फूड्स, बास्कीन रॉबिन्स, ऑफिस डेपो, ऑफिस मॅक्स आणि ह्यासारख्या १०० इतर मोठ्या दुकानांनी जाहीर केले आहे की ते फ्लेक्सा (Flexa) हे जे पेमेंट ऍप आहे त्यावरुन क्रिप्टोकरन्सी चा स्वीकार करतील. येत्या काही महिन्यातच हा आकडा १००० पर्यंत पोहचेल. आपण एका नवीन दुनियेकडे चाललो आहोत, जिथे पैशाचे नियम झपाट्याने बदलत आहेत. कोण पैसा निर्माण करतंय, कोण नियंत्रित करतंय, किती खर्च आहे, किती वेगाने पैसा वाढतोय आणि किती सहजतेने वापर होतोय ह्याबद्दल काहीच ठाम सांगता येत नाही. काय अर्थ आहे ह्याचा? कुठे घेऊन जाईल हे आपल्याला? युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग चे प्रोफेसर क्रिस स्पीडच्या म्हणण्यानुसार, भविष्यात प्रत्येक ग्राहक चार ते पाच प्रकारचे डिजिटल चलन वापरत असेल. थोड्याफार कल्पकतेने कोणत्याही कंपन्या आता राज्य आणि केंद्रीय बँकांना निष्प्रभ करू शकतात. वेगान नेशन आणि वेगान कॉइन चे CEO, ऐसाक थॉमस (Isaac Thomas), म्हणतात , “त्यांची क्रिप्टोकरन्सी जगातील जवळपास ३०० दशलक्ष शाकाहारी लोकांना एकत्रित करत आहे. आजच्या ह्या डिजिटल युगात, बदल घडवून आणण्यासाठी, संपूर्ण जगातली लोकं एकत्रित येऊन फक्त एक समाज नाही तर एक अक्खे राष्ट्र उभं करू शकतील.” येणाऱ्या भविष्यात पैसा नव्या अधिकारांना जन्म देईल का नव्या चळवळीला? तुम्हाला काय वाटते? गोष्टी बदलत आहेत… आणि नुसत्या बदलत नाहीत तर वेगाने बदलत आहेत. या वेगाला सामोरे जायची आपली कितपत तयारी आहे, हा खरा कळीचा मुद्दा आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |