• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

Blogs, Thoughts & Updates

एक महान गोल्फ खेळाडू-टायगर वूडस

4/16/2019

Comments

 
Picture
१५ वर्षानंतर अथक संघर्षानंतर अमेरिकन खेळाडू एल्ड्रिक टाँट टायगर वूड्स ने गोल्फ या क्रीडाप्रकारात पाचव्यांदा मास्टर्स किताब जिंकला आहे.
या १५ वर्षांचा टायगर चा प्रवास नेमका कसा होता? इतका संघर्ष त्याला का करावा लागला ते पाहू..

2004 - 264 आठवडे विजेतेपद राखल्यानंतर टाइगरने विजय सिंगद्वारा वर्ल्ड नंबर 1 गोल्फ रैंकिंग पद गमावले.

2005 - टायगरने PGA टूर इव्हेंट्स (आणि त्यांचे शेवटचे मास्टर्स) जिंकले आणि काही काळासाठी पुन्हा विजेतेपद परत मिळविले.

2007 - त्याच्या वडिलांच्या निधनानंतर फॉर्म मध्ये येण्यासाठी खूप झगडावे लागले.

200 9 - गुडघ्याचे ऑपरेशन मुळे त्याला खेळापासून आठ महिने दूर राहावे लागले.
कार अपघात,वैवाहिक आयुष्यातली अस्थिरता अशा कारणामुळे तो प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहिला.

2010 - टाइगरच्या आयुष्यातल्या अनेक खाजगी गोष्टी सार्वजनिक झाल्या.त्याची पत्नी एलिनने त्याला घटस्फोट दिला.त्याने त्याचे प्रमुख प्रायोजक गमावले.जाहिरातींमध्ये 22 दशलक्ष डॉलर्स आणि शेअर्स मध्ये 12 अब्ज डॉलर्सचे नुकसान अशा अनेक गोष्टी जगासमोर आल्या.तो दीड महिने व्यसनमुक्तीकेंद्रात दाखल झाला,

2015 - पाच वर्ष सतत निराशजनक कामगिरी होत असताना पुन्हा एकदा टायगरला पाठीच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले, त्यामुळे त्याला चालणेही कठीण होत होते,हा काळ त्याच्यासाठी खुपच खडतर होता.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
2016 - टाइगरच्या पाठीचा दुखणं सुरूच होतं.तो म्हणतो, "कमीत कमी चार ते सहा महिने दररोज मला उठण्यासाठी मदत घ्यावी लागत असे अश्या परिस्थितीत पुन्हा गोल्फ खेळू शकेन असा विचारही माझ्या मनात येत नसे.मला फक्त हाच विचार सतावत असे कि, मी या वेदनापासून दूर कसा जाऊ शकतो? मी पुन्हा आयुष्य कसे जगू?

2017 -पाठीच्या अजून एका शस्त्रक्रियेनंतर,गोळ्यांच्या अतिसेवनामुळे त्याला DUI अंतर्गत अटक करण्यात आली.

2018 - दुखापतीनंतर चार वर्षांनी टायगर मैदानात उतरला,त्याच्या शून्यातून पुन्हा उभे राहण्याच्या जिद्दीला पाहून त्याच्या सोबतचे खेळाडू त्याला चालतां बोलता चमत्कार "Walking Miracle.” म्हणू लागले.

201 9 - आज 14 वर्षांनंतर आणि गेममध्ये परतल्यानंतर , टायगरने 5 व्यांदा मास्टर्स पदक जिंकले. हे त्याचे 81 वे पीजीए टूर विजेतेपद आहे.

आज जिंकल्यानंतर टायगर म्हणाला की माझ्या आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. १९९७ साली मी जिंकलो तेव्हा माझे वडील माझ्या सोबत इथे हजर होते आणि आज मी वडील आहे व माझी मुले माझा विजय पाहत आहेत.
मला खात्री आहे, माझा कठीण काळ पाहिल्यानंतरचा आजचा दिवस माझ्या मुलांना सतत प्रेरणा देत राहील.

टायगर वूड्सच्या आयुष्यात आलेल्या अनेक कठीण प्रसंगावर त्याच्या जिद्दीने त्यावर मात करत तो या यशापर्यंत पोहोचलाय.यातून काही गोष्टी नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत, त्या म्हणजे…

> आयुष्यात येणाऱ्या प्रतिकूल गोष्टीमध्ये तुम्ही किती काळ टिकून राहू शकता ?
>अपयशानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी किती तयारी कराल?
> यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती प्रयन्त कराल?

मित्रांनो, संकटांना कंटाळून, शारीरिक व्याधींना त्रासून, गतवैभव नष्ट झाल्यामुळे किंवा निराशेने आपण जर कधी माघार घेण्याचा विचार करत असाल तर टायगर वूड्स च्या प्रेरणादायी विजयाची आणि संघर्षाची ही कहाणी जरूर आठवा !

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet