तुमच्या घरातील काही नको असलेल्या वस्तुंना तुम्ही जर कंटाळला असाल,जुनी वर्तमानपत्रे,टेलिफोन डिरेक्टरी,जुन्या वायर्स,वापरात नसलेला जुना कंप्युटर किंवा इतर इलेक्ट्रिक उपकरणे,अगदी जुने फॅशनबाह्य कपडे,खराब झालेली किंवा नको असलेली आर्टिफिशियल ज्वेलरी अशा अनेक वस्तूंचं नक्की काय करायचं हे समजत नाहीय,तर तुमच्यासाठी तुमचा रद्दीवाला अर्थात कबाडीवाला तुम्हाला नको असलेल्या वस्तू घेण्यासाठी तत्पर आहे. आजच्या डिजिटल युगात सर्व काही एका क्लिक वर उपलब्ध होत असताना कबाडीवालाही मागे राहिला नाहीय. भोपाळ स्थीत आयटी इंजिनियर अनुराग असती स्वतःदेखील अशा नको असलेल्या (ज्याला आपण ड्राय वेस्ट( dry Waist) म्हणूं शकतो) अश्या वस्तूंचं नक्की काय करायचं या विचारात होता.त्याच्या परिसरातला रद्दीवाला या सगळ्या वस्तूंचं योग्य प्रकारे वर्गीकरण करून त्याचा योग्य मोबदला देत नाही असे त्याला जाणवल्यावर तो स्वतःच या प्रश्नचं उत्तर शोधू लागला,तेव्हा त्याला कबाडीवाला एका फोन कॉल किंवा त्याहीपेक्षा ऑनलाईन बुकिंग द्वारे उपलब्ध असण्याची गरज वाटू लागली आणि त्यातूनच ‘द कबाडीवाला’ (https://www.thekabadiwala.com/ ) या घरपोच सेवा देणाऱ्या स्टार्टअप ची निर्मिती झाली. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ ‘द कबाडीवाला’ तुमच्या घरातील रद्दी किंवा टाकून दिलेल्या वस्तू फक्त घेऊन जात नाही तर त्यांचं पुनर्वापर,पुनर्प्रक्रिया,पुनर्विक्री अश्या प्रकारत वर्गीकरण करण्यास मदत करतो.त्याचा योग्य तो मोबदला देखील तुम्हाला मिळतो.यातील सगळ्यात सोपी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घरातील अडगळ, रद्दी,इ-कचरा घेऊन जाण्यासाठी तुमच्या वेळेप्रमाणे बुक करून ठेवू शकता.ग्राहकांना त्यांच्या नको असलेल्या वस्तूंच्या वजनाप्रमाणे मूल्य दिले जाते.त्यानंतर जमा केलेल्या सर्व मालाचे वर्गीकरण करण्यात येते आणि पुनर्वापर करणाऱ्या कंपन्यांना विकला जातो.यामागे साधारणतः 15 टक्के ते 40 टक्के मार्जिन ‘द कबडीवाला’ला मिळते. तसेच द कबडीवालाने स्थानिक रद्दीवाले,भंगारविक्रेते,स्क्रॅप डीलर्स यांच्यासोबत टायअप केले आहे त्यामुळे भोपाळच्या विविध भागांमध्ये पोहोचणेशक्य होते. एवढेच नव्हे तर अनेक B to B कंपन्यांसोबत देखील स्क्रॅप साठी थेट टाय अप केले आहे.केवळ एका TATA ACE सोबत सुरुवात केलेल्या या स्टार्टअप कडे आता दहा पेक्षा जास्त गाड्या आहेत आणि शंभर टन इतका माल गोळा करतात. या स्टार्टअपच्या सुरुवातीलाच वेबसाइटद्वारे दहा हजार लोकांनी या सेवेचा फायदा घेतला. तसेच अनेक मोठमोठ्या पुनर्प्रक्रिया उद्योगातील गुंतणूकदारानी या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली आहे.भोपाळमध्ये आजच्या घडीला पन्नास हजार रजिस्टर्ड यूजर्स आणि रोजचे किमान शंभर युजर्स या सेवेचा फायदा घेतात.अनुरागने त्याचं हे स्टार्टअप भोपाळ व्यतिरिक्त इंदोर,रायपूर आणि औरंगाबाद मध्ये विस्तारित केलंय. अनुरागच्या म्हणण्यानुसार त्याचं ‘द कबाडीवाला’ हे स्टार्टअप ‘गो ग्रीन’ या संकल्पनेवर आधारित काम करते. त्यामुळे नवीन यूजर्स आणि ग्राहकांना देखील याचं महत्त्व पटू लागलं आहे.पर्यावरणाची कमीत कमी हानी,वीजबचत,प्लास्टीकीचा कमीतकमी वापर याकडे ग्राहक गांभीर्याने विचार करू लागले आहेत. पारंपारिक आणि छोट्या रद्दी आणि भंगारविक्री व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देणे,त्यांच्या आर्थिक संधी वाढवण्यासाठी तसेच पर्यावरण बचत यासारख्या समाजोपयोगी गोष्टी करण्यासाठी एक समान प्लॅटफॉर्म तयार करून देशातील संपूर्ण कचरा विघटन, त्याचे व्यवस्थापन करणे हे ‘द कबडीवाला’चे उद्दीष्ट आहे. मित्रांनो ,कोणताही व्यवसाय चांगलं किंवा वाईट नसतो. तसेच योग्य संधी आपल्या आसपासच उपलब्ध असते,या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण यातून शिकू शकतो. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com |