मित्रांनो,भारत सरकारने जाहीर केलेल्या यावर्षीच्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्यांच्या यादीमध्ये कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना येथील एका 17 वर्षीय संशोधकाची निवड झाली. इतक्या प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणारा हा तरुण मुलगा त्याच्या शहरात आता वैज्ञानिक म्हणून ओळखला जातो.नक्की या मुलाने असे काय केले आहे कि तो आता त्याच्या शहराचा आणि राज्याचा स्टार बनला आहे?
मोहम्मद सुहेल चिन्या सलीमपाशा असे या 17 वर्षीय तरुण संशोधकाचे नाव आहे. त्याने केलेलं संशोधन हे रोग निदान करण्याच्या तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवणारे तंत्रज्ञान ठरू शकते इतके प्रभावी आहे. आपल्या आहारातील प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या कुपोषणाचा एक प्रकार म्हणजे प्री-सायमॅटोमॅटिक प्रोटीन-एनर्जी (PEM) कुपोषण. याचेच निदान करण्याची एक सहज,सोपी आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वस्त अशी पध्दत या तरूण मुलाने संशोधनातून विकसित केली आहे.फक्त एक कागदाचा तुकडा वापरून! आणि तेही अगदी कमी किंमतीत. आश्चर्य वाटतंय ना? हे संशोधन करण्यासाठी नक्की काय प्रेरणा होती याची सुद्धा एक रंजक कथा आहे. सुहेलने स्टॅनफोर्ड विद्यापीठातील बायोइंजिनिअरिंगचे एक शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक डॉ. मनु प्रकाश यांचे एक संशोधन युट्युबच्या व्हिडिओद्वारे पहिले होते.त्यांनी जगातील पहिले असे मायक्रोस्कोप बनवले आहे जे कागद वापरून तयार केले आहे आणि ज्यामुळे फक्त तीन मिनिटांत मलेरियाचे निदान होऊ शकते.यातूनच एखाद्या रोगाचे निदान करण्यासाठी पेपरचा वापर करण्याची प्रेरणा सुहेलला मिळाली होती. त्यामुळे आतापर्यंतचे होत असलेले रोगनिदान परीक्षण करण्यासाठी सिरिंजद्वारे रक्त घेणे,रक्ताचे नमुने यांचे परीक्षण,मग निदान असे पारंपरिक मार्ग मागे ठेवून या क्षेत्राचे भविष्य हे फक्त एक कागद असू शकतो.यावर त्याचा विश्वास बसला.म्हणूनच कागदावर काम करण्यास सुरुवात केली. पीईएमचे निदान आणि कुपोषणामुळे किती मुले दगावत आहेत हे पाहण्यासाठी त्याने विविध संशोधन पत्रांचा संदर्भ पडताळून पहिला.त्याला भारतात ही संख्या लाखोंच्या तर जगात कोट्यावधीच्या घरात आढळली. त्याच्या संशोधनादरम्यान, एक अतिशय वेगळी बाब समोर आली की, प्रत्येक मुलाच्या शरीरातील कुपोषण पातळी भिन्न आहे आणि म्हणून प्रत्येक मुलासाठी आहाराची आवश्यकता हि बदलत जाते."भारतातील केंद्र सरकार आणि विकसनशील देशांमधील जागतिक आरोग्य संघटना, दोघेही स्वतंत्रपणे या समस्येवर मात करण्यासाठी विविध धोरणे आणि योजना राबवून प्रयत्न करीत आहेत. परंतु सरकारने ठरवून दिलेल्या कुपोषणग्रस्त सर्व मुलांसाठी समान पातळीचा आणि प्रमाणित आहार काही मुलांमध्ये योग्य तो बदल घडवू शकत नाही.प्रत्येकाच्या शारीरिक गरजेनुसार आणि प्रथिनांच्या पातळीनुसार आहारात बदल होणे आवश्यक आहे.” असे देखील तो म्हणतो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ म्हणूनच सुहेलने एक अशी पद्धत विकसित केली आहे जी मुलाच्या रक्तात प्रोटीनची पातळी सांगू शकते.मुलाच्या लाळेचा नमुना कागदावर घेतला जातो.जर कागदाचा रंग बदलला तर प्रथिने आणि पोषक तत्वांचा अभाव आहे असे समजले जाते.त्यासाठी एक मोबाईल अॅपही विकसित केले आहे.हा कागद अॅपद्वारे स्कॅन करू शकतो. यामध्ये प्रोटीनची टक्केवारी किंवा कुपोषणाची पातळी दर्शविली जाते. हे सुहेलच्या संशोधनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग होता कारण त्याने हा बायोमार्कर मानवी लाळेमध्ये ओळखला होता.या पद्धतीची किंमत 2 रुपये आहे आणि निकालही अगदी दोन मिनिटातच मिळतो. किंमतीच्या दृष्टीने ही मोठी प्रगती आहे. पण यातून एक मुख्य बाब समोर येते ती म्हणजे आजपर्यंत कुपोषण ओळखण्यासाठी रक्ताची चाचणी हाच एकमेव मार्ग वापरला जातो.. भारतासारख्या देशामध्ये वैद्यकीय कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. तसेच या पद्धतीमुळे आर्थिक बोजा तर वाढतोच आणि पर्यावरणाची हानी देखील होत आहे.पण सुहेलने विकसित केलेल्या या कागदाच्या वापरामुळे कमी बायोमेडिकल कचरा तयार होतो. सुहेलने असे अनेक शोध लावले ज्यामुळे समाज आणि पर्यावरणाला फायदा होईल.आठवीत असताना त्याने 40x40 सेंमी आकाराचे एक टाइल डिझाइन केली.फुटपाथ सारख्या सार्वजनिक ठिकाणी या टाइल्स बसवल्यावर लोक त्यावरुन चालत गेले कि विजनिर्मिती होत असे.या विजेचा वापर पथदिवे किंवा इतर सार्वजनिक सुविधांसाठी केला जाऊ शकतो. त्याने त्याला लेट्स जनरेट इलेक्ट्रिक बाय वॉकिंग असे नाव दिले.त्याचा हा प्रयोग पन्नासहून अधिक पुरस्कार प्राप्त ठरत आहे.तेव्हापासून सुहेलने मागे वळून पाहिले नाही.बरेच पुरस्कार जिंकूनही प्रसिद्धीची हवा सुहेलच्या डोक्यात गेली नाही. त्याऐवजी, तो नवीन प्रकल्पांवर काम करत आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com |