मित्रांनो, उद्योजकाचे सर्वात महत्त्वाचे शस्त्र असते त्याची मानसिकता.चौकटी पलिकडचा विचार करण्याची क्षमता ही कोणत्याही उद्योजकाची जमेची बाजू असते.
कोणत्याही व्यक्तीने व्यवसायात उतरण्यापूर्वी किंवा व्यवसाय वाढवत असताना खरच आपली "उद्योजकीय मानसिकता" परिपक्व झाली आहे का हे तपासून पाहिले पाहिजे. या महत्त्वाच्या, परंतु फारशा चर्चिल्या न जाणार्या मुद्द्यावर माहिती देण्यासाठी नेटभेटने या "फेसबुक लाईव्ह चर्चेचे" आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने बिझनेस सायकोलॉजी, सक्सेस सिस्टम, गोल सेटिंग, रिलेशनशिप मॅनेजमेंट, उद्योजकाची पर्सनॅलिटी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उद्योजकाने कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता,गरज भासल्यास चौकटिपलीकडचा विचार करणे आणि आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून कश्या प्रकारे पुढे गेले पाहिजे, याबाबत नुकतीच नेटभेट तर्फे लाइव्ह चर्चा नेटभेटच्या फेसबुक पेजवर पार पडली. नेटभेटचे संस्थापक श्री.सलील चौधरी आणि बिझनेस सायकॉलॉजिस्ट श्री. दिनेश मोरे यांच्या सोबतचे हे चर्चासत्र तुम्ही पुन्हा अनुभवू शकता.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com |