कोणत्याही इमेजचा बॅकग्राऊंड काढा फक्त 5 सेकंदात मित्रांनो, मी जरी बिझनेस आणि मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करत असलो तरी माझं पहिली आवड तंत्रज्ञान हेच आहे.अजून ही मी सतत नवनवीन अॅप, वेबसाइट्स, प्रोग्राम्स जे आपलं काम सोपं, सुकर करतील, यांच्या शोधत असतो. सोशल मीडिया मध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेला अशी गरज भासते की एखाद्या इमेगमध्ये आपल्याला बॅकग्राउंड नको असते.कधी तो बॅकग्राऊंड चुकीचा आलेला असतो कधी चुकून एखादा माणूस आलेला असतो,किंवा इतरही अनेक कारणे असू शकतात.मग आपल्याला फक्त आपली मुख्य इमेज हवी असते. खरंतर हे करण्यासाठी फोटोशॉप किंवा इतरही अनेक टूल्स आहेत पण ते शिकण्यासाठी बराच वेळ जातो आणि जरी आपण शिकलो तरी प्रत्यक्षात काम करणं वेळखाऊ असतं. म्हणूनच आज मी तुम्हाला अशी एक वेबसाईट दाखवणार आहे जी वापरून कोणत्याही इमेजचा बॅकग्राऊंड काढता येऊ शकतो तसेच दुसरा add ही करता येऊ शकतो.त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com |