नागपूर मध्ये स्थित श्रीकांत पंतवणे, हा एक अत्यंत गरीब घरातील मुलगा होता. त्याचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे, श्रीकांतला लहानपणी पासूनच घरात हातभार लावण्यासाठी काम करावे लागले. श्रीकांत एके ठिकाणी वितरणकर्ता (delivery boy) म्हणून काम करू लागला. नंतर तो रिक्षा चालवू लागला. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ असे म्हणतात ना कि, ‘आयुष्य एका क्षणात बदलते’, तसेच काहीसे श्रीकांत बरोबर झाले. एके दिवशी तो एक पार्सल पोहचवण्यासाठी एअरपोर्ट वर गेला असताना, त्याला तिथे काही कॅडेट्स भेटले. भारतीय वायुसेनेमध्ये प्रवेश न घेताही त्याला पायलट होता येईल असा सल्ला त्या कॅडेट्सने श्रीकांतला दिला. आणि मग काय, श्रीकांतच्याही मनात हा नवा विचार रुजू झाला. त्यांनी त्याबद्दल अजून माहिती काढली आणि डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशने (DGCA) पायलटसाठी स्कॉलरशिप सुरू केल्याची माहिती त्याला मिळाली. तो लगेच आपल्या बारावीच्या परीक्षेच्या तयारीस लागला. स्वबळावर तो बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि पुढे त्यांनी मध्य-प्रदेश मधील एका फ्लाईट स्कुल मध्ये प्रवेश घेतला. श्रीकांत फ्लाईटस्कुल मधून चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. काही दिवसांनंतर श्रीकांतची ‘इंडिगो एअरलाइन्स’ या विमान कंपनीकडून सेकंड पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली. एवढ्या परीश्रमानंतर आज श्रीकांत हवाई उड्डाण करू लागला आहे. रिक्षा ते हवाई उड्डाण असा हा श्रीकांतचा प्रवास कुणालाही थक्क करणाराच आहे. इंडिगो कंपनीला श्रीकांतच्या मेहनतीची माहिती मिळताच त्यांनी श्रीकांतचा प्रवास इंडिगोच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित केला. रिक्षा ते पायलट हा त्याचा प्रवास नुसता थक्क करणारा नसून, अनेकांसाठी तो प्रेरणादायी ठरू शकतो. स्वामी विवेकानंद म्हणतात - “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होई पर्यंत थांबू नका”. तेव्हा आपणही आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवा आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी अथक परिश्रम करा. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |