• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

अत्यंत यशस्वी लोक.... एक गोष्ट करतात आणि ती म्हणजे " धोका" पत्करणे !

2/2/2019

Comments

 

This section will not be visible in live published website. Below are your current settings:


Current Number Of Columns are = 2

Expand Posts Area =

Gap/Space Between Posts = 10px

Blog Post Style = card

Use of custom card colors instead of default colors = 1

Blog Post Card Background Color = current color

Blog Post Card Shadow Color = current color

Blog Post Card Border Color = current color

Publish the website and visit your blog page to see the results

Picture
1994 मध्ये जेफ बेझोस हा अमेरिकेत वॉल स्ट्रीट मधील एका प्रथितयश इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये नोकरी करत होता. मोठा पगार, चांगली पोझिशन, आणि चांगलं भविष्य त्याला खुणावत होतं. ती नोकरी पुढे चालू ठेवली असती तर तो साधारण अमेरिकन जीवनशैली पेक्षा खूप चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकला असता.
पण त्याने तसं केलं नाही.
जेफ बेजोस ने नोकरी सोडली. अशी नोकरी जी मिळवणे भल्याभल्यांना जमत नाही.
आपल्या आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेवर त्याने पाणी सोडलं. आणि त्यानंतर त्याने ऑनलाइन पुस्तके विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्या काळात काही मोजक्या लोकांकडेच इंटरनेट होतं आणि ऑनलाईन खरेदी हा प्रकार तर कित्येकांना ऐकूनही माहित नव्हता.
1995 मध्ये ॲमेझॉन ची स्थापना झाली...... आणि आज जेफ बेझोस त्याचा ऍमेझॉनच्या जीवावर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.


Picture
इलॉन मस्क सध्या टेस्ला आणि स्पेस- एक्स या दोन कंपन्यांचा प्रमुख आहे. या दोन्ही कंपन्या अशा क्षेत्रात काम करत आहेत ज्यामध्ये जगात कोणीही काम केलं नव्हतं. टेस्ला विजेवर चालणाऱ्या गाड्या बनवणारी जगातील अग्रगण्य कंपनी आहे आणि स्पेस- एक्स अवकाश यान बनवणारी पहिली खाजगी कंपनी आहे. मनुष्याला मंगळावर वसती करता यावी यादृष्टीने स्पेस- एक्स काम करत आहे.

इलॉन मस्क ने लाखो डॉलर्सची आपली संपत्ती या दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतविली. कोणीही गुंतवणूकदार या धोकादायक व्यवसाय मध्ये गुंतवणूक करण्यास तयार नव्हता. इलॉन मस्क ने अगदी आपलं राहतं घर विकून पैसा उभा केला. अपयशी होण्याची प्रबळ शक्यता असलेल्या या दोन्हीही व्यवसायांमध्ये इलॉन मस्क ने आपलं सर्वस्व पणाला लावलं.
​
आज या दोन्ही कंपन्या अत्यंत यशस्वी आणि जग बदलण्याची क्षमता असणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. इलॉन मस्क ची संपत्ती आता 20 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

इलॉन मस्कची यशोगाथा सांगणारा व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा - 
http://www.netbhet.com/blog/5466963


Picture
डॉक्टर वेलूमणी BARC मध्ये सायंटिस्ट म्हणून काम करत होते. गावाकडच्या हलाखीच्या परिस्थिती मधून सुरू होऊन शहरांमध्ये सरकारी नोकरी पर्यंतचा त्यांचा प्रवास हीच एक मोठी यशोगाथा होती. 
​परतु एवढ्यावर न थांबता डॉक्टर वेलूमणी यांनी नोकरी सोडून दिली. आणि थायरॉईड टेस्टिंगचा व्यवसाय " थायरोकेयर" या नावाने सुरू केला. आणि त्यांची पत्नी अशा दोघांनीच आपल्या तुटपुंजा बचतीमधून सुरू केलेला हा व्यवसाय प्रचंड यशस्वी ठरला.
थीरोकेअर ही आज जगातील सगळ्यात मोठी थायरॉईड टेस्टिंग लॅब आहे. आणि डॉक्टर वेलूमणी भारतातील सर्वात श्रीमंत लोकांचा यादीमध्ये एकोणिसाव्या स्थानावर विराजमान आहेत.

डॉक्टर वेलूमणी यांची यशोगाथा सांगणारा व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा - 
http://www.netbhet.com/blog/4599358

​
===========================================
नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी 
येथे क्लिक करा - https://wa.me/919082205254?text=SUBSCRIBE
============================================
करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरतील असे अनेक कोर्सेस आम्ही मराठीतून उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी काही कोर्सेस मोफत शिकता येतील. या संधीचा फायदा घेण्यासाठी www.netbhet.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या ! 
============================================

​मित्रांनो , या तीनही गोष्टी काय सांगतात ?
अत्यंत यशस्वी लोक.... एक गोष्ट करतात आणि ती म्हणजे " धोका" पत्करणे !
ते लोक कधीही सुरक्षित पणे खेळत नाहीत.... तर त्यांच्याकडे असलेलं सर्वस्व पणाला लावून खेळतात.
अपयशी होण्याची भीती त्यांना घाबरू शकत नाही...... यशाची शक्यता कमी असताना देखील स्वतःवर विश्वास ठेवतात तेव्हाच आणि तेव्हाच लोक यशस्वी होतात !
धन्यवाद आणि ऑल द बेस्ट !


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
WWW.NETBHET.COM
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect