• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

सेवा कॅफे

4/20/2019

Comments

 
Picture
​कल्पना करा कि तुम्ही एखाद्या रेस्टोरंट मध्ये नेहमीप्रमाणे जेवण मागवता आहात ,जेवणानंतर छानसं डेजर्ट ही मागवले आहे आणि भरपेट स्वादिष्ट अशा जेवणाची चव चाखल्यानंतर तुमच्या हातात बिल येण्याऐवजी रिकामं पाकीट आणून दिलं आहे,कारण तुमच्या जेवणाचं बिल आधीच भरून तुमचं जेवण हे कोणीतरी गिफ्ट केलं आहे? आश्चर्य वाटलं ना? पण असं रोज घडतं अहमदाबाद मधल्या सेवा कॅफे मध्ये.
खरं तर आजच्या व्यवसायाभिमुख जगात उद्योग,विस्तार,नफा अशा गोष्टींचाच जास्त विचार केला जातो परंतु ‘ग्रामश्री’ ‘मानव सदन’ आणि ‘स्वच्छ सेवा’ यासारख्या एन जी ओ द्वारे चालवल्या जाणाऱ्या सेवासदनची गोष्ट थोडी वेगळी आहे.

गेल्या अकरा वर्षांपासून हा कॅफे गिफ्ट इकॉनामी या तत्वावर चालवण्यात येतो आहे.आता हि गिफ्ट इकॉनामी नक्की काय आहे? तर आपल्याला आपलं जेवण झाल्यानंतर बिल द्यावे लागत नाही कारण ते आधीच कोणीतरी भरलेले असते,मग आपण ही तसेच दुसऱ्या कोणासाठी तरी आपल्या मनाप्रमाणे पैसे द्यायचे आणि या साखळीला पुढे चालवत ठेवायचं..
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================ 
सेवा कॅफे हा फक्त नेहमीसारखा कॅफे नसून हि एक विचारपद्धती आहे. जी खरंतर वर्षानु वर्षे पुढे चालत येत आहे, ती म्हणजे अतिथी देवो भवं! जसे आपल्या घरी पाहुणे येतात आणि आपण त्यांना आनंदाने जेऊखाऊ घालतो तसेच या कॅफेतही स्वयंसेवक स्वतःहून येतात,सर्व प्रकारचे
जेवण बनवतात, येणाऱ्या पाहुण्यांना स्वतःच्या कुटुंबातील सदस्यप्रमाणे मानून अतिशय प्रेमाने ते सर्व्ह करतात, आणि त्यानंतर ची स्वच्छता हि करतात मुख्य म्हणजे हे सगळं ते स्मितहास्यासह आनंदाने करतात.सेवा कॅफे अशा पद्धतीने निस्वार्थ भावनेने केल्या जाणाऱ्या आदरातिथ्याने येणारे हि आश्चर्यचकित होतात आणि स्वतःहून काही रक्कम जास्त गिफ्ट करतात असा इथल्या स्वयंसेवकांचा अनुभव आहे.हा एकप्रकारचा सामाजिक प्रयोगच आहे जिथे विद्यार्थ्यांपासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत,गृहिणीपासून ते अगदी परदेशी पर्यटकांपर्यंत एकच संदेश पोहोचतो कि खरा आनंद निस्वार्थ भावनेने दुसऱ्याला काहीतरी देण्यात आहे आणि या जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे.
या कॅफे तुन मिळणाऱ्या नफ्याची रक्कम ही काही संस्थांना मदत म्हणून दिली जाते.

तर अश्या या सेवा कॅफेत तुम्ही जेव्हा जाल, तेव्हा तुमच्या हातात बिल येईल ज्यावर 0 रुपये किमतीसह एक तळटीप लिहिलेली असेल,ती म्हणजे “आपलं जेवण हे आधी आलेल्या पाहुण्यांनी तुम्हाला गिफ्ट केलेलं आहे,म्हणून आम्ही तुम्हाला सुद्धा अशाच गिफ्ट ची साखळी अखंडित ठेवण्यासाठी आमंत्रित करत 
आहोत.” 

मित्रानो,व्यवसायामध्ये स्टॅंडर्ड प्रॉडक्ट पेक्षा नेहमी काहीतरी वेगळं देणं हे यशाचं हमखास उत्तर असतं.सेवा कॅफे ने केवळ रेस्टॉरंट या दृष्टीने बिजनेसकडे न बघता त्या मध्ये एक सामाजिक उपक्रम देखील गुंफला आहे. साहजिकच ग्राहक याकडे व्यवहार म्हणून न बघता एक सोशल कोज म्हणून बघतो. ग्राहकांची भावनिक गुंतवणूक मिळाल्यास एक दृढ नाते तयार होते आणि त्यामुळे ग्राहकांचा ओघ कधी ही कमी होत नाही.
गिफ्ट इकॉनॉमि ची आयडिया तुम्हाला देखील वापरता येते का पहा. 


================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================  

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect