सध्या भारतात अनेक स्टार्टअप निर्माण होत आहेत जे काही खास दृष्टिकोनातून आणि काही विशेष उद्दीष्ट समोर ठेवून बनवले जात आहेत.
’द अशिओतो (Ashioto) क्राउड अनॅलिटीक्स’ हे स्टार्टअप देखील एक असे उदाहरण आहे कि जे खास 2015 मध्ये झालेल्या नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या गर्दीसाठी बनवल गेलं. अशिओटो (Ashioto) म्हणजे जपानी भाषेत ‘पाऊल’.हि एक अशी खास मॅट (चटई) आहे जी एखाद्या ठिकाणी होणारी गर्दीची माहिती तिच्यामध्ये असलेल्या सेन्सर्स द्वारे एकत्रित करून गर्दीच व्यवस्थापन करण्यास मदत करते. 2015 मध्ये कुंभ मेळा हा पहिला कुंभ मेला होता ज्यात शून्य मनुष्यहानी झाली. याचे श्रेय जाते ते अतिशय तरुण अशा निलय कुलकर्णी आणि त्याच्या टीमला.मूळचा नाशिकचाच असणारा नीलय लहानपणापासूनच त्याच्या आजोबांकडून कुंभमेळा,त्यात होणारी गर्दी तसेच चेंगराचेंगरी याबद्दल ऐकत होता. 2013 च्या कुंभमेळ्यामध्ये जेव्हा 42 जण मृत्यूमुखी पडले आणि किमान 45 जण जखमी झाले तेव्हा मात्र यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी त्याने स्वतःला असलेल्या प्रोग्रामिंगचे ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेद्वारे या संकटावर मार्ग शोधण्याचा विचार केला आणि दरवर्षी होणाऱ्या भयानक मृत्यूचे निराकरण करण्याचे ठरवले.त्यावेळी तो अवघ्या पंधरा वर्षांचा होता. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ त्याने बनवलेली हि mat अतिशय वैशिट्यपूर्ण आहे.सेन्सर्स बसवलेल्या या मॅट्स कुंभमेळ्यात ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या. मॅट्स वर पडणाऱ्या पावलांचे सॉफ्टवेअर द्वारे संकलन करण्यात आले.अश्या रीतीने एखाद्या पॉईंट वर होणाऱ्या गर्दीचे मोजमाप करून गर्दीची माहिती पोलिसांना देण्यात आली.यामुळे गर्दीचे योग्य पद्धतीने निवारण करणे आणि चेंगराचेंगरी सारख्या समस्येवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले. अवघ्या अठरा वर्षाचा निलय त्याच्या स्टार्ट अप बिझनेसचा सॉफ्टवेअर प्रमुख म्हणून काम पाहतो. त्याच्या मते उद्योजक हा लोकांच्या समस्येवर विचार करून त्या आपल्या उद्योगातून सोडवण्याचा विचार करणारा असतो.दीर्घकाळ चालणाऱ्या व्यवसायाची उभारणी करणे तो व्यवसाय टिकवणे ही एक अशी गोष्ट आहे जी लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आणि तुमच्या उद्योगाबद्दल विश्वास तयार करण्यास मदत करते तसेच आज जे विद्यार्थी स्वतःच स्टार्टअप सुरू करण्याच्या दुविधेमध्ये आहेत त्यांनी आपल्या वयाचा विचार न करता नवीन निर्मिती सुरु ठेवावी,असे निलय कुलकर्णी त्याच्या tedtalk मध्ये या स्टार्टअप बद्दल बोलताना म्हणतो. (त्याचा व्हिडीओ ब्लॉग वर बघण्यासाठी क्लीक करा) ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |