Click hereमित्रांनो बिझनेस च्या नवनवीन आणि वेगळ्या कल्पना समोर नेटभेट तर्फे तुमच्या समोर आणतच असतो.आज या लेखामध्ये एका अनोख्या रेस्टॉरंट बिझनेस बद्दल माहिती देणार आहोत. नेटभेट च्या मागील काही लेखांमध्ये आपण सेवा कॅफे पाहिलं जिथे तुमचं जेवण हे आधी आलेल्या कस्टमर कडून गिफ्ट दिलेलं असतं तसेच मुंबईच्या 'मिरची अँड माईम' बद्दल आणि 'डायलॉगज इन द डार्क' अश्या अनोख्या रेस्टॉरंट बद्दल माहिती घेतली.
गुडगांवमध्ये, नुकतेच एक खास रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे. या रेस्टॉरंटचं नाव आहे ‘द पीपल अँड कंपनी’. या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपल्याला आपल्या खाण्याचे नाही तर आपण जितका वेळ जेवण्यासाठी घालवू त्याचे पैसे द्यावे लागतात,आहे ना काहीतरी वेगळं? ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ ‘द पीपल अँड कंपनी’मध्ये मुख्यतः इटालियन, भारतीय आणि चायनीज पदार्थ मिळतात. जे आपल्याला बुफे पद्धतीने वाढून घ्यायचे आहे. आपण आपली प्लेट निवडल्यानंतर आपला वेळ सुरू होतो.एकदा का अन्न संपवलं की आपला हात वर करायचा म्हणजे आपली वेळ थांबवली जाते.या रेस्टॉरंटमध्ये दर मिनिटासाठी साधारण 15 रुपये प्रति मिनिट या प्रमाणे शुल्क आकारणी केली जाते.अश्या प्रकारे डिश संपवण्यासाठी लागणाऱ्या एकूण वेळेनुसार आपलं फायनल बिल आपल्याला दिलं जातं. सध्यातरी हे रेस्टॉरंट आणि इथली वेगळी बिल पद्धत हा चर्चेचा विषय ठरला आहे.नेहमीच्या संकल्पनेला छेद देऊन नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे हे बिझनेस साठी नेहमीच फायद्याचे ठरते.चोखंदळ ग्राहकांचा अश्या गोष्टींना उत्तम प्रतिसाद देखील मिळत राहतो. हॉटेल बिझनेस मध्ये raw material (variable cost) पेक्षा जास्त खर्च रिअल इस्टेट (fixed कॉस्ट) चा असतो. द पीपल अँड कंपनी’ ने नेमकी हीच गोष्ट ओळखून जेवढा वेळ ग्राहक रिअल इस्टेट वापरतील तेवढे पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. आपण देखील आपल्या बिझनेस मध्ये fixed cost कशी लवकर भरून काढत येईल याचा विचार केला पाहिजे. व्यवसाय लवकरात लवकर नफ्यात आणण्याचा तो एकमेव मार्ग आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com to edit. |