महेंद्रसिंग धोनीने २००४ साली बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात पदार्पण केले.फलंदाजीचा क्रमांक होता 7. दुर्दैवाने त्याला पहिल्याच बॉल वर रनआऊट होऊन परतावे लागले.बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 12 रन्स केले,फलंदाजी क्रमांक 7. तिसऱ्या सामन्यात जास्त वेळ खेळता आले नाही, शेवटच्या 2 बॉल्स मध्ये 7 नाबाद धावा आणि फलंदाजी क्रमांक 7. महेंद्रसिंग धोनी 7 व्या क्रमांकला फलंदाजी ला येण्याचं कारण म्हणजे भारताची फलंदाजी ऑर्डर जी की आधीपासून फिक्स्ड होती ती म्हणजे सेहवाग, सचिन,सौरव,द्रविड,युवराज आणि कैफ. अर्थात धोनी नवीन खेळाडू होता त्यामुळे त्याला अशी तगडी बॅटिंग लाइन मोडून वरच्या क्रमांकावर खेळवणे शक्य नव्हते. कारकीर्दीच्या पहिल्या 3 मॅचेस मध्ये त्याला स्वतःला फारसे सिद्ध करता आले नाही पण तरीही त्याला पुढच्या पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी अजून एक संधी देण्यात आली.पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 7 व्या क्रमांकावर खेळत त्याने फक्त 3 रन्स केले आणि पुन्हा एकदा अपयशी ठरला. आतापर्यंतचा धोनीचा स्कोअर होता 4 मॅचेस मिळून 22 रन्स. राहुल द्रविड ने स्वतःच्या फलंदाजीच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विकेट किपिंग करण्याची जबाबदारी आधीच सोडली होती.भारतीय टीमला एका विकेटकीपरची आणि जो चांगली बॅटिंगही करेल अशा खेळाडूची आवश्यकता होतीच.पण धोनी या दोन्ही गोष्टी करत असूनही त्याची निवड काही खास रिझल्ट्स देत नव्हती.तो टीम मध्ये असल्याने किंवा नसल्याने भारतीय टीम ला आणि प्रेक्षकांना काही खास फरक पडणार नव्हता कारण त्याची टीम मधली किंमत अजून कोणाला फारशी कळली नव्हती. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ त्याच्या अपयशाचं मुख्य कारण होतं ते म्हणजे त्याचा फलंदाजला येण्याचा नंबर -7 वा नंबर.तो अशा नंबर वर खेळत होता जिथे तुम्हाला पिच वर सेटल व्हायला फार वेळ मिळत नाही आणि त्यात तुम्हाला मोठे शॉट्स मारून जास्तीत जास्त रन्स मिळवणे गरजेचे असते.आधीचे धुरंधर फलंदाज चांगले खेळत असताना धोनीला वरच्या नंबरवर फलंदाजीला पाठवणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत सौरव गांगुली या महान लीडरने काय केले असेल? वीरेंद्र सेहवाग साठी सौरव गांगुलीने स्वतःचा बॅटिंग नंबर आधी सोडला होता हे तर सर्वज्ञात आहेच. 5 एप्रिल 2005 ला गांगुलीने पुन्हा एकदा त्याची 3 नंबरची पोझिशन धोनी साठी देऊ केली. विशाखापट्टणमच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनी तिसऱ्या स्थानावर खेळण्यास आला आणि सर्वांनाच आश्चर्य वाटलं.पण यावेळेस त्याला स्वतःला सिद्ध करायला पुरेसा वेळ आणि संधी दोन्ही गोष्टी मिळाल्या होत्या.त्याने बॉल रुपी आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं 123 बॉल्स मध्ये 148 रन्स काढत त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला होता.अर्थातच निवड समितीला पुढच्या 5 सामन्यांसाठी धोनीची निवड करण्यात काहीही संभ्रम नव्हता. त्यावेळेस सौरव गांगुलीने धोनीला तिसऱ्या नंबर वर पाठवण्याचा निर्णय का आणि कसा घेतला हे केवळ गांगुलीच सांगु शकेल पण त्याचा हा निर्णय मात्र भारतीय क्रिकेटच्या भविष्याला कलाटणी देणारा ठरला हे मात्र नक्की.एक चांगला आणि उत्तम लीडर तोच ठरतो जो फक्त त्याला फ़ॉलो करणारे सहकारी तयार करत नाही तर त्यांच्यासारखेच किंबहुना त्याच्याहुन चांगले लिडर्स तयार करतो. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com |