• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

बिझनेस प्लान म्हणजे काय व त्यात काय लिहावे ?

10/26/2018

Comments

 
If you fail to plan, then you are planning to fail.

नमस्कार मित्रांनो,

बिझनेस सुरू करण्याची इच्छा बऱ्याच जणांना असते परंतु त्यासाठी योग्य प्रकारे योजना आखणे म्हणजेच बिझनेसचे प्लॅनिंग करणे मात्र प्रत्तेकाला जमतेच असे नाही. बऱ्याच जणांना तर बिझनेस प्लॅन ची गरज आहे तेच माहीत नसते.

मित्रानो बिझनेसचं प्लॅनिंग करणे अत्यंत आवश्यक आहे कारण बिझनेस प्लॅन हा तुमच्या बिझनेस बद्दल काही उत्तरं देतो, काही प्रश्न महत्वाचे असतात जे तुमच्या बिझनेस बद्दल इन्व्हेस्टरला जाणून घ्यायचे असतात. बँक किंवा इन्व्हेस्टर यांना तुमच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवण्याआधी तुमच्या बिझनेसची माहिती देणं गरजेचं असतं. तुम्ही काय आणि कसे करणार आहात ते पाहायचं असतं. आणि त्यामुळे बिझनेस प्लॅन हे असं डॉक्युमेंट असतं, जे तुमच्या इन्वेस्टर्सला किंवा प्लॅन वाचणाऱ्या कोणालाही पाच प्रश्नांची उत्तरं देतं आणि ते प्रश्न म्हणजे Why ,What ,Who, When आणि How !

👉तुम्ही बिझनेस का करताय ? (Why)
👉तो नक्की कसला बिझनेस आहे? (What)
👉नक्की हा बिझनेस कोण करणार आहे? (Who)
👉तो बिझनेस कधी प्रॉफिट करायला सुरुवात करणार आहे? किंवा कधी रेव्हेन्यु मिळविणार आहे? (When)
👉आपण तो बिझनेस कसा करणार आहात? (How)

हे अगदी महत्वाचे प्रश्न आहेत. कारण तुम्ही बिझनेस कसा करणार आहात हे इन्व्हेस्टरला आणि सर्व स्टेक होल्डर्सना जाणून घ्यायचं असतं. आणि त्यासाठी बिझनेस प्लॅन हा महत्वाचा असतो.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही तुमच्या बिझनेस प्लॅन मध्ये असली पाहिजेत. बिझनेस प्लॅन म्हणजे काय आणि त्यामध्ये काय लिहाल? हे आम्ही नेटभेटच्या वाचकांसाठी या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.
प्रत्येक उद्योजकाने नक्की पाहिलाच पाहिजे असा हा विडिओ जरूर पहा आणि आपल्या इतर उद्योजक मित्रांसोबत जरूर शेअर करा !👍
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect