|
आपलं मन जे विचार करतं आणि ज्यावर विश्वास ठेवतं ते साध्य होतेच.
मित्रानो आज डिजिटल आणि सोशल मीडियामुळे फक्त एखाद्याचे व्यक्तिगत आयुष्यच नव्हे तर एखाद्या देशाचे राजकीय भविष्य देखील किती मोठ्या प्रमाणात बदलू शकते याची कल्पना आजचा हा लेख वाचल्यावर तुम्हाला येईल. युक्रेन या देशामध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. एक विनोदी अभिनेता वोलोडायमिर झेलेन्स्की(वय 41) हे 73%मतांनी विजयी झाले आहेत.आश्चर्याची गोष्ट हि आहे कि झेलेन्स्की यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते तर त्यांनी ‘सर्व्हन्ट ऑफ द पीपल’ या टीवी मालिकेत ‘वासिल होलोबोरोड्को’ नावाच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती,जो भ्रष्टाचाराविरुद्ध भाषण करतो.या शिक्षकाचे हे भाषण मालिकेमध्येच सोशल मिडियावर व्हायरल होते आणि ते मालिकेमध्येच देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. या टीव्ही शोमुळे वर्तमान सरकार आणि त्याचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांविरुद्ध असंतोष वाढू लागला. साहजिकच ‘सर्व्हन्ट ऑफ द पीपल’ या मालिकेच्या लोकप्रियेत वाढ झाली. पुढे या टीव्ही शो मध्ये झेलेन्स्की यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिलेला दाखवला आहे त्यामुळे त्यांची तशी प्रतिमा होत गेली. गेल्यावर्षीच निवडणूकपूर्व चाचणी मध्ये झेलेन्स्की हे सर्वाधिक मतांनी निवडून येणार असे आढळले होते. पण गमतीची गोष्ट म्हणजे त्यावेळेस ते निवडणुकीसाठी उभे देखील राहिले नव्हते.त्यांना मत देणे म्हणजे विद्यमान सरकारचा धिक्कार करणारे मत(जसे आपल्याकडे NOTA हा पर्याय असतो.)असे मानून लोकांनी त्यांना भरघोस मते दिली आणि खरोखरच ते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ टीव्ही शो सारखच त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव देखील तेच होते ‘सर्व्हन्ट फॉर द पीपल’. आणि त्याचा मुख्य फोकस हा टीव्ही मालिकेसारखाच भ्रष्टाचाराला विरोध हाच होता. निवडणुकीआधी त्यांनी एकही टीव्ही मुलाखत दिली नाही आणि तत्कालीन राष्टध्यक्षांसोबत कोणताही वादविवाद केला नाही.पारंपरिक राजकीय प्रचार न करता त्यांनी स्टेज शोज केले ज्यामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढा कसा देणार याचे नाट्य रूपांतर दाखवले जायचे. हि अनोखी कल्पना जनतेला खूपच आवडली. त्यांच्या राजकीय अजेंड्याबद्दल फक्त YouTube आणि Instagram वर पोस्ट केले गेले. खरंतर याची सुरुवात एक विनोद म्हणून झाली होती.पण बघता बघता सर्व राजकारण्यांना धक्का देणारा निर्णय जनतेने दिला.१०० वर्षांपूर्वी नेपोलियन हिल यांनी अनेक यशस्वी लोकांचा अभ्यास करून यशाचे रहस्य नेमके कशात असते ते सांगितले होते त्याला द कार्नेगी सिक्रेट (The Carnegie Secret)म्हणतात जे एका वाक्यात सांगायचं तर असं आहे कि ‘आपलं मन जे विचार करतं आणि ज्यावर विश्वास ठेवतं ते साध्य होतेच.’ आज, सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने कमीतकमीवेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि गोष्टी व्हायरल होणे खूप सोपे झाले आहे त्यामुळे कोणतेही अशक्य वाटणारे स्वप्न खऱ्याखुऱ्या आयुष्यात जगणेही शक्य नक्कीच झाले आहे.व्होडायमीर झेलेंस्की यांना जिंकल्यानंतर कसे वाटले असे विचारल्यावर त्यांचे उत्तर होते,"एक युक्रेनियन नागरिक म्हणून मी सर्व जगाला सांगू शकतो, या जगात सर्व काही शक्य आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |