• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

बरेच ड्रॉप आऊटस काही क्षेत्रात उत्तम कामगिरी कशी करतात

5/13/2019

Comments

 
Picture
आपल्याकडील शिक्षण पद्धती हि फक्त पदवी मिळवण्यासाठी उपयोगी पडते,आज बऱ्याच क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पदवी किंवा परवाना आवश्यक असतो आणि म्हणून आपण शिकतो . शाळा ,कॉलेज मधील शिक्षण हे मोठ्या प्रमाणात माणसांमधील सर्जनशीलतेला वाव देत नाही किंबहुना नवीन काहीतरी निर्माण करण्याच्या क्षमतेला,नवनवीन कल्पनांना मारक ठरते.

म्हणूनच जेव्हा आपण इतिहासात डोकावतो तेव्हा असे कितीतरी प्रतिभावान आणि खूप मोठी माणसे आपल्याला आढळतात जी त्यांच्या शालेय किंवा महाविद्यलयीन आयुष्यात अजिबातच चमकदार नव्हती किंवा बहुतेकांनी शाळा कॉलेज सोडून देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम केले आहे आणि ती आज खूप मोठी व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्यासमोर आहेत.सगळ्यात आधी आताची शिक्षण पद्धती का आणि कशी अस्तित्त्वात आली हे समजून घेऊयात.

जगातील सर्वात मोठी कार कंपनी फोर्ड आणि तिला नावारूपाला आणणारा हेन्री फोर्ड.त्याने 1908 साली  ‘मॉडेल टी’ हे कार मॉडेल बाजारात आणलं .अनेक दशकांपासून, जवळजवळ1972 पर्यंत मॉडेल टी हि इतिहासातील सर्वात जास्त विकली गेलेली कार होती. .मॉडेल टी बाजारात येण्याच्या आधी, कार हि एक लक्झरी वस्तू होती. 1909 मध्ये मॉडेल टी कारची किंमत 825 डॉलर होती. 1925 पर्यंत फोर्डने किंमत 265 डॉलर कमी केली. हे कसे शक्य झालं?
फोर्डने गाडीचा शोध नाही लावला तर त्याने उत्पादन लाइन तयार केली जी आतापर्यंतची सर्वात परिणामकारक आणि अतिशय महत्तवाची निर्मिती प्रक्रिया ठरली.या असेम्ब्ली लाइन मॉडेलने जगाची अर्थव्यवस्था बदलवून टाकली .

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================


असेम्ब्ली लाइनमुळे उत्पादनाचा वेग प्रचंड वाढला व कामगारांच्या कौशल्यांपेक्षा सांगितलेले काम करण्याच्या वृत्तीला महत्त्व प्राप्त झाले.यावर उपाय म्हणून त्यावेळच्या अशा औदयोगिक क्षेत्रातील मोठमोठ्या सम्राटांनी लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी विद्यापीठांमध्ये त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाची निर्मिती केली.याचा परिणाम असा झाला कि अशा शाळा,कॉलेजातून फक्त सांगितलेलं काम करणारे कामगार तयार होऊ लागले आणि तीच शिक्षण पद्धती आजही चालू आहे.

आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे कि शाळेतील बरेच ड्रॉपआउटस काही क्षेत्रांमध्ये उच्च कामगिरी कशी आणि का करतात? याचं उत्तर म्हणजे विचार करण्याचं आणि त्याप्रमाणे कृती करण्याचं स्वातंत्र्य.मनापासून एखादी गोष्ट केल्याने आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि अनुभव मौल्यवान धडे शिकवतात आणि अधिक समृद्ध बनवतात.स्वयं-शिक्षित ड्रॉपआउट्स स्वतःला काय वाटतं याचा आधी  विचार करतात.एखादी समस्या सोडवण्यासाठी ठराविक साचेबद्ध सुचनांचे पालन न करता समस्या कश्या सोडवाव्या हे स्वतः विचार करतात आणि त्यातूनही शिकत राहतात. नवनवीन गोष्टी कशा तयार कराव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वेगळ्या पद्धतीने विचार कसा करावा हे शिकतात!

म्हणूनच केवळ मार्क्स देणारे पदवी मिळवून देणारे शिक्षण येत्या काही वर्षांमध्ये निरुपयोगी ठरणार आहे.तेव्हा आपण शिक्षण पद्धतीत लवकरच बदल  केला पाहिजे.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com



Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect