• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Picture

    ​रजिस्ट्रेशन फॉर्म !

Submit

नमस्कार मित्रहो,

प्रत्येक बिझनेसच्या ऑनलाईन प्रवासाची सुरुवात होते “वेबसाईट” पासून. प्रत्येक बिझनेस आपल्या वेबसाईट साठी दरवर्षी काही हजार रुपये खर्च करत असतात. पण आपण या वेबसाईट मधून किती ग्राहक मिळवत आहोत असा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का ?

वेबसाईट म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी दिवसाचे २४ तास , वर्षाचे ३६५ दिवस काम करणारी एक सेल्समशीन आहे, अशा या सेल्समशीनला अद्ययावत ठेवणे अतिशय गरजेचे आहे. बऱ्याचदा वेबसाईट बनवून घेतली जाते आणि त्यानंतर अपडेट होत नाही. वेबसाईट मध्ये नक्की काय लिहायचे, कसे लिहायचे याबद्दल शास्त्रशुद्ध माहितीच नसते. त्यामुळे केवळ एक सोपस्कार म्हणून वेबसाईट राहते, तिचं सेल्समशीन मध्ये रुपांतर होतच नाही.
जर तुम्ही स्वतः हे शिकून घेतलंत तर हजारो रुपयांची दरवर्षी बचत करू शकता. आणि मुख्य म्हणजे व्यवसायासाठी आणखी ग्राहकही मिळवू शकता.


म्हणूनच नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवी मराठी कार्यशाळा ! “Website For Business" !

या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने खालील गोष्टी मराठी भाषेतून शिकता येतील 
  • कोणताही कोड न लिहिता वेबसाईट कशी बनवायची, 
  • आपल्या वेबसाईट मधून ग्राहक कसे मिळवायचे, 
  • गुगल सर्च मध्ये वेबसाईट सगळ्यात पुढे दिसण्यासाठी SEO कसे करावे 
  • आपल्या वेबसाईटचे Android app बनवून ग्राहकांच्या मोबाईल मध्ये कसे जाऊन बसायचे 
  • घरबसल्या पैसे कमावून देवू शकणारा “वेब डेव्हलपमेंट” चा व्यवसाय कसा सुरु करावा 
(* या कार्यशाळेमध्ये html/css वा इतर कोणतेही कोडींग शिकविण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.​

ही कार्यशाळा "मी" का करावी ?

माझ्या व्यवसायाची वेबसाईट आहे
  • वेब डीझायनर्सला दरवर्षी हजारो रुपये द्यावे लागतात ?
  • वेबसाईट तर बनली पण त्यामधून ग्राहक मिळत नाहीत ?
  • प्रत्येक छोट्या छोट्या बदलासाठी वेब डीझायनर कडे सतत जावे लागते?
  • वेबसाईट मोबाईल मध्ये बरोबर दिसत नाही ?
  • वेबसाईट गुगल सर्च मध्ये दिसत नाही ?
वरील प्रश्नांची उत्तरे "हो" अशी असतील तर ही कार्यशाळा तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल


माझ्या व्यवसायासाठी वेबसाईट नाही​
  • ग्राहक पहिल्यांदा वेबसाईट आहे का विचारतात ?
  • ऑनलाईन अस्तित्व नसल्याने बिझनेस मिळत नाही ?
  • वेब डीझायनर अव्वाच्या सव्वा फी सांगतात ?
  • पैसे देऊनही वेबसाईट डीझायनर बरोबर काम करेलच याची शाश्वती नाही ?
वरील प्रश्नांची उत्तरे "हो" अशी असतील तर ही कार्यशाळा तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल
​माझा व्यवसाय नाही, पण सुरु करायचा आहे
  • पार्ट टाईम किंवा फुल टाईम व्यवसाय करायचा आहे ?
  • कमीत कमी इन्वेस्टमेंट मध्ये बिझनेस सुरु करायचा आहे ?
  • घरुनच करता येईल असा बिझनेस पाहिजे ?
  • नोकरी/घरकाम सांभाळून अधिक उत्पन्न देऊ शकेल असा व्यवसाय पाहिजे ?
  • पुर्णवेळ काम न करता, फ्रीलान्सर म्हणून आपल्या वेळेनुसार करता येईल असे काम पाहिजे ?
वरील प्रश्नांची उत्तरे "हो" अशी असतील तर ही कार्यशाळा तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल

दोन दिवसांचा सविस्तर अभ्यासक्रम - ​
​
दिवस पहिला -
  1. वेबसाईट बद्दल मुलभूत माहिती (Understanding Basics of Websites)
  2. ब्लॉग आणि वेबसाईट मधील फरक (Difference between Blog and websites)
  3. ब्लॉगिंगची साधने आणि धोरणे (Blogging Tools and strategies)
  4. Practicals - आपला ब्लॉग तयार करणे (Create your blog)
  5. वेबसाईटचे बिझनेससाठी महत्व (Importance of Website for Business)
  6. वेबसाईटचे नाव आणि होस्टिंग (Domain name and hosting)
  7. वेबसाईटचे प्रकार - Single page, CMS, Membership Sites
  8. Practical - कोणताही कोड न लिहिता वेबसाईट तयार करणे (Designing your own website without code)
  9. स्वतःची ऑनलाईन ईकॉमर्स वेबसाईट तयार करणे (Creating Ecommerce website without code)​
दिवस दुसरा -
  1. ग्राहकांना खिळवून ठेवण्यासाठी वेबसाईट मध्ये कशाकशाचा समावेश असावा? (Best Practises in web designing)
  2. Practical - लोगो तयार करणे (Logo Design)
  3. वेबसाईटसाठी चांगल्या इमेजेस तयार करणे (Designing graphics for your website)
  4. वेबसाईट साठी मसुदा लिहिणे (Content Writing)
  5. व्यवसायाच्या नावाचा इमेल पत्ता तयार करणे उदा. [email protected] (Email system with company domain)
  6. गुगल सर्च मध्ये वेबसाईट सगळ्यात पुढे दिसण्यासाठी SEO करणे (Search Engine Optimisation strategies)
  7. Practical - SEO
  8. ग्राहक मिळविण्यासाठी वेबसाईटचा वापर करणे (Growing your business with websites)
  9. आपल्या वेबसाईटचे android app तयार करणे (Launching your website on Google Play as an android app)​

# दोनीही दिवस प्रॅक्टीकल्स साठी संगणक आणि इंटरनेट जोडणी देण्यात येतील.
# कार्यशाळेनंतर ६० दिवसांचा मोफत सपोर्ट देण्यात येईल
# दोनीही दिवस चहा, नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात येईल
# 
कार्यशाळेत सहभागी झाल्याचे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल
# नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे रु.६७५०/- किमतीचे ऑनलाईन कोर्सेस 
​एका वर्षासाठी मोफत देण्यात येतील.

ही कार्यशाळा कोणासाठी आहे ?
  • तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही "फ्रीलान्सर" म्हणून काम करत आहात ?
  • तुमच्या व्यवसायासाठी वेबसाईट बनवायची आहे ?
  • किंवा तुम्हाला "वेब डेवलपमेंट" चा पार्ट टाईम/ फुल टाईम व्यवसाय सुरु करायचाय ?
  • तुम्ही कॉलेज स्टुडंट / गृहीणी / निवृत्त आहात, आणि घरबसल्या पैसे कमवून देवू शकणारा "वेब डेवलपमेंट"चा व्यवसाय सुरु करायचा आहे ?
तर मग ही कार्यशाळा तुमच्यासाठी आहे.

स्थळ - कल्याणी नगर, पुणे​ (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर देण्यात येईल)
तारीख - १७ आणि १८ नोव्हेंबर, २०१८ 
प्रशिक्षक - सलिल सुधाकर चौधरी ( Founder - Netbhet Elearning Solutons)

    ​रजिस्ट्रेशन फॉर्म !

Submit
कोर्सची फी आणि आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आजच 908 220 5254 या क्रमांकावर whatsapp/ फोन करा. 

धन्यवाद,

टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

Workloft, 61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west
www.netbhet.com
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect