(डॉ. वाय. एल. आर. मूर्ती यांच्या संदेशावर आधारीत. डॉ. वाय. एल. आर. मूर्ती, इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगलोर इथं प्राध्यापक आहेत. त्यांनी आय. आय. टी., मद्रासयेथून एम. टेक. तसेच आय. आय. एम., बेंगलोर येथून व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.) शिकारी की सावज? भारतामध्ये आजमितीला सर्वाधिक कॅमेरा विक्री कोण करतं? तुम्ही म्हणाल – सोनी, कॅनॉन अथवा निकॉन. अंहं, यापैकी कुणीही नाही. बरोबर उत्तर आहे - नोकीया ! होय, नोकीया, जिचंभारतातील मुख्य उद्योग-क्षेत्र कॅमेरा नसून मोबाईल फोन आहे. याचं कारण म्हणजे, फक्त कॅमेर्याऐवजी कॅमेरा असलेल्या मोबाईल फोन्सची वाढती विक्री होय. मग हे मोबाईल फोन पूर्णपणेकॅमेर्याची जागा घेऊ शकतील काय? अर्थातच! सोनी आणि कॅनॉन यांना या गोष्टीची जाणीव असावी, अशी आपण आशा करु. आता हेच पहा. भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? तुम्हाला काय वाटतं, एचएमव्ही-सारेगामा? चूक. तीकंपनी आहे - एअरटेल! तासन्तास चालणारे म्युझिक अल्बम्स विकून म्युझिक कंपन्या जेवढं कमवत असतील त्यापेक्षाकितीतरी जास्त एअरटेल कमवतं, तेही ३० सेकंद वाजणार्या कॉलर ट्यून्स विकून. वास्तविक, एअरटेल काही संगीत उद्योगात नाही. ती भारतातील सर्वाधिक ग्राहकवर्गाला मोबाईल सेवा पुरविणारी कंपनी आहे. अशाप्रकारचा प्रतिस्पर्धी ओळखणं महाकठीण काम आहे, आणि त्याला मागं टाकणं तर त्याहून कठीण (तुम्ही त्याला ओळखेपर्यंत तोतुम्हाला मागं टाकून बराच पुढं गेलेला असतो). पण म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की नोकीया आणि भारती (एअरटेल चीमूळ कंपनी) अगदी निवांत असतील, तर तुमचा अंदाज पुन्हा चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. आपण स्मार्टफोनच्या बाबतीत पूर्ण गाफील राहीलो, हे नोकीयानं कबूल केलं आहे. ऍपलचा आयफोन आणि गुगलचे ऍन्ड्रॉईड,नोकीयासाठी भविष्यातील मोठी डोकेदुखी ठरु शकतात, हे त्यांना कळून चुकलं आहे. पण गुगल ही तर मोबाईल कंपनी नाहीचमुळी? याचाच अर्थ, ही उदाहरणं एका अजून मोठ्या कोड्याकडं अंगुलीनिर्देश करत आहेत. हे फक्त मोबाईल, संगीत, कॅमेरा किंवाईमेल पुरतं मर्यादीत नाही. "भविष्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिगत डिजिटल उपकरण (पर्सनल डिजिटल डिव्हाईस) कोणतं?" यासाठी हे महाभारत चालूआहे. काय असेल ते - टेलिफोनसहित अधिक वेगवान मोबाईल किंवा पामटॉप? या छोट्या-छोट्या लढाया मिळून एकामहायुद्धाकडं संक्रमित होत आहेत. या सर्व लढायांमागं एक यक्षप्रश्न आहे - “कोण आहे माझा प्रतिस्पर्धी?” माझ्या विद्यार्थ्यांना डिवचण्यासाठी मी अधून-मधून एक प्रश्न विचारत असतो - “ऍपलनी जे सोनीबरोबर केलं, तेच सोनीनंकोडॅकबरोबर केलं, कसं ते स्पष्ट करा?” काही हुशार विद्यार्थी लगेच उत्तर देतात. सोनीनं आपलं कार्यक्षेत्र श्राव्य माध्यमाभोवती(ऑडीयो) आखून घेतलं (वॉकमन मधून संगीत ऐका). ऍपलसारखी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आपल्या कार्यक्षेत्रातशिरकाव करु शकेल, याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. जरा विचार करुन पहा, हे खरंच इतकं अशक्य होतं का? संगणकबनविणार्या ऍपलकडं दोन्ही दृक्-श्राव्य माध्यमांची क्षमता आहे. मग केवळ श्राव्य माध्यमात ऍपल आपल्याशी स्पर्धा करुशकणार नाही, असं सोनीला का वाटलं? सोप्पं आहे - कोडॅकनं जेव्हा आपलं कार्यक्षेत्र फिल्म कॅमेर्यापुरतं मर्यादीत ठेवलं, तेव्हासोनी 'डिजिटल' म्हणून विस्तारत गेले. डिजिटल कॅमेर्याच्या कक्षेत ही दोन्ही क्षेत्रं मिसळून गेली. डिजिटल मध्ये प्रवेश करुनकॅमेरा फिल्मवर गुंतवलेल्या पैशावर पाणी सोडायचं, की फिल्म मध्येच राहून डिजिटल च्या स्पर्धेतून बाहेर पडायचं, या द्विधेतकोडॅक अडकून पडलं. निर्णयाअभावी त्याची दोन्हीकडं पीछेहाट झाली. साहजिकच आहे. "उद्या माझा प्रतिस्पर्धी कोण असणारआहे?” हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारलाच नाही. हीच गत आयबीएम ची झाली, ज्यांनी मेनफ्रेम कॉम्प्युटरच्या उत्पन्नापुढंपीसीच्या (पर्सनल कॉम्प्युटर) उदयाकडं दुर्लक्ष केलं. हीच गत बिल गेट्सची झाली, ज्यांनी आधी इंटरनेट ला एक 'फॅड' ठरवलं,आणि मागाहून नेटस्केपला संपविण्यासाठी विंडोजमध्ये इंटरनेट ब्राउजर गुंडाळून विकलं. आजचा प्रतिस्पर्धी कोण, हा मुद्दाच गौणआहे. आजचा प्रतिस्पर्धी कोण हे उघड आहे, तर उद्याचा कोण हे गुपित! २००८ मध्ये ब्रिटिश एअरवेजचा भारतातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण होता? सिंगापूर एअरलाईन्स? की इंडीयन एअरलाईन्स?असतीलही, परंतु या प्रश्नाचं अचूक उत्तर वेगळंच काहीतरी आहे. वर उल्लेख केलेल्या व न केलेल्याही सर्व एअरलाईन्ससाठीधोकादायक प्रतिस्पर्धी आहेत – एचपी आणि सिस्को च्या व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग व टेलिप्रेझेन्स सुविधा! जागतिक मंदीमुळंव्यावसायिक वाहतूक घटली. प्रवास खर्चात कपात करण्यासाठी, भारतातील व बाहेरील वरीष्ठ आयटी अधिकार्यांनाव्हिडिओ-कॉन्फरन्सिंग वापरण्याच्या सूचना त्यांच्या मुख्य कार्यालयांकडून देण्यात आल्या. इतकंच नव्हे तर, अमेरीकनव्हिसासाठी भारतीय तंत्रज्ञांची उडणारी झुंबड २००८ मध्ये बिल्कुल दिसली नाही. (भारतासाठी ६५,००० युएस व्हिसांचा कोटाउपलब्ध आहे. युएसकडूनच उलट विनंत्या येऊ लागल्या, हा मंदीचाच महिमा!) इथंपर्यंत ठीक आहे. पण मंदीनंतर विमानवाहतूक कंपन्या पुन्हा जोरात येतील, यात मला तरी तथ्य वाटत नाही. थोड्या कालावधीसाठी येतीलही; परंतु दीर्घकाळासाठीनक्कीच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, भौतिकशास्त्राबाहेर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कुठं लागू होत असेल तर तोइलेक्ट्रॉनिक उपकरणांना. १९७७ आणि १९९१ दरम्यान (आता हद्दपार झालेल्या) व्हीसीआर च्या किमती त्याच्या मूळ किमतीच्याएक तृतीयांशपर्यंत घसरल्या होत्या. पीसीच्या किंमती काही लाख रुपयांवरुन काही हजार रुपयांपर्यंत उतरल्या. असाच कल राहिलातर टेलिप्रेझेन्सच्या किंमती देखील कोसळतील. मग उपरोल्लेखित विमान वाहतूक कंपन्यांची काय अवस्था होईल? तसंहीत्यांच्यापैकी बहुतेक कंपन्या पिछाडीसच आहेत. असं काही झालं तर त्या भूतकाळात जमा व्हायला वेळ लागणार नाही. भारतीयांना दोन गोष्टींचं प्रचंड वेड आहे. चित्रपट आणि क्रिकेट. ही दोन्ही पूर्णतः भिन्न क्षेत्रं होती. तशीच त्यातील श्रद्धास्थानंहीनिराळी होती. सचिन आणि सेहवाग हे क्रिकेटचे देव होते. (आमीर खान, शाह रुख खान आणि त्यांच्या मागोमाग इतर) खान हेचित्रपटांचे नियंते होते. क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेट किंवा फार तर ५० षटकांचे क्रिकेट होते. मग आयपीएल चा उदय झालाआणि ही दोन्ही क्षेत्रं एकजीव झाली. आयपीएलनं क्रिकेटला २० षटकांपर्यंत खाली ओढलं. एकाएकी आयपीएलचा सामना ३तासांच्या चित्रपटांइतका छोटा वाटू लागला. क्रिकेट चित्रपटाचं प्रतिस्पर्धी बनलं. आयपीएल सामन्यांच्या दिवशी चित्रपटगृहं ओसपडू लागली. आपला प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी मल्टीप्लेक्सच्या मालकांनी चित्रपटगृहांमध्ये आयपीएल सामने प्रदर्शितकरण्याचे हक्क मागून घेतले. जर आयपीएल हाच क्रिकेटचा मुख्य प्रवाह बनणार असेल, आणि तशीच शक्यता दिसत आहे, तरचित्रपटांना आयपीएल सामन्यांच्या सोयीनुसार आपल्या प्रदर्शन तारखा जुळवून घ्याव्या लागतील. प्रेक्षकांच्या दृष्टीनं दोन्हीही ३तासांचे तमाशेच आहेत. क्रिकेटचा हंगाम चित्रपटांना भारतीय बाजारपेठेतून हद्दपारही करु शकेल. गेल्या २० वर्षांमध्ये भारतातून गायब झालेली उत्पादनं आठवून बघा. तुम्ही शेवटचा कृष्ण-धवल (ब्लॅक-एंड-व्हाईट) चित्रपटकेव्हा बघितला होता? तुम्ही शाईचं पेन अखेरचं केव्हा वापरलं होतं? तुम्ही टाईपरायटर वर अखेरचं टायपिंग केव्हा केलं होतं? यासर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे, “आठवत नाही!” थोड्या कालावधीसाठी नेहमीच्या टाईपरायटरला नाममात्र पर्याय म्हणून थोडीफारसंग्रहक्षमता (मेमरी) असणारा एक इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर उपलब्ध होता. त्यानंतर आला संगणक, आणि ही सर्व उत्पादनंहद्दपार झाली. आज माझ्यासारखी सराईत तंत्रज्ञ नसणारी माणसं देखील संगणकाचाच सुधारीत टाईपरायटर म्हणून वापर करतात.टाईपरायटर मात्र कुठंच दिसत नाही. एक शेवटचं उदाहरण. २० वर्षांपूर्वी, सकाळी उठण्यासाठी भारतीय जनता काय वापरत होती? उत्तर आहे, “गजराचं घड्याळ”. हेगजराचं घड्याळ म्हणजे छोट्या छोट्या यांत्रिक अवयवांचा एक अवाढव्य राक्षस होता. चालू राहण्यासाठी त्याला रोज चावी द्यावीलागे. गजर देताना त्याचा एवढा आवाज होई की, तुमच्याबरोबर अख्ख्या कॉलनीची झोपमोड होई. त्यानंतर अजून छोटी आणिसुंदर घड्याळं आली. ही बर्यापैकी नाजूक असूनदेखील त्यांना सवयीनं "गजराचं घड्याळ"च म्हटलं जायचं. आज आपण सकाळीउठण्यासाठी काय वापरतो? मोबाईल फोन! या मोबाईल फोनच्या कृपेनं अख्खा घड्याळ उद्योग अवकाळी झोपला. टायटन सारख्याबड्या कंपन्यांनाही याचा फटका बसला. तुमचा प्रतिस्पर्धी कुठल्या कोपर्यात दडून बसलाय याची तुम्हाला कल्पनाच नाही! गंमत म्हणून विचारतो, लेखकांचा प्रतिस्पर्धी कोण असू शकतो? विनोद सांगणारी यंत्रं? (ऍपलचा सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नीकयानं टेलीफोनलाच, पोलीश भाषेत विनोद सांगणारं एक यंत्र जोडून टाकलं.) की त्यांची स्पर्धा गोष्टी सांगणार्या यंत्रमानवांशीअसेल? भविष्य भयंकर दिसतंय! एका आयटी कंपनीच्या अधिकार्यानी या स्पर्धेबद्दल सूचकपणे म्हटलं आहे, “शिकारीबना...नाहीतर...सावज बनाल!” हेच या गोष्टीचं समर्पक तात्पर्य आहे. धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |