• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

गोष्ट एका असामान्य उद्योजीकेची !

9/19/2015

Comments

 
Picture
मित्रहो, आज आपण एका अशा स्त्रीसंबंधी माहिती घेणार आहोत जिने आपले नशीब आपण स्वतःच घडवू शकतो हे स्वत:च्याच उदाहरणावरून खरे करून दाखविले आहे.

तथाकथीत "दलित" समाजात जन्म झालेल्या या मुलीला केवळ जन्माने दलित म्हणून अनेक त्रास सहन करावे लागले. शाळेतील मुलांकडून आणि शिक्षकांकडून सतत अवहेलना होत होती. अगदी शाळेतील मैत्रीणींच्या पालकांनी तिला घरात प्रवेश करूही नव्हता दिला. अशातच वयाच्या केवळ १२ व्या वर्षी तिचे लग्न लावण्यात आले, ते देखील तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसासोबत. लग्नानंतर ती मुंबई मधील एका झोपडपट्टी मध्ये रहायला आली. या लग्नाने तिच्या आयुष्यात आणखीनच त्रास आणि अवहेलना आणली. सासरच्या माणसांकडून सतत त्रास आणि मारहाण होत होती. 

एके दिवशी तिच्या वडीलांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी ताबडतोब तिला आपल्या गावी परत आणले. मात्र नवरयाने "त्यागलेली" म्हणून समाजाने तिलाच दोष दिला. सततच्या या टीका टोमण्याना कंटाळून शेवटी तिने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ती त्यातून वाचली. पण या प्रसंगातून वाचल्यानंतर मात्र तिचं मन अधिक घट्ट झालं आणि तिने एकच निर्धार केला. आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करायची आणि स्वत: स्वत:चं नशीब घडवायचं असं तिने ठरवलं.

तिने शिक्षण पुढे सुरु करण्याचा प्रयत्न केला , मात्र त्यात यश मिळालं नाही. मग पुन्हा मुंबईला जाऊन एखादी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला , तोही यशस्वी झाला नाही. शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावंच म्हणून तिने आईकडून शिवणकाम शिकून घेतलं. आणि शिवणकामाचाच घरघुती व्यवसाय सुरु केला. इथेच तिच्या यशाची सुरुवात झाली. दिवसाचे १६-१६ तास काम करून तिने आपला व्यवसाय थोडा थोडा वाढवायला सुरुवात केली. हे करत असतानाच तिने उत्पादनासाठी लागणारया मोठ्या शिवणयंत्रांची माहिती मिळवली. लघुउद्योजकांना मिळणार्या सरकारी योजनेचा फायदा घेऊन ५०००० चे लोन मिळवले आणि  स्वत:चे छोटेखानी वस्त्रालय (Boutique) सुरु केले.

या व्यवसायात तिने चांगलाच जम बसवला. काही वर्षातच चांगला नफा मिळवल्यानंतर तिने एक धाडसी पाउल उचलले. कोणालाही विश्वास बसणार नाही असे एक काम तिने केले. कमानी ट्युब्स (Kamani Tubes) नावाची एक डबघाईला आलेली कंपनी तिने २.५ करोड रुपयांना विकत घेतली. खरंतर, ही एक इंजिनीअरिंग कंपनी होती. ईजीनीअरिंगचा आणि कंपनी चालविण्याचा कोणताही अनुभव नसताना तिने एक अतिशय धाडसी पाउल उचलले होते. पण आज कमानी ट्युब्स ही एक जोमात चाललेली १०० मिलियन डॉलर्स इतके मूल्य असणारी कंपनी आहे. आणि शेकडो लोकांचा उदरनिर्वाह या कंपनी मुळे चालू आहे.

कोणतीही MBA पदवी नसताना, केवळ आयुष्याने शिकविलेल्या ज्ञानाच्या आणि आपल्या हिमतीच्या बळावर ती आज कोर्पोरेट क्षेत्रात मानाने मिरवते आहे. आपल्या या अचाट कर्तुत्वाबद्दल अनेक पुरस्कार मिळविते आहे.

मित्रांनो, या असामान्य स्त्रीचे नाव आहे कल्पना सरोज. स्वत:च्या बळावर करोडपती झालेल्या कल्पना सरोज यांना २०१३ साली उद्योगविश्वातील भरीव कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केवळ महिलांनाच नाही, तर आयुष्यातील अनेक संकटांना सामोरे जाणारया प्रत्येकालाच स्फूर्तीदायी ठरेल अशी ही कल्पनाजींची कथा नेटभेट च्या वाचकांसोबत शेअर करावीशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच !!

धन्यवाद !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect