मित्रांनो, तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोन मध्ये एक अद्भुत सुविधा गुगलने दिलेली आहे. पण बर्याच जणांना त्याच्याबद्दल माहिती नसते किंवा माहिती असली तरी हे फीचर वापरायचे कसे ते महिती नसते. या सुविधेचं नाव आहे, गुगल वॉईस सर्च. याच सुविधेला गुगलने "ओके, गुगल" या पर्सनल असिस्टंट प्रोग्राममध्ये समाविष्ट केले आहे. गुगलने Artificial Intelligence आणि Machine Learning क्षेत्रामध्ये खुप प्रगती केली आहे आणि "ओके गुगल" त्याचाच एक छोटासा भाग आहे. ओके गुगल एक अतिशय मजेशीर आणि उपयुक्त सेवा आहे. ओके गुगल वापरुन आपण मोबाईल सोबत बोलु शकतो, मोबाईलला आपल्या आवाजाच्या सहाय्याने ऑर्डर्स देउ शकतो. ओके गुगल वापरण्याचे खुप सारे फायदे आहेत. असे हे "ओके गुगल" म्हणजे काय आहे, ते कसे वापरायचे हे समजावून देणारा हा व्हीडीओ मी खास नेटभेटच्या वाचकांसाठी बनवला आहे. तो जरुर पहा आणि व्हीडीओ कसा वाटला ते मला खाली कमेंटस मध्ये जरुर लिहुन कळवा. धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |