आजपर्यंत आपण अनेक नवनवीन उद्योगधंदे बाजारात आल्याचे पहातो.परंतु त्यापैकी पुष्कळ उद्योगधंदे काही काळातच बंद होतात,तर काहींना पुढे जाण्यासाठी मार्गच सापड्त नाही.अशा उद्योजकांना प्रेरणादायी ठरेल असा 'दंगल' हा एक ऊत्कृष्ट चित्रपट आहे. 'दंगल' हा चित्रपट महावीर सिंघ फोगाट यांच्या संर्घषाची कहाणी आहे.त्यांनी अनेक अड्चणींवर मात करुन आपल्या मुलींना स्वतः कुस्ती शिकवून त्यांना योग्य मार्गदर्शन देउन भारतासाठी सुवर्णपदक मिळवून दिले. हा चित्रपट आपल्याला शिकवितो की आपण आपली स्वप्न साकार करण्यासाठी माघार न घेता अशक्यातुनही शक्य होईल इतके प्रयत्न केले पाहिजे.ज्याप्रमाणे 'दंगल' चित्रपटात महावीर सिंघ यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्याप्रमाणे नवीन उद्योजकांनी संर्घषांना न घाबरता हिमतीने आणि चिकाटीने आपल्या व्यवसाय वाढिसाठी आणि तो अधिकअधिक यशस्वी बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले पाहिजेत. कारण शून्यातुन विश्व निर्माण करणे हे ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळ्विण्याइतकेव अवघड आहे. खालील काही मुख्य गोष्टी आपल्याला 'दंगल' चित्रपटातुन शिकता येतात. १.Make the best with what you have- जे आहे त्यातुन चांगलं घड्वा आयुष्य म्हणजे इच्छापुर्तींचा कारखाना नव्हे.इथे आपल्याला जे हवे आहे ते आपणहून मिळवावे लागते. महावीर सिंघ फोगाट यांचे सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न होते,परंतु वडिलांच्या निर्बंधामुळे ते फक्त National level पर्यन्तच येऊ शकले.त्यांनी पुढे आपल्या मुलाला स्पर्धेत उतरवून आपले स्वप्न साकार करण्याचे स्वप्न बघितले.परंतु नशिबाने त्यांचे स्वप्न साकार करण्यात अडथळे आणले.त्यांच्या पत्नीने तीन वेळा मुलीनांच जन्म दिला.परंतु त्यांनी हार मानली नाही.त्यांनी आपले स्वप्न आपल्या मुलींमध्ये साकारले. त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांना पुष्कळ वेळा हवे तसे ग्राहक / कर्मचारी / गुंतवणूकदार मिळत नाही त्यावेळी सर्वात महत्वाचे असते कि जे आपल्याजवळ आहे त्याचा योग्य वापर करुन चांगल्यात चांगले उत्पादन काढायचे. साध्यात साधा कारागीर सुद्धा आपल्या कौशल्याने आणि चांगल्या सल्याने आपल्या कामात तरबेज होऊ शकतो. २.Look on the brighter side- चांगल्या गोष्टींकडे जास्त लक्ष देणे महावीर सिंघ स्वतःशाकाहारी होते परंतु मुलींना चांगले शरिर्सौष्ठ्व देण्यासाठी त्यांना मांसाहार(चिकन) देणे महत्त्वाचे होते मात्र आर्थिक परिस्थितींमुळे त्यांना ते शक्य नव्हते. तरीही त्यांनी चिकन विक्रेत्याला नाममात्र दरात चिकन देण्यास भाग पाडले.आणि त्याला खात्री करुन दिली कि त्याच्या या उपकारामुळे त्यांच्या मुली पुढे जाऊन सुवर्णपदक मिळवतील. त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांनाही suppliers हवे असतात.परंतु आवश्यक ती विश्वासार्हता किंवा बाजारात नाव नसल्यामुळे नवीन उद्योजकांनाही वाजवी दरात suppliers मिळविणे कठिण जाते.अशावेळी दंगल' चित्रपटातुन आपण हे शिकू शकतो कि समोरच्याला आपल्या बरोबर व्यवहार किंवा उद्योग केल्याने भविष्यात फायदा होऊ शकतो हे पट्वुन देणे फार महत्त्वाचे आहे. 3.Be creative,do not follow the herd- नवनवीन संधींचा वापर करा दंगल' चित्रपटात दाखविल्याप्रमाणे आपल्याला नवीन काही शिकता येत असेल तर ते अंगीकारले पाहिजे,नुसत्या जुन्याच कल्पना घेऊन पुढे जाणे धोकादायक ठरू शकते.गीताने आपल्या national championship नंतर intrenational championship पदाच्या विजेते पदासाठी गेली असताना आपल्या नवीन कोचच्या शिक्षणाचा अवलंब केला आणि विजेतेपदाकडे वाट्चाल केली. त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांनाही आपल्या उद्योग वाढीसाठी नवनवीन संधींचा,धोरणांचा,कल्पनांचा विचार करून त्यांचा वापर करुन आपला उद्योग वाढ्विला पाहिजे. ४.Take risk- धोका पत्करणेज्याप्रमाणे 'दंगल' चित्रपटात दंगल स्पर्धेत पुरुषांएवजी मुलींना खेळ्ण्याचा निर्णय देऊन त्या स्पर्धेकडे पाहण्याची प्रेक्षकांना नवीन दिशा दिली आणि जी अतिशय यशस्वी झाली. त्याचप्रमाणे उद्योजकांनीही आपला उदयोग वाढविण्यासाठी आवश्यक असल्यास risk-धोका पत्करला पाहिजे. नविन प्रयोग केले पाहिजेत. काही प्रयोग फसतील त्याची फार चिंता न करता त्यापासुन शिकून पुढे गेले पाहिजे. परंतु आपण धोका पत्करलाच नाही तर आपल्याला उद्योजक म्हणवता येणार नाही.कारण जसे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तसेच risk घेणे आणि उदयोग वाढविणे ही यशस्वी उदयोगाची गुरुकील्ली आहे.कारण No bussiness works without taking risks. अशाप्रकरे वरिल चार गोष्टिंचा विचार करून आपण आपल्या उदयोगाला सुरुवात केली तर यश नक्किच आपले असेल ! ================================================== आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही. नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत. अधिक माहितीसाठी भेट द्या - http://www.netbhet.com मातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा ! ================================================== सलिल सुधाकर चौधरी Founder - Netbhet eLearning Solutions Trainer - Business Growth and Digital Marketing www.netbhet.com |