मित्रांनो, आपल्या सर्वाना सहा ज्ञान इंद्रियांबद्दल तर माहित आहेच,या इन्द्रियांपैकी
सर्वात वरचं किंवा महत्त्वाचं इंद्रिय कोणतं असा प्रश्न विचारला तर उत्तर देणं कठीण असेल.कल्पना करा यापैकी डोळ्यांनी काम करणे बंद केले तर? अचानक काही काळासाठी आपली बघण्याची क्षमता काढून घेतली तर?आणि ते हि समोर स्वादिष्ट असे जेवण असताना? डोळ्यांसमोर फक्त गडद अंधार! या अंधारात ही तुम्हाला सामोर असलेल्या जेवणाचा आस्वाद फक्त अंदाजाने आस्वाद घ्यायचाय! आहे ना विलक्षण आणि वेगळा अनुभव? होय! असा अनुभव तुम्हाला मिळू शकतो 'डायलॉगस इन द डार्क' (Dialogues in the Dark) या रेस्टारंट मध्ये.तुम्ही जेव्हा या रेस्टॉरंट मध्ये जाता तेव्हा तुम्हाला तुमच्याकडच्या लाइट असलेल्या किंवा प्रकाशित होणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे मोबाईल, घड्याळ, लाईटर इ. सगळं काही एका लॉकर मध्ये ठेवायला सांगतात,अगदी तुमच्या चष्म्या सकट.तुम्ही आत प्रवेश केल्यानंतर लगेचच दरवाजा बंद केला जातो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मित्रांनो,जर मी तुम्हाला असे सांगितलले की तुमच्या डोळ्यावर मी एक कापडी पट्टी बांधणार आहे तर तुम्ही थोडे का होईना स्वतःला सावराल कारण असे केल्यावरही तुमच्या डोळ्यांना आजूबाजूचा प्रकाश जाणवेल, पण या रेस्टॉरंट मध्ये अतिशय गडद अंधार असतो. आत गेल्यावर आपले जर सोबती असतील तर आपल्याला एकामागे एक अशी साखळी करण्यास सांगतात आणि अशी साखळी करून आतला एक आपला वेटर मित्र आपल्याला आपल्या जेवणाच्या टेबलपर्यंत घेऊन जातो व आपल्या जागेवर बसण्यास मदत करतो. हे सगळं होत असताना आपले निरागस डोळे कुठूनतरी एखाद्या प्रकाशाची ज्योत येईल का ह्याची केविलवाणी आशा करत असतात पण तसे अजिबातच होत नाही.नंतर एक वेटर आपल्या जवळ येऊन आपल्याला पाण्याचा ग्लास पुढे करतो व तो कुठे ठेवला आहे त्याचा अंदाज देतो. मागाहून आपलं जेवणही येत. आता एक अंदाज लावा की तुम्हाला तुमचे जेवण जेवायचे आहे तेही समोर वाढलेल्या ताटाचा फक्त अंदाज घेऊन!! इथे वाढणारे वेटर्स हे इतक्या अंधारातही इतके सराईतपणे सर्व कामे करतात हे पाहून आश्चर्य नक्कीच वाटते पण त्याहून मोठा धक्का बसतो जेव्हा तुम्हाला हे कळतं कि आपल्याला कि आत घेऊन जाणारा आपला मित्र, वाढणारे वेटर्स हे अंध आहेत. इथून जेवून बाहेर पडलेल्यांसाठी हा एक वेगळा आणि विलक्षण अनुभव असतो यात शंका नाही.हे रेस्टारंट संवेदनशील व्यक्तींना अंध व्यक्तींच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचं आणि अनुभवांचं थोड्या काळासाठी दर्शन घडवतं.अशा पद्धतीचं रेस्टारंट सुरु करण्यामागे हीच सामाजिक भावना आहे कि एखाद्या व्यक्तीच्या अपंगत्वावर सहानुभूती दाखवण्यापेक्षाही,त्यांचं आयुष्य जगण्याचा छोटासा प्रयत्न देखील तुमचे विचार पूर्णपणे बदलून टाकतात आणि आपण एका वेगळ्याच उंचीवर जातो. मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण "मिरची अँड माईम" या अनोख्या हॉटेलबद्दल माहिती घेतली. (त्यबद्दल इथे वाचा - https://www.netbhet.com/blog/mirchi-and-mime-a-special-restaurant-and-amazing-business ) आणि आज ‘डायलॉगस इन द डार्क’ बद्दल ! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |