"तारे जमीन पर" चित्रपटातला आमिर खानने रंगवलेला "राम शंकर निकुंभ" सारखा शिक्षक केवळ सिनेमातच दिसतो असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण तुम्ही अद्याप दिनेश बडगैंडी ना भेटला नाही आहात. ग्रामीण भागातील मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करणार्या बैंगलोरस्थित दिनेश बडगैंडी यांनी एक स्टार्टअप सुरु केले आहे. मित्रांनो, या त्यांच्या स्टार्टअपचे नाव आहे "तारे जमीन पर"! तारे जमीन पर म्हणजेच "TZP" ने एक चालते-फिरते तारांगण उभारले आहे. यामध्ये एका घुमटाच्या आकाराचा वातानुकुलीत तंबू वापरला जातो. ज्यात बसून मुले अंतराळातील आश्चर्ये पाहू शकतात. कर्नाटकात TZP ची ६ चालती-फिरती तारांगणे असून, आतापर्यंत ३ लाखाहून जास्त कार्यक्रम झाले आहेत. ह्या चालत्या फिरत्या तारांगणामध्ये २ फुगणारे घुमट, GPS, एक सौर ऊर्जेवर चालणारे UPS, खास प्रोजेक्टर, पोर्टेबल एअर कंडीशनर, आणि सॉफ्टवेअर चे प्रशिक्षण असलेला एक कर्मचारी असतो. . कर्नाटकच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या दिनेश यांना शहरी भागातील आणि गावातील मुलांमधल्या अंतराची जाणीव असल्यामुळे त्यांनी ही दरी कमी करायचे ठरवले. “गावातील मुलांना अनेकदा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे अनेक शास्त्रीय संकल्पना कळत नाही.” असे दिनेश म्हणतात. TZP एका दिवसाचे चालते-फिरते तारांगण कार्यक्रम घेते, ज्यात मुले अंतराळ शास्त्रावरील लघु चित्रपट, अपवर्तन आणि प्रतिबिंबाचे प्रयोग, सौर ऊर्जा आणि त्याचे वापर अशा अनेक गोष्टी शिकु शकतात. ================================================================================================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================================================================================================ राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण विभाग मान्यता प्राप्त, असे TZP चे एकुण ६० कार्यक्रम आहेत. TZP आपला मजकूर, डिजीटल तारांगण क्षेत्रातील प्रसिद्ध Evans and Sutherland ह्या कंपनीकडून घेते, आणि तो मजकुर गावातील मुलांना समजण्यासाठी कन्नड भाषेत रुपांतरीत करते. कार्यक्रमाचे शुल्क साधारण १०० रुपये असून, दिवसेंदिवस कार्यक्रमाची यादी वाढत चालली आहे. मित्रांनो, यापुर्वीच चालतं फिरतं थिएटर या संकल्पने बद्दल आपण माहिती घेतली होती. (त्याबद्दल इथे वाचा - https://www.netbhet.com/blog/2174140 ), याच कल्पनेला पुढे नेऊन विद्यर्थ्यांना उपयोग होईल अशी अभिनव योजना साकारणार्या दिनेश बडगैंडी कडून बरेच बिझनेसचे फंडे शिकता येतील. १. ग्राहक आपल्याकडे काही कारणास्तव येऊ शकत नसेल तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. २. ग्राहकाची नेमकी गरज काय आहे (Unmet Needs)? हे ओळखणे सर्वात महत्त्वाचे आहे. ३. ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत माझे उत्पादन देता यावे म्हणून मला नेमके कोणते बदल केले पाहिजेत ? ४. तळागाळातील लोकांना (Bottom of the Pyramid) योग्य असे सोल्युशन दिल्यास नक्कीच Profitable Business उभा करता येतो. तारे जमीन पर चे चालते फिरते तारांगण कसे काम करते हे दाखविणारा व्हीडीओ - |