नेटभेटच्या सोशल मीडिया ट्रेनिंग मध्ये आम्ही नेहमी सांगतो की चांगले कंटेंट बनवा,ब्लॉग्स लिहा...पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आम्हाला लिहायचं तर असतं पण तेवढा वेळ नसतो किंवा मराठीत लिहणे थोडे कठीण होते. म्हणूनच आज या व्हिडिओ मध्ये आपण असे एक टूल पाहणार आहोत ज्यामुळे मराठी लिहिणे सोपे जाणार आहे.हे एक व्हॉइस टायपिंग टूल असून तुम्ही जसं बोलत जाल,तसं ते टाईप करत जाईल.हे फ्री असून मराठी देखील टाईप करता येऊ शकते.म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com
मित्रांनो, काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एक गेम फार लोकप्रिय होता त्याचं नाव होतं farm Ville. या गेम मध्ये व्हर्च्युअल शेती घेऊन शेती करता येत असे.
बंगलोर मधील एका स्टार्टअपने हा गेम प्रत्यक्षात आणला आहे. शहरी भागातील ग्राहक आणि ग्रामीण भागातील शेतकरी या दोघांना जोडणारा एक प्लॅटफॉर्म म्हणजेच एक अँप तयार केलं आहे.ज्यातून शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील प्रश्न ओढवण्यासाठी मदत होत आहे. शहरामध्ये सध्या आपण खात असलेली फळे,भाज्या अशुद्ध आणि कीटकनाशके फवारणी केलेली असतात.त्यामुळे आपण Organic फळे आणि भाज्या याकडे वळतो आहोत.त्यातही स्वतः ऑरगॅनिक भाज्या पिकवण्याकडे आजकाल लोकांचा कल वाढतो आहे.परंतु जागेचा अभाव, अपुरा वेळ आणि शेतीविषयक अज्ञान या सर्व प्रश्नांवर उपाय म्हणून बंगलोर मधील काही तरुणांनी एक बिझनेस मॉडेल सुरू केले आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद ही मिळतो आहे. हे बिझनेस मॉडेल आपल्याकडे देखील सुरू करू शकतो.ते नक्की काय आहे हे आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊ.तेव्हा शेवटपर्यंत व्हिडीओ नक्की पहा.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com
मित्रांनो,भारत सरकारने जाहीर केलेल्या यावर्षीच्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्यांच्या यादीमध्ये कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना येथील एका 17 वर्षीय संशोधकाची निवड झाली. इतक्या प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणारा हा तरुण मुलगा त्याच्या शहरात आता वैज्ञानिक म्हणून ओळखला जातो.नक्की या मुलाने असे काय केले आहे कि तो आता त्याच्या शहराचा आणि राज्याचा स्टार बनला आहे?
मोहम्मद सुहेल चिन्या सलीमपाशा असे या 17 वर्षीय तरुण संशोधकाचे नाव आहे. त्याने केलेलं संशोधन हे रोग निदान करण्याच्या तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवणारे तंत्रज्ञान ठरू शकते इतके प्रभावी आहे. आपल्या आहारातील प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या कुपोषणाचा एक प्रकार म्हणजे प्री-सायमॅटोमॅटिक प्रोटीन-एनर्जी (PEM) कुपोषण. याचेच निदान करण्याची एक सहज,सोपी आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वस्त अशी पध्दत या तरूण मुलाने संशोधनातून विकसित केली आहे.फक्त एक कागदाचा तुकडा वापरून! आणि तेही अगदी कमी किंमतीत. आश्चर्य वाटतंय ना? हे संशोधन करण्यासाठी नक्की काय प्रेरणा होती याची सुद्धा एक रंजक कथा आहे. सुहेलने स्टॅनफोर्ड विद्यापीठातील बायोइंजिनिअरिंगचे एक शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक डॉ. मनु प्रकाश यांचे एक संशोधन युट्युबच्या व्हिडिओद्वारे पहिले होते.त्यांनी जगातील पहिले असे मायक्रोस्कोप बनवले आहे जे कागद वापरून तयार केले आहे आणि ज्यामुळे फक्त तीन मिनिटांत मलेरियाचे निदान होऊ शकते.यातूनच एखाद्या रोगाचे निदान करण्यासाठी पेपरचा वापर करण्याची प्रेरणा सुहेलला मिळाली होती. त्यामुळे आतापर्यंतचे होत असलेले रोगनिदान परीक्षण करण्यासाठी सिरिंजद्वारे रक्त घेणे,रक्ताचे नमुने यांचे परीक्षण,मग निदान असे पारंपरिक मार्ग मागे ठेवून या क्षेत्राचे भविष्य हे फक्त एक कागद असू शकतो.यावर त्याचा विश्वास बसला.म्हणूनच कागदावर काम करण्यास सुरुवात केली. पीईएमचे निदान आणि कुपोषणामुळे किती मुले दगावत आहेत हे पाहण्यासाठी त्याने विविध संशोधन पत्रांचा संदर्भ पडताळून पहिला.त्याला भारतात ही संख्या लाखोंच्या तर जगात कोट्यावधीच्या घरात आढळली. त्याच्या संशोधनादरम्यान, एक अतिशय वेगळी बाब समोर आली की, प्रत्येक मुलाच्या शरीरातील कुपोषण पातळी भिन्न आहे आणि म्हणून प्रत्येक मुलासाठी आहाराची आवश्यकता हि बदलत जाते."भारतातील केंद्र सरकार आणि विकसनशील देशांमधील जागतिक आरोग्य संघटना, दोघेही स्वतंत्रपणे या समस्येवर मात करण्यासाठी विविध धोरणे आणि योजना राबवून प्रयत्न करीत आहेत. परंतु सरकारने ठरवून दिलेल्या कुपोषणग्रस्त सर्व मुलांसाठी समान पातळीचा आणि प्रमाणित आहार काही मुलांमध्ये योग्य तो बदल घडवू शकत नाही.प्रत्येकाच्या शारीरिक गरजेनुसार आणि प्रथिनांच्या पातळीनुसार आहारात बदल होणे आवश्यक आहे.” असे देखील तो म्हणतो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ म्हणूनच सुहेलने एक अशी पद्धत विकसित केली आहे जी मुलाच्या रक्तात प्रोटीनची पातळी सांगू शकते.मुलाच्या लाळेचा नमुना कागदावर घेतला जातो.जर कागदाचा रंग बदलला तर प्रथिने आणि पोषक तत्वांचा अभाव आहे असे समजले जाते.त्यासाठी एक मोबाईल अॅपही विकसित केले आहे.हा कागद अॅपद्वारे स्कॅन करू शकतो. यामध्ये प्रोटीनची टक्केवारी किंवा कुपोषणाची पातळी दर्शविली जाते. हे सुहेलच्या संशोधनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग होता कारण त्याने हा बायोमार्कर मानवी लाळेमध्ये ओळखला होता.या पद्धतीची किंमत 2 रुपये आहे आणि निकालही अगदी दोन मिनिटातच मिळतो. किंमतीच्या दृष्टीने ही मोठी प्रगती आहे. पण यातून एक मुख्य बाब समोर येते ती म्हणजे आजपर्यंत कुपोषण ओळखण्यासाठी रक्ताची चाचणी हाच एकमेव मार्ग वापरला जातो.. भारतासारख्या देशामध्ये वैद्यकीय कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. तसेच या पद्धतीमुळे आर्थिक बोजा तर वाढतोच आणि पर्यावरणाची हानी देखील होत आहे.पण सुहेलने विकसित केलेल्या या कागदाच्या वापरामुळे कमी बायोमेडिकल कचरा तयार होतो. सुहेलने असे अनेक शोध लावले ज्यामुळे समाज आणि पर्यावरणाला फायदा होईल.आठवीत असताना त्याने 40x40 सेंमी आकाराचे एक टाइल डिझाइन केली.फुटपाथ सारख्या सार्वजनिक ठिकाणी या टाइल्स बसवल्यावर लोक त्यावरुन चालत गेले कि विजनिर्मिती होत असे.या विजेचा वापर पथदिवे किंवा इतर सार्वजनिक सुविधांसाठी केला जाऊ शकतो. त्याने त्याला लेट्स जनरेट इलेक्ट्रिक बाय वॉकिंग असे नाव दिले.त्याचा हा प्रयोग पन्नासहून अधिक पुरस्कार प्राप्त ठरत आहे.तेव्हापासून सुहेलने मागे वळून पाहिले नाही.बरेच पुरस्कार जिंकूनही प्रसिद्धीची हवा सुहेलच्या डोक्यात गेली नाही. त्याऐवजी, तो नवीन प्रकल्पांवर काम करत आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com मित्रांनो,गुगल फॉर्म्स कसे तयार करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. नेटभेटच्या वाचकांनी कमेंटममध्ये एक्सेलमध्ये इन्व्हॉईस कसं बनवायचं अशी विचारणा केली होती, म्हणूनच मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरून तसेच जी.एस.टी रेट ऍड करून एक चांगलं इन्व्हॉईस कसं बनवायचं हे आपण या व्हिडीओ मधून जाणून घेऊ. ते इनव्हॉइस प्रिंट कसं करायचं? पी डी एफ फॉरमॅट मध्ये कसं बनवायचं? याची माहिती देखील घेणार आहोत. तसेच इन व्हॉइस डाउनलोड करण्यासाठी एक टेम्प्लेट देखील दाखवत आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कंपनीची माहिती लिहून तो फॉरमॅट वापरू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com
मित्रांनो, न्यूझीलँड मध्ये किवी हा पक्षी आढळतो.आपण न्यूझीलँडच्या लोकांना 'किवीज' असंच म्हणतो.
हे किवी पक्षी काही हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून स्थलांतरित होऊन न्यूझीलँड बेटावर स्थिरावले.त्यावेळी या किवीज पक्षांच्या लक्षात आलं की इथे त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खाद्य उपलब्ध आहे आणि त्यांची शिकार करायला फारसे कोणी प्राणीही नाहीत.म्हणूनच किवी पक्षी तिथे रमले आणि स्थिरावले. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे खाद्य आणि शिकारी प्राणी कोणीच नाही अश्या आरामदायी वातावरणात या किवी पक्षांच्या अनेक पिढ्या वाढल्या. मित्रांनो,ही गोष्ट तुम्हाला का सांगत आहोत असा प्रश्न नक्की पडला असेल. एक उद्योजक म्हणून या गोष्टीचा विचार करूयात.आपल्याला या कीवींप्रमाणेच जगता आलं तर... म्हणजे खूप सारे ग्राहक आणि प्रतिस्पर्धी कोणीच नाही..तुम्हाला तुमचा उद्योग अश्या पद्धतीने वाढवायचा असेल तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी नेहमी वापरली जाते ती म्हणजे ब्लु ओशन स्ट्रॅटेजी( Blue Ocean strategy). ती नक्की काय आहे हे आपण या व्हिडीओ द्वारे जाणून घेणार आहोत.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com उबंटू…
उबंटू हि आफ्रिकेतील एक छानशी गोष्ट आहे... उबंटू हि संस्कृती आहे..एक प्रेरणा आहे... एकदा आफ्रिकेमध्ये संशोधन करीत असलेल्या मानववंश शास्त्रज्ञाने तिथल्या आदिवासी मुलांसोबत एक गंमत करायचे ठरवले. त्याने एक खाऊचा डब्बा एका झाडाजवळ ठेवला आणि सर्व मुलांना तेथून दूर १०० मीटर अंतरावर उभे राहण्यास सांगितले. मग मुलांना असं सांगितलं कि मी इशारा केल्यानंतर जो कोणी सर्वात प्रथम त्या डब्याजवळ पोहोचेल त्याला बक्षीस म्हणून तो सर्व खाऊ मिळेल. त्या मुलांनी काय बरं केलं असेल? सर्व मुलांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले आणि इशारा झाल्यावर सर्व एकत्र त्या खाऊच्या डब्याजवळ पोहोचले. सगळा खाऊ एकमेकांमध्ये सामान वाटून आनंदाने,एकत्रितपणे खाल्ला. त्या शास्त्रज्ञाला आश्चर्य वाटले,त्याने मुलांना असे का केले असं विचारल्याबरोबर त्या मुलांनी त्याला उत्तर दिले, “उबंटू’’.... याचा अर्थ असा होता, कि जर इतर सगळे व्यथित असतील तर कोणी एक जण आनंदी नाही राहू शकत.त्यांच्या भाषेत उबंटू म्हणजे “मी” आहे कारण “आम्ही आहोत”!! एकाच शब्दात आयुष्याच्या आनंदाची किल्ली जी आज सर्वांसाठी लागू होईल.आपण सर्वानीच आणि आपल्यासोबत इतरांनीही यातुन प्रेरणा घेऊन असच सकारात्मकपणे “उबंटू” आयुष्य जगण्याची...अनुभवण्याची गरज आहे. म्हणूनच ‘उबंटू’ हि संस्कृती सर्वांनीच जोपासुया,“मी” आहे कारण “आम्ही” आहोत! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाटसप वर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com मित्रांनो, एक चांगला वक्ता कसा बनायचं ? प्रभावी भाषण करता यावं यासाठी तयारी कशी करावी ? अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी नेटभेटच्या #ग्रेटभेट या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात प्रसिद्ध संभाषण चातुर्य प्रशिक्षक श्री. उल्हास कोटकर सहभागी झाले होते. त्यांच्या सोबतच्या चर्चेचा हा व्हिडीओ नेटभेटच्या वाचकांसाठी सादर करत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन हवे आहे? नोकरी करणाऱ्या प्रत्येकाचे उत्तर 'हो' असेच असणार आहे. प्रमोशन कोणाला नकोय! प्रत्येकाला आपल्या मेहनतीचं फळ पाहिजे असतं. पण तुमच्या सध्याच्या प्रोफाइल, जॉब मध्ये कितीही चांगलं काम केलं तरी प्रमोशन मिळेलच असं नाही.तर पुढच्या लेव्हलच्या जॉब साठी,रोल साठी तुम्ही तयार आहात जे जेव्हा दाखवता त्याच वेळेस तुमचा प्रमोशन साठी विचार केला जातो. प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्ही तयार आहात हे मॅनेजमेंट ला दाखवून देण्यासाठी काय करावं लागेल हे या व्हिडिओमधून जाणून घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com सेक्टर 11 द्वारका, नवी दिल्ली मध्ये, एक अन्न विक्रेता आहे.
हा माणूस 'नान थाली' विकतो. आजपर्यंत मी पाहिलेल्या "business strategies" मध्ये त्याची strategy खूप वेगळी आहे. एके दिवशी, आम्ही त्याच्या गाडीपाशी जेवायला थांबलो. आम्ही त्याला किंमती विचारल्या. तो म्हणाला, 50/- 'आलू नान' (बटाटा नान), 120/- 'चूर चूर नान' आणि 140/- 'पनीर नान' साठी. ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR =============== मला वाटले की आलू नान आणि चूर चूर नान मध्ये ७० रुपयांचा फरक खूप जास्त वाटतो आहे, आलू नान अगदीच साधा असेल असा विचार केला आणि मी चूर चूर नान ऑर्डर केला. मी चूर चूर नान मागवला, आणि एक लहान विचित्र नान समोर आला. मग दुसरा माणूस त्याच्या प्लेटमध्ये एक आलू नान घेऊन आला. मी पाहिले तर सर्व नान आणि करी समान होती. त्याची प्लेट रु. फक्त 50! मग मला लक्षात आले की बहुतेक लोक (विशेषत: स्त्रिया) जे महागड्या कार ने येऊन ऑर्डर देतात ते महागतला नान घेतात आणि बाईकर्स किंवा कामकरी लोक स्वस्त नान मागवतात. तो वेगवेगळ्या किंमतींवर त्याच वस्तू विकतो! थांबा, अजून संपले नाही. रस्त्याच्या अगदी उलट बाजूस आणखी दोन विक्रेते आहेत. ते पण त्याचे लोक आहेत! समान उत्पादन, समान गुणवत्ता परंतु किंमती 20% स्वस्त आहेत. रिक्षावाले तेथे खातात. कमाल! तो सर्व प्रकारच्या ग्राहकांना एकाच ठिकाणी विकत होता परंतु वेगवेगळ्या किंमतीला ! मित्रानो, आपणही ही "pricing strategy" वापरून बघा. सर्व ग्राहक समान नसतात, त्यांची पैसे देण्याची क्षमता वेगवेगळी असते! एक उद्योजक म्हणून तुम्ही याचा फायदा घेत आहात का? ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR =============== धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com मित्रांनो, इंटरनेटवर ऑनलाइन पैसे कमावण्याचा सगळ्यात जुना आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे ब्लॉगिंग.जर तुम्ही इंटरनेट वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे असे सर्च केले तर तुम्हाला ब्लॉगिंग असेच उत्तर मिळेल. इतरही अनेक आर्टिकल्स,व्हिडीओज दिसतील की ब्लॉगिंग कसं करायचं?म्हणूनच या व्हिडिओद्वारे आपण मराठीतून पाहणार आहोत की ब्लॉगिंग कसे सुरू करायचे आणि त्याद्वारे ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? ब्लॉगिंग कशी करावी,त्यातून उत्पन्न कसं होईल,आपला ब्लॉग यशस्वी होण्यासाठी काय करावं या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत.म्हणूनच हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com लीडरशिप बद्दल बऱ्याच वेळेला खूप गैरसमज पाहायला मिळतात.सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे लिडर्स हे कुठल्यातरी position ने अथवा title ने बनतात असा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मॅनेजर, सिनिअर मॅनेजर अथवा सी इ ओ बनाल तेव्हा तुम्ही लीडर म्हणून ओळखले जाल असं नाही आहे. खरं तर लीडर तुम्ही स्वतःहून बनू शकत नाही पण जेव्हा इतर लोक तुम्हाला लीडर 'मानतात' तेव्हाच तुम्ही लीडर बनता.लीडर शिप चा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे,हे आपण लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच या व्हिडिओ द्वारे लीडर शिप साठी आवश्यक असलेल्या काही खास टीप ज्याद्वारे इतरांना खात्री होईल की तुम्ही एक लीडर आहात, तुमच्यातील लीडरशिपच्या नेतभेटच्या वाचकांसाठी सादर करत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com मित्रांनो स्मार्टफोन हातात आल्यापासून आपल्या सर्वांना एक मानसिक आजार झालाय तो म्हणजे FOMO म्हणजेच Fear Of Missing Out. दिवसभरात सतत आपल्या फोन वर अपडेट्स,नोटिफिकेशन,मेसेज येत असतात. त्यापैकी काही आपलं पाहायचं किंवा वाचायचं राहून तर जाणार नाही ना हि ती भीती. म्हणूनच आपण सतत आपला मोबाइल तपासात असतो. जरा कुठे नोटिफिकेशनची रिंग वाजली कि लगेच आपला हात मोबाइल कडे जातो. व्हाट्सअप मध्ये काहीवेळा असे हे मेसेज पाहताना आपल्या लक्षात येतं कि पाठवणाऱ्याने तो मेसेज डिलीट केला आहे. मग आपलं मन त्याच विचारात सतत राहत कि डिलिट केलेला मेसेज नक्की काय असेल ? जो आपला वाचायचा राहून गेला आहे. यावर उपाय शोधण्याचा काही अंशी प्रयत्न केला आहे उपाय नक्की काय आहे ते आपण या व्हिडीओमधून जाणून घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com सौंदर्यप्रसाधने हे तर स्त्रियांसाठी खास असते.आतापर्यंत बाजारात अनेक उत्तमोत्तम ब्रॅण्ड्स ची अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.टीव्ही वर सर्वात जास्त जाहिराती या सौंदर्यप्रसाधांच्या प्रॉडक्टच्या असतात.
सौंदर्यप्रसाधनांना सामान्यपणे सुंदर दिसण्यासाठी वापरले जाण्याची मानसिकता अजूनही जनमानसात आहे.पण सौंदर्यप्रसाधने फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर केसांपासून ते पायाच्या नखनपर्यंत त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील असतात. एकंदरीतच सर्वसामान्यपणे प्रत्येकाचा शारीरिक वर्ण आणि त्वचेचा पोत यानुसार नक्की कोणते प्रॉडक्ट्स वापरले पाहिजेत याची कल्पना बऱ्याच जणांना नसते आणि जी माहिती असते तीदेखील पुरेशी नसते.सर्वात मोठी गोष्ट म्हणजे योग्य माहिती देणारे पर्याय खूपच कमी उपलब्ध असतात. याच प्रश्नांचा अनुभव असताना स्वतःचं पंचवीस वर्षांचं उत्तम करिअर मागे ठेवून सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत प्रवेश करणारी कर्तृत्ववान महिला फाल्गुनी नायर म्हणजेच आजच्या काळातला जलद रीतीने वाढत जाणारा अग्रगण्य ब्रँड नायका(Nykaa)च्या संस्थापक. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाटसप वर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ आय आय एम अहमदाबाद मधून मॅनॅजमेण्टचं शिक्षण पूर्ण करून फाल्गुनी नायर यांनी आपल्या करिअरची सुरुवात A. F. Ferguson या कंपनीतून केली. त्यानंतर कोटक महिंद्रा फायनान्स मध्ये काम करण्यास सुरुवात केली. कंपनीची लंडन येथे शाखा सुरु करून अल्पावधीतच अमेरिकेत देखील ऑफीस स्थापन केले. भारतात परत येऊन २०१२ पर्यन्त कोटक महिंद्रा फायनान्स मध्येच काम करत राहिल्या.अमेरिकेत असताना त्यांच्या निदर्शनास आलेली एक गोष्ट म्हणजे तेथे असलेल्या सौंदर्यप्रसाधनांची मोठमोठी आणि महागडी दुकाने.त्यामुळे भारतामध्ये सौंदर्यप्रसाधने सर्वच स्तरातील ग्राहकांना योग्य दरात आणि घरपोच उपलब्ध करून देणे हा एक विचार त्यांच्या या स्टार्टअप मागे मुख्यत्वे होता. इतक्या वर्षांच्या कॉर्पोरेटमधल्या कामाचा अनुभव असताना २०१२ मध्ये त्यांनी आपल्या उत्तम अश्या करिअरला राम राम केला आणि 'नायका' या ईकॉमर्स स्टार्टअप कंपनीची स्थापना केली. यामध्ये सौंदर्यप्रसाधने, पर्सनल केअर तसेच आरोग्यविषयक प्रोडक्ट्स चा समावेश होता.सर्वच उत्पादने ऑनलाइन आणि वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अल्पावधीतच नायका ग्राहकांच्या पसंतीस उतरला. आंतरराष्ट्रीय पातळीची कार्यप्रणाली आणि ब्रॅण्ड्स यांची सांगड घालून व्यवसाय उभारणीचा हा एक उत्तम प्रयत्न होता.सुरुवातीच्या काळात नायकाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर इतर ब्रॅंड्सचे प्रोडक्ट्स उपलब्ध असायचे.यूजर्सची संख्या वाढल्यानंतर आणि अर्थात चांगला प्रतिसाद मिळत गेल्यानंतर नायकाचे स्वतःचे ब्युटी प्रॉडक्ट्स ऑनलाइन विक्रीस उपलबध केले गेले.ऑनलाइन पर्यायामुळे जे त्यावेळी भारतात नुकतच सुरु झालं होतं, नायकाचा पहिल्या दोन वर्षांचा टर्नओव्हर पंधरा करोड वरून २०१७ मध्ये २१४ करोड वर पोहोचला,तीन लाख यूजर्स वरून अडीच करोड झाले. यावरून फाल्गुनी यांच्या व्यावसायिक कौशल्याचा अंदाज आपण लावू शकतो. आज नायका भारतातील सौंदर्य प्रसाधनांच्या अग्रगण्य ब्रॅण्डपैकी एक मानला जातो. नायर यांच्या कौशल्य आणि नियोजनबद्ध विचारसरणीमुळे अनेक मोठे गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी पुढे आले. २०१५ मध्ये नायकाचे पहिले स्टोअर सुरु करण्यात आले. २०२० पर्यंत भारतटामध्ये ८० स्टोअर सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे. करिअरच्या उत्तम स्थितीमध्ये असताना देखील आपल्या निरीक्षण,अनुभवाच्या आधारावर ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या व्यवसायाची सुरुवात करणे आणि नियोजनपूर्वक तो पुढे वाढवत नेणे कशा रीतीने शक्य होऊ शकते हे फाल्गुनी नायर यांनी आपल्या व्यवसायातून दाखवून दिले आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाटसप वर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com सध्याच्या वेगाने बदलत जाणाऱ्या या काळात जीवनशैली व्यवसाय म्हणजेच लाइफस्टाइल बिझनेस हि संकल्पना चर्चेत आहे.नक्की काय आहे ही लाइफस्टाइल बिझनेसची संकल्पना??
लाइफस्टाइल बिझनेसची सोपी व्याख्या म्हणजे असा बिझनेस जो तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनवतो. याचे उदाहरण सांगायचे झाले तर लेखनाची आवड असलेली व्यक्ती फ्रीलान्सर लेखक म्हणून जेव्हा काम करते तेव्हा ती लाइफस्टाइल बिझनेस करते असे आपण म्हणू शकतो. कारण यामध्ये ती व्यक्ती तिला जी गोष्ट करायला आवडते म्हणजेच जर लिखाण करायला आवडतं तर ते स्वतःच्या वेळेनुसार कधीही ,कुठेही ,प्रवास करताना अथवा घरी बसून करू शकते. यामध्ये काम करताना स्वतःची वैयक्तिक कामे,इतर जबाबदाऱ्या (कुटुंब,मुले इ.) अश्या गोष्टींचा योग्य तो समतोल राखून स्वतःच्या सवडीनुसार आणि आवड जपून काम करता येते. लाइफस्टाइल बिझनेस मध्ये एकतर स्वतःची आवड जोपासता येते आणि मुख्य म्हणजे त्यातून तुम्ही अर्थार्जनही करू शकता.हि थोडी नवीन संकल्पना असल्याने असे खूपसे व्यवसाय यात मोडू शकतात. सध्या चालू असलेले लाइफस्टाइल व्यवसाय हे फक्त एखादे दुकान अथवा एखादे प्रॉडक्ट बनवणे किंवा रूढ अर्थाने उद्योजकता (entrepreneurship)नाही. अनेक लाईफस्टाईल उद्योजक ऑनलाइन काम करतात आणि वेगवेगळ्या सेवा पुरवतात किंवा एखादा अभ्यासक्रम विकसित करतात, त्यांच्या वेबसाइट्स किंवा पॉडकास्टमधून पैसे कमावतात. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ या लाइफस्टाइल बिझनेस चे बरेचशे फायदे आपल्याला दिसून येतात.स्वतःच्या वेळेनुसार कामाचे तास निवडणे हि एक मोठी जमेची बाजू आहे.आपले कामाचे तास निवडणे त्याप्रमाणे ग्राहकांची निवड या सारख्या गोष्टी अशा पद्धतीच्या व्यवसायाममध्ये करणे आपल्या हातात असते. कामाचे स्वातंत्र्य हा दुसरा फायदा.आपल्या मनाप्रमणे काम करणे ,ग्राहक निवडीचे स्वातंत्र्य मिळते. तसेच पारंपरिक पद्धतीचे ऑफिस, ऑफिस स्टाफ किंवा कर्मचारी या सगळ्या गोष्टींचा समावेश नसल्याने इतर अनावश्यक जबाबदाऱ्या नसतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इतर ओव्हरहेड्स चा खर्च नसतो.फक्त एक लॅपटॉप अथवा कंप्युटर आणि इंटरनेट जोडणी..बस्स तुम्ही काम सुरु करायला तयार…! अश्या पद्धतीचे लाइफस्टाइल बिझनेस सुरु करण्याआधी आपल्याला व्यवसायातुन नक्की काय साध्य करायचे आहे याचा विचार करणे आधी गरजेचे आहे. प्रसिद्धी हवीय का? एखाद्या नवीन उत्पादनासह जग बदलण्याची इच्छा? "पारंपारिक" 9 ते 5 नोकरीऐवजी आपल्याला हवे असलेले आयुष्य जगण्यासाठी पुरेसे पैसे कमवायची इच्छा आहे का? आपल्याला आयुष्याकडून काय हवे आहे आणि आपल्या व्यवसायातुन आपण नक्की काय साध्य करू इच्छितो हे मनाशी ठरलं कि मग आपल्याला पाहिजे ते मिळविण्यासाठी लाइफस्टाइल बिझनेस हा एक चांगला मार्ग असू शकतो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com गुगल फॉर्म्स हे फ्री टूल वापरून इंटरनेट वर कोणाकडूनही एखादी माहिती गोळा करू शकतो.वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण मिळवू शकतो उदाहरणार्थ सर्वे फॉर्म्स,फीडबॅक फॉर्म्स, इंटरनेट मार्केटिंग द्वारे कस्टमर लीड्स मिळवू शकता… इतकेच नव्हे तर शिक्षक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन टेस्ट देखील घेऊ शकतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स गुगल फॉर्म्स मध्ये उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे अतिशय साधं, सोपं आणि उपयुक्त असणारं हे टूल मोफत आहे.या व्हिडिओ द्वारे आपण गुगल फॉर्म्स बद्दल अधिक जाणून घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com कोणताही बिझनेस सुरू करणे हे सोपे असते पण तो बिझनेस टिकवून ठेवणे आणि वाढवणे हे कठीण असते.बिझनेस सुरू होऊन एका पातळीवर पोहोचतो आणि तिथेच थांबतो याला सेलिंग लेव्हल म्हणतात.इथून पुढे जाणं कठीण होत जातं.या पायरीवरून पुढे जाण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची ठरते ती म्हणजे मार्केटिंग. लघुउद्योजकांना बिझिनेसच मार्केटिंग शिकणं किती गरजेचं आहे हे आपण या व्हिडीओद्वारे पाहणार आहोत. मार्केटिंग कसं करावं आणि त्याचसोबत काही अश्या टिप्स ज्यामुळे तुम्ही तुमच्या लघुउद्योगाचं मार्केटिंग करणं सोपं करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com Click here toरेस्टॉरंट हा एक एव्हरग्रीन व्यवसाय आहे.जोपर्यंत माणसाकडे पोट आहे तोपर्यंत माणसाला भूक आहे आणि जोपर्यंत माणसाला भूक आहे तोपर्यंत रेस्टॉरंटचा बिझनेस चालू राहणार आहे. बऱ्याच वाचकांकडून रेस्टॉरंट बिझनेस सुरू करण्यापूर्वी आवश्यक माहितीची विचारणा होत होती, म्हणूनच ज्यांना रेस्टॉरंट बिझनेस सुरू करायचा आहे अश्या सर्वांनी आणि ज्यांचा आधीच व्यवसाय आहे त्यांनी देखील हा व्हिडीओ नक्की पहा. या व्हिडीओमध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या रेस्टॉरंट बिझनेस सुरू करण्यापूर्वी उपयुक्त ठरतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com प्रत्येक उद्योजकाला एक गोष्ट नक्कीच जमली पाहिजे ती म्हणजे सेल्स. वस्तू ,सेवा,उत्पादने तुम्हाला विकता आले पाहिजे तरच उद्योग टिकून राहतो आणि पुढे जातो.बऱ्याचश्या अपयशी व्यवसायाची मुख्य कारणे म्हणजे प्रोडक्टची किंमत,दर्जा चांगला असूनही प्रॉडक्ट्सचे फायदे ग्राहकांपर्यंत नीट न पोहोचल्याने ग्राहकांनी विकत घेतले नाहीत.हा एक मोठा प्रश्न उत्पादकाला आणि सेल्सटीम ला सोडवावा लागतो.उत्पादनामधले गुण खूप चांगले असतात परंतु ग्राहकाला ते कळत नाहीत की हे प्रॉडक्ट् उपयोगी पडतील की नाही म्हणजेच उत्पादनात असतात फीचर्स आणि ग्राहक शोधत असतो बेनिफट्स.म्हणूनच हे फीचर्स आणि बेनिफिट्स नेमके काय आहेत आणि ते सेल्सप्रोसेस मध्ये कसे वापरले पाहिजेत हे आपण या व्हिडीओ द्वारे जाणून घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com
नेटवर्क मार्केटिंग, मल्टी लेव्हल मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग....
नावं वेगवेगळी असली तरी बिझनेस सारखाच असतो. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे नक्की काय ? नेटवर्क मार्केटिंग कायदेशीर आहे का? त्याचे फायदे आणि तोटे काय ? नेटवर्क मार्केटिंग कंपनी जॉईन करावी की करू नये ? करायची असेल तर चांगली नेटवर्क मार्केटिंग कंपनी कशी निवडावी ? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नेटभेट च्या नवीन विडिओ मध्ये बघायला मिळतील. विडिओ पहा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत जरूर शेअर करा. तुम्हाला ते नक्कीच धन्यवाद म्हणतील.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया www.netbhet.com
मित्रांनो, उद्योजकाचे सर्वात महत्त्वाचे शस्त्र असते त्याची मानसिकता.चौकटी पलिकडचा विचार करण्याची क्षमता ही कोणत्याही उद्योजकाची जमेची बाजू असते.
कोणत्याही व्यक्तीने व्यवसायात उतरण्यापूर्वी किंवा व्यवसाय वाढवत असताना खरच आपली "उद्योजकीय मानसिकता" परिपक्व झाली आहे का हे तपासून पाहिले पाहिजे. या महत्त्वाच्या, परंतु फारशा चर्चिल्या न जाणार्या मुद्द्यावर माहिती देण्यासाठी नेटभेटने या "फेसबुक लाईव्ह चर्चेचे" आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने बिझनेस सायकोलॉजी, सक्सेस सिस्टम, गोल सेटिंग, रिलेशनशिप मॅनेजमेंट, उद्योजकाची पर्सनॅलिटी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उद्योजकाने कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता,गरज भासल्यास चौकटिपलीकडचा विचार करणे आणि आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून कश्या प्रकारे पुढे गेले पाहिजे, याबाबत नुकतीच नेटभेट तर्फे लाइव्ह चर्चा नेटभेटच्या फेसबुक पेजवर पार पडली. नेटभेटचे संस्थापक श्री.सलील चौधरी आणि बिझनेस सायकॉलॉजिस्ट श्री. दिनेश मोरे यांच्या सोबतचे हे चर्चासत्र तुम्ही पुन्हा अनुभवू शकता.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com *बेरोजगार युवक, महिला व कॉलेजमधील मुलामुलींना पार्ट टाईम काम करुन उत्पन्न कमावण्याची एक चांगली संधी -* मित्रांनो, अॅमेझॉन इंडीयाने नुकताच एक नवी योजना जाहिर केली आहे. आपल्या फावल्या वेळामध्ये म्हणजेच पार्ट टाईम काम करुन दररोज ५०० रुपयांपर्यंत उत्पन्न कमावण्याची संधी अॅमेझॉनने उपलब्ध करुन दिली आहे. अॅमेझॉनसाठी डिलीवरी पार्टनर बनून, आपल्याला पाहिजे त्या वेळेत काम करण्याची ही संधी नेमकी काय आहे? या संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ? याची माहिती देणारा हा व्हीडीओ आम्ही नेटभेटच्या वाचकांसाठी बनविला आहे. आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. ! व्हीडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा - https://www.youtube.com/watch?v=vQ2vSKJ8neM कृपया, हा मेसेज आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. जास्तीत जास्त गरजू बांधवांना याचा उपयोग होईल. धन्यवाद ! टीम नेटभेट नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया ! www.netbhet.com कोणत्याही ब्रॅण्डकर्त्यांचं स्वप्न असतं की, त्याच्या ब्रॅण्डशिवाय कोणताही अन्य पर्याय ग्राहकाला दिसूच नये; पण काहींच्या बाबतीत हे स्वप्न इतकं खरं होतं की, मूळ नाव विसरून वस्तू ब्रॅण्डचं नावच धारण करते. पेट्रोलियम जेली ही संकल्पना पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या ब्रॅण्ड वॅसलीनच्या बाबतीतही तेच घडलं. त्या ब्रॅण्डची ही कहाणी.
अमेरिकेतील ब्रुकलीन इथं राहणारे रॉबर्ट ऑगस्टस चेसेब्रू एक रसायनतज्ज्ञ होते. १८५९ चा काळ त्यांच्यासाठी थोडा कठीण होता. दिवाळखोरीला सामोरं जाणाऱ्या रॉबर्टना एका फायदेशीर व्यवसायाची गरज होती. केरोसीनचं महत्त्व त्या काळात मोठं होतं; पण पेट्रोलियमचा व्यवसायही जोर धरू लागला होता. या व्यवसायाची चाचपणी करण्यासाठी ते पेनसिल्वानिआ येथे गेले. तिथे मोठय़ा प्रमाणात खनिज तेलांचा व्यवसाय चालत असे. या भेटीच्या दरम्यान खनिज तेलाचं उत्खनन जिथे चालू होतं तिथे रॉबर्ट यांना एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट आढळली. तिथल्या ड्रिलिंग रॉडस्भोवती पेस्टसारखा दिसणारा पदार्थ चिकटलेला असायचा. रॉबर्ट यांच्यातील कुतूहल जागं झालं. त्यांनी तिथल्या कामगारांना विचारलं तर त्यांनाही फारशी माहिती नव्हती; पण त्यांच्याकडून एक महत्त्वाची गोष्ट रॉबर्टना कळली, की हे जे काही आहे, ते जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते. रॉबर्ट यांना त्यावर अधिक संशोधन करणं गरजेचं वाटू लागलं. ब्रुकलीनना परतताना तो लोकांच्या दृष्टीने असलेला पेट्रोलियम कचरा एक किमती ऐवज घेऊन यावा तसा रॉबर्ट घरी घेऊन आले. त्या पेस्टवर त्यांनी संशोधन केलं. त्या पदार्थाचं शुद्धीकरण केलं आणि त्या पदार्थाला ‘पेट्रोलियम जेली’ असं नाव दिलं. ही प्रक्रिया अजिबातच सोपी नव्हती. एक पूर्णत: नवी गोष्ट रॉबर्ट लोकांपुढे आणत होते. त्यांनी स्वत:वरच अनेक प्रयोग करून पाहिले. स्वत:ला छोटय़ामोठय़ा जखमा करत, त्यावर ही जेली लावत जखम कोणत्याही प्रादुर्भावाशिवाय किती काळात बरी होऊ शकते, कोणत्या जखमा बऱ्या होतात, कोणत्या नाही याचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी ही जेली बाजारात विक्रीसाठी आणायचं ठरवलं. आपल्या या उत्पादनाचं नाव त्यांनी ‘वॅसलिन’ असं निश्चित केलं. या नावाबाबत दोन गोष्टी सांगितल्या जातात. एक अशी की, रॉबर्ट यांना हे नाव स्वप्नात सुचलं, तर काहींच्या मते पाण्यासाठी वापरला जाणारा जर्मन शब्द ‘वेसर’ आणि ऑलिव्ह तेलासाठी वापरला जाणारा ग्रीक शब्द ‘इलीऑन’ याच्या मिश्रणातून रॉबर्ट यांनी हा शब्द निर्माण केला. यातील दुसरी गोष्ट सयुक्तिक वाटते. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ १८७० मध्ये वॅसलिन विक्रीसाठी एक ब्रॅण्ड म्हणून सिद्ध झालं, पण लोकांना माहितीच नसणारा प्रकार विकणं आव्हानात्मक होतं. रॉबर्ट त्या काळी स्वत: छोटय़ा बरण्यांत वॅसलिन भरून एका घोडय़ाच्या बग्गीतून न्यूयॉर्कच्या रस्त्यावर वॅसलिन फुकट वाटत असतं; पण त्यांचा आग्रह होता की, याचा फायदा होतोय का नाही किंवा काही वेगळा अनुभव असल्यास मला येऊन सांगा. थंड हवेच्या प्रदेशात ही नवी जेली अनेकांना वरदान वाटली. गंमत म्हणजे रॉबर्टने फक्त कापणं, भाजण्याच्या जखमा समोर ठेवून प्रचार केला तरी लोकांनीच वॅसलिनचे अनेकविध फायदे शोधून रॉबर्टपर्यंत पोहोचवले. महिला वर्गाने कळवलं की, वॅसलिन लाकडी वस्तूंना लावलं की त्या चकचकीत होतात. शेतकऱ्यांनी आपला अनुभव सांगताना वॅसलिनमुळे शेतकी अवजारं गंजत नसल्याचं कळवलं. जलतरुणपटूंना संपूर्ण अंगाला वॅसलिन लावून पाण्यात उतरणं फायद्याचं वाटलं, स्कायडायव्हर्सना ते तोंडावर लावणं सयुक्तिक वाटलं, बेसबॉल प्लेअर ते ग्लोव्ह्जला लावत ज्यामुळे ते चामडं मऊ राहात असे. असे विविध फायदे कळत गेले. वॅसलिनला मागणी वाढली. रॉबर्टने काही विक्रेते नेमून नव्या १२ बग्गी विक्रीसाठी घेतल्या. फुकट मिळणाऱ्या वॅसलिनकरता लोक एक-एक पेनी मोजू लागले. या दरम्यान काही घटना अशा घडल्या, की महिन्याभराच्या सामानात वॅसलिन अत्यावश्यक गोष्ट म्हणून घरी येऊ लागलं. १९१२ मध्ये न्यूयॉर्क इथे इन्शुअरन्स कंपनीला लागलेल्या भयानक आगीत जखमी, भाजलेल्या मंडळींवर उपचार करताना रुग्णालयांनी वॅसलिनचा वापर केला. त्यामुळे ते ‘इस्पितळ दर्जा’चं उत्पादन मानलं जाऊ लागलं. रॉबर्ट पेरी या संशोधकाने उत्तर ध्रुव गाठल्यावर तिथे कोरडय़ा पडणाऱ्या त्वचेवर वॅसलिन कसं कामी आलं याची महती सांगितली आणि वॅसलिनमुळे त्वचा मऊ सूत राहण्याचा अनुभव घेतलेल्या राणी व्हिक्टोरियाने या बहुमूल्य संशोधनासाठी रॉबर्ट ऑगस्टस चेसेब्रू यांचा शाही सन्मान केला. या सगळ्या घटनांचा परिणाम असा झाला की, वॅसलिनची कीर्ती अतिथंड देशांत पसरत नंतर जगभरात पोहोचली. रॉबर्ट यांना ९६ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यांनी वॅसलिनची प्रगती स्वत: पाहिली. युनिलिव्हर कंपनीने हा ब्रॅण्ड विकत घेतला आहे. वॅसलिनची टॅगलाइन आहे ‘द हिलिंग पॉवर ऑफ वॅसलिन’.. दर ३९ व्या सेकंदाला जगभरात कुठे ना कुठे वॅसलिन टय़ूब विकली जाते. अजून तरी या पेट्रोलियम जेलीला कोणताही प्रतिस्पर्धी नाही. वॅसलिन एकहाती सत्ता गाजवतंय. भारतासारख्या देशात काही प्रांत वगळता कडाक्याची थंडी नसूनही घरोघरी वॅसलिन सहज आढळते. वॅसलिनची छोटय़ात छोटी डबी काढून वॅसलिनची रेघ कोरडय़ा ओठांवर फिरवणारी मंडळी तर अनेक. आज वॅसलिन अनेक रूपांत मिळतं, पण थंडीमुळे आलेला हातांचा, चेहऱ्याचा, ओठांचा कोरडेपणा पळवून लावण्याचं त्याचं कार्य तेच. डबीत असताना पांढरट रंगाची दिसणारी ती जेली त्वचेवर लागताच तैलरूपात त्वचेला जो मऊ पणा देते तो १४८ वर्षे जुना मृदू मुलायम स्पर्श हेच वॅसलिनचं यश आहे. कोरडय़ा कठोरपणाला वाकवून मृदुता जपणारा हा ब्रॅण्ड म्हणूनच विशेष ठरावा. -रश्मी वारंग. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com
तुमच्यापैकी काही जणांनी शिक्षण संपवून नुकतीच छानशी नोकरी करण्यास सुरु केली असेल किंवा काही जणांनी खूप आधीपासून नोकरीसाठी सुरुवात केली असेल. तुम्ही करिअरच्या कोणत्या टप्प्यावर आहात किंवा तुम्ही अगदी नवखे असाल तरी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. काम करताना कधीतरी असे वाटू शकते कि आपण जे काम करतोय ते आपल्यासाठी अगदीच सोप्प आहे. किंवा याच्या विरुद्धहि वाटू शकते कि आपल्याला काहीच जमत नाहीय.असे विचार निराशजनक आहेत खरे.पण अश्या विचारांना पळवून लावून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सकारात्मक कसे राहता येईल हे पाहू.
तुमच्यापैकी काही जणांनी शिक्षण संपवून नुकतीच छानशी नोकरी करण्यास सुरु केली असेल किंवा काही जणांनी खूप आधीपासून नोकरीसाठी सुरुवात केली असेल. तुम्ही करिअरच्या कोणत्या टप्प्यावर आहात किंवा तुम्ही अगदी नवखे असाल तरी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. काम करताना कधीतरी असे वाटू शकते कि आपण जे काम करतोय ते आपल्यासाठी अगदीच सोप्प आहे. किंवा याच्या विरुद्धहि वाटू शकते कि आपल्याला काहीच जमत नाहीय.असे विचार निराशजनक आहेत खरे.पण अश्या विचारांना पळवून लावून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सकारात्मक कसे राहता येईल हे पाहू. आपल्या शब्दांवर/वचनांवर वर ठाम राहणे. जर तुम्ही एखादे काम वेळेत पूर्ण करण्याचे वचन दिले असेल तर आपल्या शब्दांवर ठाम रहा आणि कामाची डेडलाइन पाळून दिलेल्या वेळेत काम पूर्ण करा.यामुळे तुमच्या क्षमतेची जाणीव तुमच्या सहकार्यांना आणि वरिष्ठांना देखील होईल.तुमच्या बद्दलचा दृष्टिकोन सकारत्मक होईल. ऑफिस मध्ये जर कोणाला तुमच्या मदतीची गरज असेल तर नक्की मदत करा.त्यामुळे तुमची विश्वासहर्ता वाढेल. तुमची एक चांगली प्रतिमा तयार होईल अश्या सकारात्मक गोष्टी तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवतील. स्वतःचे ज्ञान वाढवा कामासंदर्भातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असतेच असे नाही.ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत पण त्यांचा उपयोग आपल्याला पुढे कधीतरी होणार आहे अशा गोष्टी शिकून घेण्याकडे आपला कल असला पाहिजे.त्यामुळे आपल्या ज्ञानात भर तर पडतेच, आपला आत्मविश्वासहि नक्कीच वाढतो.वाचन,मनन तसेच इंटरनेटमुळे आपल्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी खूपसे पर्याय उपलब्ध झालेले आहेत.त्यांचा वापर करून आपण आपले ज्ञान अजून वृद्धिंगत करू शकतो. स्वतःचे प्रवक्ते स्वतःच बना. तुम्ही केलेल्या कामाचे मापन आधी स्वतः करून पहा. जर तुम्ही स्वतःच्या कामांबाबत समाधानी असाल,तर तुमच्या कामाचे श्रेय इतर कोणालाही देण्याची गरज नाही.बरेचदा काही प्रवृत्तीच्या व्यक्ती इतरांच्या कामाचे कौतुक ते स्वतःच केल्यासारखे करतात आणि स्वतःला म्हह्त्व अथवा श्रेय मिळेल या प्रयत्नात असतात. त्यामुळे अशा बाबतीत आपण केलेले काम आपणच सादर करून इतरांना स्वतःची कार्यक्षमता पटवून देणे हे देखील महत्त्वाचे ठरते. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मैत्रीपूर्ण वातावरण तुमच्या कामांचा ताण इतरांसमोर व्यक्त न करता नेहमी हसतमुख राहणे हे खरेतर खूप कठीण आहे पण एकदा हे करणे साध्य झाले तर मग तुम्ही इतरांसाठी आदरयुक्त व्यक्तिमत्त्व ठरता. तुमच्या अचिव्हमेंट्स शेअर करा. ऑफिसमध्ये लहानातले लहान यश देखील स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. आपण केलेल्या कामाबद्दल आणि मिळवलेल्या यशाबद्दल प्रामाणिकपणे वरिष्ठांशी बोलणे हेहि तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे तुमची कार्यक्षमता त्यांच्या लक्षात राहते आणि पुढील प्रोजेक्ट साठी ते तुमचा विचार नक्कीच करू शकतात. सपोर्ट सिस्टम तयार करणे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाला सपोर्ट करणारे सहकारीच खरतर तुमची सपोर्ट सिस्टिम असते. सहकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करणे,आपापली मते सादर करणे,इतर विषयांची चर्चा या सर्व गोष्टी एकंदरीत वातावरण हलकंफुलकं ठेवण्यास मदत करतात.त्यामुळे कामाचा ताण हलका होण्यास पर्यायाने काम उत्सहात आणि आत्मविश्वासाने पूर्ण करण्यास मदत होते.स्वतःला नेहमी समृद्ध आणि सकारात्मक सहकाऱ्यांच्या वातावरणात ठेवा. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com
Click to set custom HTML
|