• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

Blogs, Thoughts & Updates

८ वर्षाचा मुलगा बनला या वर्षाचा सगळ्यात जास्त कमवणारा युट्युबर

12/21/2019

Comments

 
Picture

फोर्ब्स मॅगझिन ने बुधवारी प्रकाशित केलेल्या २०१९ च्या लिस्ट नुसार रेयान काजी हा फक्त आठ वर्षाचा मुलगा या वर्षी २६ मिलिअन डॉलर
म्हणजेच १८४ करोड कमवून या वर्षाचा सगळ्यात जास्त कमवणारा युट्युबर बनला आहे.हा मुलगा २०१८ मध्ये सुध्दा व्हीडीओ प्लॅटफॉर्म वरुन
सगळ्यात जास्त कमवणार्‍यांच्या यादीत २२ मिलिअन डॉलर कमवून टॉप मध्ये होता.

रेयान काजी याचं खर नाव रेयान गुआन अस आहे. रेयान चा जन्म ८ ऑक्टोबर २०११ मध्ये अमेरिकेतील टेक्सास मध्ये झाला 
आणि आता तो ८ वर्षाचा आहे. रेयान काजीच्या युट्युब चॅनल च नाव ' रेयान्स वर्ल्ड ' असं आहे. हे चॅनल मार्च २०१५ मध्ये रेयानच्या 
आईवडीलांच्या माध्यमातून सुरु झालं होत. तेव्हा रेयान फक्त ३ वर्षाचा होता. आता या चॅनलचे २३ मिलिअन सबस्क्राइबर आहेत.

इतके सबस्क्राइबर्स आणि करोडो कमवणारा हा मुलगा त्याच्या व्हीडीओज मध्ये नक्की करतो तरी काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तर हा मुलगा आपल्या युट्युब चॅनल वर खेळण्यांबरोबर खेळून आपले रिव्ह्युज (मत) देतो. म्हणजे रेयान त्याला गिफ्ट म्हणून मिळालेली
खेळणी अनबॉक्स करतो , त्या खेळण्याबरोबर खेळतो आणि आपलं मत सांगतो कि ते खेळण खेळायला कसं आहे. त्याच्या आशा बर्‍याचश्या
व्हीडीओज ना मिलिअन व्ह्युज आहेत. हे चॅनल आता रेयान च्या वयानुसार  खेळण्यांच्या रिव्ह्युज बरोबरच एज्युकेशनल व्हीडीओज सुध्दा बनवतं.

रेयानच्या चॅनल ने टेक्सास मधील काही मुलांनी बनवलेलं चॅनल ' डूड परफेक्ट ' ला सुध्दा मागे काढलं आहे. डूड परफेक्ट ने गेल्या वर्षी २० मिलिअन डॉलर
कमवले होते. डूड परफेक्ट या वर्षी दुसर्‍या स्थानावर आहे तर रशिया मधिल अनास्टासिया रॅडझिन्साकाया हि फक्त ५ वर्षाची मुलगी १८ मिलिअन डॉलर
कमवून तिसर्‍या स्थानावर आहे.


================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE
​असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com
Comments

Facebook Live - हसत खेळत बिझनेस

12/18/2019

Comments

 
Picture
​#ग्रेटभेट

Facebook Live - हसत खेळत बिझनेस

मी माझ्या व्यवसायाचा टर्नओवर कसा वाढवू ? प्रॉफीट कसं वाढवू ? खर्च कसे कमी करु ? नवीन माणसं ठेवू का ? नवी सॉफ्टवेअर्स घेऊ का ?

प्रत्येक उद्योजकाला या व अशाच अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. या उत्तरांच्या शोधात उद्योजक गुगल, युट्युब, वेगवेगळे सेमिनार्स पालथे घालतो. कधी उत्तरे मिळतात आणि कधी मिळत नाहीत. 

मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवीण्याची संधी आम्ही नेटभेटतर्फे घेउन आलो आहोत्...."हसत खेळत बिझनेस" या फेसबुक लाईव्ह चर्चेच्या माध्यमातून !

या "ग्रेटभेट" मध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री. महेश साठे. महेश साठे हे लघु व मध्यम उद्योगांसाठी (SME) बिझनेस कंसल्टंट आहेत. या चर्चेसाठी आपले प्रश्न तयार ठेवा किंवा खालील लिंकवर क्लिक करुन आजच आपले प्रश्न नोंदवून ठेवा.

तर मग भेटूया १९ डिसेंबर २०१९, गुरुवार  संध्याकाळी ५ वाजता

नेटभेटच्या फेसबुक पेजवर https://fb.me/marathi.netbhet .... लाईव्ह !


टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments

ग्राहकांकडून रेफरल्स मिळवून आपला बिझनेस वाढवा

12/17/2019

Comments

 
Picture
ग्राहकांकडून रेफरल्स मिळवून आपला बिझनेस वाढवा :-

माऊथ पब्लिसिटी हा कोणत्याही कंपनीच्या किंवा ब्रँडच्या मार्केटिंग धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्यांचा ग्राहकवर्ग हा साधारणपणे आधीच्या ग्राहकांच्याच संदर्भातून तयार होतो. तथापि, असा ग्राहक वर्ग आणि त्यांचे रेफरन्स मिळवण्यासाठी  ब्रॅण्डसनी त्यांच्या महत्त्वाच्या आणि आघाडीच्या क्लायंट्सना तयार करण्याची गरज असते.रेफरल्स सहज आणि नैसर्गिकरित्या मिळण्यासाठी काही वेळ लागू शकतो.आजच्या डिजिटल आणि टेक्नॉलॉजीच्या तसेच सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचणे शक्य झालेआहे.तरीही कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये खालील बाबींचा वापर करणे आणि गोष्टी अंमलात आणणे आवश्यक आहे.

 लिंक्डइनचा वापर करा 

लिंक्डइनचा वापर  हा ब्रँडला संभाव्य क्लायंट आणि ग्राहकांना जाणून घेण्याचा एक चांगला पर्याय आहे. एखादी व्यक्ती किंवा कंपनी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लिंक्डइन हा एक चांगला पर्याय आहे. आपल्या ग्राहकांना रेफरल्सबद्दल विचारण्याऐवजी, लिंक्डइनवर लीड शोधून हवे तसे संदर्भ मिळवणे ही  हे अधिक सोपे आहे.आपल्या क्लायंटसोबत कोण जोडले गेले आहे तसेच आपल्या कंपनीसाठी आवश्यक असणारे ग्राहक आहेत कि नाही हे आपण पाहू शकतो.

 समाधानी ग्राहकांना आकर्षित करा. 


एखाद्या कंपनी किंवा प्रोडक्ट बद्दल चांगला,सकारात्मक अनुभव मिळाल्यानंतर ग्राहक त्या कंपनीचा संदर्भ इतरांना नक्कीच देतात.अश्या ग्राहकांना कंपनीतर्फे मिळणाऱ्या सेवा किंवा उत्पादनाबाबत नियमितपणे योग्य माहिती वेळोवेळी दिली गेली तर हेच ग्राहक कंपनीबद्दल चांगली पब्लिसिटी करू शकतात. अश्या ग्राहकांना प्राधान्य देणे हे महत्त्वाचे ठरते.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
 

 रेफरल्ससाठी टेम्पलेट वापरा 


संपूर्ण रेफरल देवाणघेवाण प्रक्रिया सोपी करण्यासाठी ई-मेल मध्ये किंवा सॅम्पल ई-मेल मध्ये टेम्प्लेट सारखी सुविधा पुरवणे आवश्यक असते.जेणेकरून ग्राहक जेव्हा इतरांकडे  संदर्भासाठी विचारणा करतील त्यावेळेस संपूर्ण प्रक्रिया टाळून फक्त नाव आणि संबंधित रेफेरल्स बद्दल विचारणा करणे सोपे जाईल.

 चांगल्या अभिप्रायांचा योग्य जागी वापर 



चांगले रेफेरल्स तेव्हाच मिळतात जेव्हा कंपनी स्वतःची क्षमता आणि गुण सिद्ध करतेआणि ग्राहक आणि क्लाएंट्सना सुद्धा कंपनीविषयी खात्री होते.अश्या वेळी मिळालेले चांगले अभिप्राय इतरांसोबत शेअर करा. त्यामुळे अजून सकारात्मक अभिप्राय आणि संदर्भ मिळण्यास सोपे जाईल. ज्या ग्राहकांना त्यांनी दिलेल्या अभिप्रायाला प्रोत्साहन दिले जाते त्यावेळी  ते इतर क्लायंटला त्या ब्रँडबद्दल चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतात.

 नवनवीन ऑफर्सचे प्रोत्सहन 

कोणत्याही ग्राहकांना ब्रँड रेफरल्स देणे आवश्यक नाही. दरवेळी नवीन ऑफर्स प्रदान करणे हे रेफेरल्स मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते.म्ह्णूनच खूपसे  ब्रॅण्डस अश्या क्लाएंट्सवर नवीन ऑफर्सचा प्रस्ताव देतात जे त्यांना कॉन्टॅक्टस डेटा पुरवतात.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com
Comments

गम और खुशी मे फर्क ना....

12/12/2019

Comments

 
Picture
गम और खुशी मे फर्क ना....

एक माणूस देवळामध्ये प्रार्थना करत असतो. त्याचा मुलगा हॉस्पीटलमध्ये अत्यंत गंभीर आजाराने त्रस्त असतो. आणि आज त्या मुलाचे एक मोठे ऑपरेशन होणार आहे म्हणून त्याचे वडील अत्यंत उदास , खिन्न मनाने देवाकडे प्रार्थना करत असतात.

त्याच वेळेला देवळात एक मुलगा पेढे घेऊन येतो आणि ते देवासमोर ठेवून अत्यंत आनंदाने देवाला पाया पडतो. आज तो चांगल्या गुणांनी बारावी पास झालेला आहे.

काही दिवस जातात्....त्या आजारी मुलाचे वडील अत्यंत आनंदात देवासाठी पेढे घेऊन येतात. त्यांच्या मुलाचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि तो आता पुर्णपणे बरा झालाय म्हणून त्याचे वडील खुप खुश आहेत.

त्याच वेळेला देवळात एक मुलगा रडत असतो. हा तोच मुलगा आहे जो बारावी पास झाला म्हणून खुप खुश होता. पण आज मात्र तो दु:खी आहे कारण त्याला चांगल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळाले नाही. तो खुपच खिन्न आहे.

आयुष्यात काहीच शाश्वत नाही. सुखही नाही आणि दु:खही नाही. एका क्षणात होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते होऊ शकतं. म्हणूनच आनंद आणि दु़:ख या दोन्ही अवस्थांमध्ये शांत , संयमी राहणेच उचित असते. सुख आणि दु:ख दोघांनाही एकाच प्रकारे वागवता आले पाहिजे. ज्या माणसाला हे जमले त्यालाच मनःशांतीचा खरा प्रत्यय येतो.

देव आनंदच्या एका गाण्यातली ओळ म्हणूनच मला खुप आवडते..."गम और खुशी मे फर्क ना मेहसूस हो जहां, मै खुदको उस मुकाम पे लाता चला गया....मै जिंदगीका साथ निभाता चला गया !

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
===============

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकुया, प्रगती करुया !
www.netbhet.com

Comments

ध्येय निश्चिती ते ध्येय सिध्दी २०२०

12/3/2019

Comments

 
Picture
नमस्कार मित्रहो,


२०१९ साल सरत आले आहे आणि आता आपल्या सगळ्यांनाच नवीन वर्षांची सन २०२० ची चाहूल खुणावत आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात थोडंसं थांबून येणाऱ्या नवीन वर्षांसाठी योग्य प्लॅनिंग करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.   २०२० साल आपल्या आयुष्यातील एक यशस्वी वर्ष बनवायचं असेल तर त्यासाठी योग्य ध्येय ठरवणे आणि ते पूर्ण करण्यासाठी Action Plan बनविणे हे अत्यंत महत्वाचे आहे. 

म्हणूनच मित्रांनो यावेळच्या “ग्रेटभेट” या  फेसबुक लाईव्ह कार्यक्रमा मध्ये आपण माहिती घेणार आहोत ध्येय निश्चिती ते ध्येय सिध्दी २०२० याबद्दल . याविषयी नेटभेटच्या सर्व सभासदांना मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत प्रसिद्ध ट्रेनर, प्रेरणादायी वक्ते आणि उद्योजक श्री. केतन गावंड यांना !

दिनांक ५ डिसेंबर २०१९, गुरुवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत आपण “श्री केतन गावंड” यांना भेटूया नेटभेट च्या फेसबुक पेजवर LIVE ! 

फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी आणि आपल्या प्रश्नांची live उत्तरे मिळविण्यासाठी https://www.facebook.com/marathi.netbhet/  या लिंकवर क्लिक करून नेटभेट च्या फेसबुक पेजला भेट द्या!

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
www.netbhet.como edit.
Comments

नवीन इनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स

12/3/2019

Comments

 
​नमस्कार मित्रांनो,

या लेखामध्ये आपण काही नवीन इनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स पाहणार आहोत. सध्या इंटरनेट, मोबाईल, टेकनॉलॉजि यांची खूप प्रगती होत आहे आणि या सगळ्यामुळे अनेक इंनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स तयार झाले आहेत. खूप साऱ्या उद्योजकांनी याचा चांगल्या प्रकारे वापर केला आहे. आणि नवनवीन स्टार्टअप्स चालू केले आहेत. आणि त्यापैकीच काही मोठे बिझनेस देखील बनले आहेत.
तुम्ही हे नवीन बिझनेस मॉडेल्स वापरून तुमचा बिझनेस  चालु करु शकता किंवा ग्राहकांचा एखादा प्रश्न सोडवून त्याच्यातून एक नवा आणि मोठा बिझनेस उभारू शकता. चला तर मग आता आपण ओळख करून घेऊयात या नव्या बिझनेस मॉडेल्सची.

ऑन डिमांड बिझनेस मॉडेल : (On  Demand Business Model )
यामध्ये नावाप्रमाणेच आपल्याला हवे तेव्हा किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा प्रॉडक्ट किंवा सेवा

सध्या वेळ हा खूप महत्वाचा घटक आहे आणि जिथे जिथे वेळ वाचवणे शक्य आहे तिथे लोक वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळेच ऑन डिमांड बिझनेस मॉडेल्स चालत आहे. ऑन डिमांड बिझनेस मॉडेल्स ची खूप सारी उदाहरणे आहेत. सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे उबर किंवा ओलाच. ऑन डिमांड आपल्याला पाहिजे तेव्हा आपण अँप मधून बुक केलं की गाडी आपल्यासमोर हजर होते. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती आपल्या समोर येते. हे झालं ऑन डिमांड बिझनेस मॉडेल. या बिझनेस मॉडेलमद्ये खूप सारे स्टार्टअप आहेत. आणि त्या खूप जोमाने वाढत देखील आहेत.

२.  शेअरिंग इकॉनॉमी  :
शेअरिंग इकॉनॉमी म्हणजे वस्तू किंवा गोष्टी आपापसात वाटून घेतल्या जातात.  राईड शेअरिंग म्हणजे तुम्ही ऑफिसला जातायेता रस्त्याने जाणाऱ्या माणसांना तुमच्या गाडीत घेऊन जाऊ शकता आणि त्याचे पैसे आकारू शकता. हे यापूर्वी देखील शक्य होतं. इतक्या मोठ्या प्रमाणावर करता येणं शक्य नव्हतं. परंतु आता मोबाईल फोनमुळे तुम्ही कुठेही ARBN ची रूम बुक करू शकता. भारतात देखील खूप साऱ्या सर्विसेस आहेत जुगनू, लीफटो  आहे ज्या राईड शेअरिंग मध्ये आहेत. जुगनू ऑटोरिक्षाच शेअरिंग करत. त्याच्यामुळे तुम्ही हे जुगनू अँप वापरून रिक्षा इतर व्यक्तींसोबत शेअर करू शकता.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================

३. अग्रीगेटर बिझनेस मॉडेल  :
हे बिझनेस मॉडेल सध्या खूप चालतंय आणि त्यांनी त्याची ग्रोथ हि खूप जलद होतं आहे.  याच एक उदाहरण म्हणजे वयोरुम्स. कदाचित तुम्ही हे देखील नाव ऐकलं असेल. ओयोरुम्स हे भारतातील सगळ्यात मोठं हॉटेल चैन आहे परंतु त्यांची स्वतःची एकही हॉटेल नाही. रितेश अग्रवाल या २१ वर्षीय मुलाने सुरु केलेलं हे स्टार्टअप आज भारतातील सगळयात मोठी हॉटेल चैन आहे. ओयो रूम ने अग्रीगेटर बिझनेस मॉडेल वापरलं आहे. म्हणजेच हे ओयोरुम्स वेगवेगळ्या हॉटेल्स सोबत टायप्स करत आणि त्यांना ग्राहक आणून द्यायचं काम करत. त्याच प्रोसेसमध्ये त्यांनी सगळ्या हॉटेल्सला स्टॅंडर्ड केलेलं आहे. ते स्टॅंडर्ड म्हणजे ओयोरुम्स चे ब्रँड आणि प्रोसेस असणार. हॉटेलचे मॅनेजमेंट, रिसेप्शन, बुकिंग कसे असावे हे देखील तेच बघणार. अश्याच इतर गोष्टी देखील ठरवून दिलेल्या आहेत. भारतात कुठेही रूम बुक केली तरी एकसमान अनुभव मिळावा किंवा सामान दर्जाची सर्विस मिळावी. आणि यालाच अग्रीगेटर मॉडेल असे म्हणतात. त्याचप्रमाणे झोस्टलने हॉस्टेल ची सर्विसेस दिलेली आहे. विविध ठिकाणच्या होस्टेल्सला त्यांनी एकत्र केलं, त्यांचं ब्रॅण्डिंग, प्रोसेस स्टॅंडर्ड केल्या आणि मग एका अँपद्वारे त्यांनी त्यांना ग्राहक द्यायला सुरुवात केली.

४. फ्रीमीयम बिझनेस मॉडेल . :
फ्रीमियम बिझनेस मॉडेल म्हणजे फ्री आणि प्रीमियम. या दोन शब्दांचा मिळून फ्रीमियम हा तयार झालेला आहे. यांचा कन्सेप्ट अतिशय सोपा आहे. बऱ्याचवेळा आपल्याला माहित नसत म्हणून आपण काही गोष्टी विकत घेत नाहीत. या गोष्टी खरंच आपल्याला उपयोगात येणार आहेत का ? आपण त्याचा योग्य वापर करू शकू का? किंवा आपल्याला हवे असलेले सगळे फिचर त्यामध्ये आहेत का ? इ. गोष्टींची खात्री नसल्यामुळे आपण त्या विकत घेत नाही. हा जो विरोध आहे तो तोडण्यासाठी फ्रीमियम बिझनेस मॉडेलची सुरुवात झाली आहे.

या मॉडेल मध्ये प्रॉडक्ट आधी फ्री मध्ये दिलं जात. आणि त्याचे काही अधिक फिचर वापरण्यासाठी मात्र आपल्याला पैसे द्यावे लागतात. फ्री मध्ये प्रॉडक्ट वापरण्यासाठी दिल्यामुळे ग्राहकांना काही त्रासही होतं नाही. ते लगेच वापरायला सुरु देखील करतात आणि मग ते ठरवतात की ते प्रॉडक्ट चांगलं की वाईट. आणि जर ते प्रॉडक्ट त्यांना आवडत असेल तर त्याचे बाकीचे फिचर वापरण्यासाठी आपण पैसे देऊन ते विकत घेऊ शकतो. फ्रीमियम हे अतिशय चांगलं बिझनेस मॉडेल आहे. कारण त्याचमुळे आपल्याला जास्तीतजास्त ग्राहक मिळवून देतात. खूप ग्राहकांजवळ आपल्याला एकत्रितरित्या पोचायचं असेल तर त्यासाठी फ्रीमियम खूप चांगलं बिझनेस मॉडेल आहे.
जर तुम्ही नेटभेटच उदाहरण बघितलंत तर आम्ही फ्रीमियम या बिझनेस मॉडेल मध्ये काम करतो. आमचे काही कोर्सेस हे फ्री दिलेले आहेत. जे वापरून लोकांना नेटभेटच्या ओळख होते, ऑनलाईन कोर्सेस कसे असतात ते समजत, ऑनलाईन कोर्सेस आपल्याला जमतात की नाही, ते करून आपल्याला माहिती मिळते की नाही, ओनलाईन शिकणं आपल्याला उचित आहे की नाही  हे सगळं लोकांना कळतं. आणि त्यानंतर आवडलं तर ते जे पेड कोर्सेस आहेत ते विकत घेतात.

बरेचशे मोबाईल अँप्लिकेशन हे देखील फ्रीमियम मॉडेल मध्ये काम करतात. आधी ते फ्री असतात पण त्यातील आणखी काही फिचर वापरण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. त्यानंतर सॉफ्टवेअर सुद्धा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे लोकं आधी ती इन्व्हेस्टमेंट करायला तयार नसतात. पण जर फ्री सॉफ्टवेअर असेल तर लोकं डोअवनलोड करून वापरून बघतात. आणि जर आवडलं तर मग त्याचे पैसे देतात.
फ्रीमियम बिझनेस मॉडेल मात्र सगळ्यांना देता येत नाही. डिजिटल बिझनेस मॉडेल हे फ्रीमियम बिझनेस मॉडेल मध्ये काम करतात. कारण ते जे प्रॉडक्ट जर एका व्यक्तीला फ्री मध्ये दिलं किंवा दहा व्यक्तींना फ्री मध्ये दिलं तरी त्याची कॉस्ट फारशी वाढत नाही, आणि त्यामुळे त्यांना ते परवडू शकत म्हणून  फ्रीमियम मॉडेल हे डिजिटल सर्विसेस मध्ये असत.  

५. मार्केटप्लेस बिझनेस मॉडेल :
मार्केटप्लेस म्हणजे बाजार. या बाजारात विकत देणारे  आणि विकत घेणारे सुद्धा असतात. आणि हा बाजार तयार करणारे जे असतात त्यांना मार्केटप्लेस प्लेयर्स. मॉल्स मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर मॉल्स हे स्वतःहून काही विकत नाही. मॉल्समद्ये वेगवेगळी दुकाने असतात, आणि ती ग्राहकांना विकत असतात, तसाच मार्केटप्लेसच सुद्धा आहे. ऑनलाईन मार्केट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर अमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या मार्केटप्लेस कंपन्या आहेत. OLX किस्वा Quicker ह्या सेकंडहँड मालाच्या मार्केटप्लेस कंपन्या आहेत. ह्या कंपन्या स्वतःहून काही विक्री करत नाही. परंतु या कंपन्यांमध्ये सेलर्स असतात. आणि कंपन्यांमध्ये विकत घेण्यासाठी येणारे ऑनलाईन ग्राहक देखील असतात.पण मार्केटप्लेस यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त ग्राहक असले पाहिजेत. किंवा खूप जास्त सेलर्स असले पाहिजेत. खूप जास्त सेलर्स असतील तर जास्त ग्राहक येतात. आणि जर खूप जास्त ग्राहक असतील तर खूप जास्त सेलर्स येतात. त्यामुळे हा बिझनेस वाढवणं जरा कठीण आहे. पण तो जर एकदा वाढला तर त्याची पुढची पातळी गाठणं सहज सोपं आहे.

तर मित्रांनो आज आपण खूप सारे बिझनेस मॉडेल बघितले आणि मला खात्रीच हे की तुम्ही यापैकी एखादा निवडून तुमचा बिझनेस देखील सुरु करू शकता.
ऑल द बेस्ट! धन्यवाद !!

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
Comments

कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

11/12/2019

Comments

 


खुप खुप वर्षांपुर्वी एका माणसाने "पपेर मिल" चा व्यवसाय सुरु केला.
व्यवसाय चांगला चालू लागला...तेव्हा त्याला आणखी एक पेपर मिल सुरु करावीशी वाटली
....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !
त्याने दुसरी मिल सुरु केली. व्याप वाढत होता. म्हणून त्याने आपल्या मित्राला सोबतीला घेतले.
त्याचा हा मित्र हुषार होता. त्याने पाहिले की "वीज निर्मीती" हा भविष्यातील एक चांगला उद्योग होऊ शकतो.
त्या कंपनीने वीज निर्मीती सुरु केली !
....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !
हा मित्र पुढे कंपनीचा चेअरमन झाला. कंपनीचा व्याप वाढत होता. त्या कंपनीकडे पाहून इतरही अनेकजण वीजनिर्मीती कडे वळले. स्पर्धा वाढली.
त्याने ३-४ कंपन्यांना सांगीतले की आपण एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकत्र मिळून काम केले तर खुप मोठे होउ. आणि तसे एकत्र काम सुरु केले.
कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !
पुढे कंपनी आणखी एका महत्त्वाच्या उद्योगात उतरली "रबर"च्या !

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

"रबर" साठी कंपनीला "सोव्हीएट युनिअन"च्या रुपाने मोठा ग्राहक मिळाला, "सोव्हीएट युनिअन"मध्ये व्यवसाय करत असताना कंपनीला जाणवले की

"इलेक्ट्रॉनिक्स"ची मागणी वाढते आहे, कंपनीने लगेचच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बनवायला सुरु केली.

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

तेव्हाचा काळ हा शीत युद्धाचा होता. अमेरिका आणि सोव्हीएट युनिअन मध्ये छुपं युद्ध चालू होतं. या कंपनीला अमेरिकन सैन्यदलाने गाठले आणि

सोव्हीएट युनिअनला कोणती उत्पादने पुरविली जात आहेत, याची माहिती मागीतली.

अमेरिकेला ही माहिती पुरविण्यासोबत आपली उत्पादनेही विकायला या कंपनीने सुरु केले.

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============

पुढे ही कंपनी टेलिव्हीजन च्या उद्योगात उतरली आणि मोठी झाली. युरोपातील तिसरे सर्वाधिक टीव्ही उत्पादन करणारी ही कंपनी बनली.

पण पुढे टीव्हीचा खप कमी होऊ लागला म्हणून या कंपनीने टीव्हीचे उत्पादन बंद करायला मागे पुढे पाहिले नाही.

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

आता कंपनीला नविन कंप्युटरचे नविन क्षेत्र खुणावत होते. याही क्षेत्रात कंपनीने मुसंडी मारली. नंतर नवा सीईओ आला.

त्याने पाहिले की कंपनीचा पसारा प्रचंड वाढला आहे आणि तो सांभाळण्यात कंपनीचा वेळ आणि पैसा खर्च होतोय.

नव्या सीईओने अनेक उद्योग बंद केले आणि एकाच उद्योगावर लक्ष केंद्रित केले

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============

ज्या क्षेत्रात या कंपनीने लक्ष केंद्रित केले त्यामध्ये तर कमालीची प्रगती केली. अगदी जगभर कंपनीचे नाव झाले.

इतके की जगातील पहिल्या पाच टॉप ब्रँड्स मध्ये या कंपनीचे नाव आले.

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

कंपनीच्या सुरुवाती पासून एवढी भरभराट झाली की कधी या कंपनीचं काही वाईट होईल असं कुणालाच वाटलं नाही.

दुर्दैवाने तसं झालं नाही. पुढच्या फक्त ५ वर्षात कंपनीची पिछेहाट झाली. इतकी की कंपनी बंद पडायला आली..... कारण माहिती आहे...

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून *घेतलं नाही* !

म्हणतात ना, नाव कमवायला पुर्ण आयुष्य लागतं पण ते हरवायला एक चुक पण पुरेशी ठरते....या कंपनीच्या बाबतीत हे शब्दशः खरे ठरले.


काय मित्रांनो, लक्षात आलं का ? मी कोणत्या कंपनी बद्दल बोलतोय ?

चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल की ज्या कंपनीबद्दल आपण बोलतोय ती आहे "नोकिया" !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
Comments

एक तृतीयांश वेळ

9/21/2019

Comments

 
Picture
आपण नेहमी आपल्यासारख्या समविचारी माणसांसोबत वेळ घालवणेच नेहमी पसंत करतो. किंबहुना आपण सोयीस्कररीत्या अशी सवय लावून घेतो.  
 
आपल्यासारखेच वागणारे,आवडी-निवडी सारखे असणारे, समान विचार करणारे आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवणे हे आपल्यासाठी सोयीचे आणि मोकळेपणाचे ठरते. हे लोकं आपल्याला आपण एकटे नाहीत याची जाणीव करून देत असतात.

परंतु हे लोक आपण आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून सिद्ध करण्यासाठी  अथवा वाढ होण्यासाठी तसेच निरनिराळ्या अनुभवाने समृद्ध होण्यासाठी पुरेशी नसतात. 


म्हणूनच समृद्ध होण्यासाठी,अनुभव संपन्न होण्यासाठी,यशस्वी होण्यासाठी काहीसा न आवडणारा ⅓ नियम पाळणे महत्त्वाचे ठरते.पण हा नियम पाळायचा म्हणजे नक्की काय हे आपण सविस्तर पाहू. 
 
===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
================

 जे तुमच्यापेक्षा हुशार,वरचढ आहेत अशा लोकांसोबत तुमचा ⅓  वेळ घालवा.ते तुमचे मार्गदर्शक,गुरु म्हणून नेहमी मदत करतील.अगदी तुमचे समवयस्क मित्र ज्यांनी यशाचा टप्पा  काहीसा आधीच गाठला आहे.असे लोक अथवा मित्र ज्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती केली आहे,अश्या लोकांच्या निव्वळ सानिध्यात राहिल्याने देखील तुमच्यात आमूलाग्र बदल होऊ शकतात. 

तुमचा दुसरा एक तृतीयांश वेळ अश्या लोकांसोबत घालवा जे अगदी तुमच्यासारखेच आहेत.तुमचे मित्र,ऑफिस मधले सहकारी असे लोक जे आता सध्या तुम्ही यशाच्या ज्या पायरी जवळ आहात ते देखील त्याच टप्प्यावर आहेत आणि त्यांनादेखील तुमच्या प्रमाणेच प्रगती करायची आहे. उदा. असे मित्र ज्यांची शैक्षणिक तसेच करिअरची सुरुवात तुमच्यासोबत झाली आहे,जे तुमच्यासारखेच पहिल्यांदाच पालक होणार आहेत.अश्या मित्रांच्या,व्यक्तींच्या सोबत वेळ घालवल्याने तुम्ही चालत असलेल्या मार्गावरून पुढे जात असताना विश्वास,दिलासा मिळतो.असे मित्र तुमच्या अडचणी,समस्या  समजून घेण्यास सदैव तयार असतात आणि आपल्याला सतत आपण एकटे नाही आहोत याची जाणीव करून देतात.जितकी गरज तुम्हाला त्यांची असते तितकीच त्यांनाही तुमची गरज असते.     

तुमचा तिसरा ⅓ वेळ जी लोकं तुमच्यासारखी यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहेत,अश्या लोकांसोबत घालवा.तुम्ही जितकं स्वतःला अपडेट करत राहाल, तसाच प्रयत्न हिलोकं सुद्धा तुमच्यासारखं बनण्यासाठी प्रयत्न करत राहती.ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी लोंकाना तुमचा आदर्श मानता,मदत घेता त्याचप्रमाणे तुमचे योग्य सल्ले,मार्गदर्शन त्यांना तुमच्याप्रमाणे बनण्यास मदत करतील.तुम्ही जितकं जास्तीत जास्त ज्ञान त्यांना द्याल तितकं जास्त आणि नवनवीन माहिती,ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवाल.त्यामुळे स्वतःला अहंकारापासून दूर ठेवू शकाल. 

  आपण ज्या व्यक्तींच्या सहवासात रमतो त्यांचा,त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. म्हणूनच आपण कोणती सोबत निवडतो हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप मोलाचे ठरते. म्हणूनच म्हटले आहे.... सुसंगती सदा घडो।सुजन वाक्य कानी पडो!

===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
================ 
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments

कोणतीही गोष्ट विकण्याआधी हे जरूर वाचा!

9/12/2019

Comments

 
Picture
कोणत्याही बिझनेसमध्ये जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचणे ही  सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ग्राहकांसोबत व्यवहार करताना नेमक्या काय गोष्टींचा विचार केला पाहिजे जेणेकरून बिझनेससाठी फायद्याचे ठरू शकते यासाठी काही छोट्या पण खास टिप्स.

1. सेल्स मीटिंग किवा कॉल च्या पहिल्या चार सेकंदात तुमची बुद्धी,उत्साह आणि अनुभव याची चुणुक दाखवा.

2. ग्राहकांचे कुतूहल जागृत होईल असे प्रश्न विचारा

3. ग्राहक विकत घेताना तर्कशुद्ध विचार करत नाहीत तर भावनाधिन होऊन विचार करा.

4.ग्राहकाला खरोखरच या व्यवहाराची गरज का आहे हे पटवून द्या.

5.तुमचा उत्तम आणि सकारात्मक भविष्याचा दृष्टिकोन विका.

===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
================

6. ग्राहकांच्या नेमक्या गरजा जाणून घेण्यासाठी त्यांच्याबद्दल अधिकाधिक माहिती घ्या. 

7.तुमचे उत्पादन कसे अप्रतिम आहे हे एकापेक्षा अधिक वेळा सांगा, त्यामुळे ग्राहक त्यादृष्टीने विचार करू लागतो

8. किंमत कमी करून विकण्याचा प्रयत्न करणे हा अपयशाचा हमखास मार्ग आहे

9. प्रत्येक ग्राहकांशी बोलताना सुरुवात कशी करणार, कोणती वाक्ये बोलणार, कोणते शब्द उच्चरणार याची कसून तयारी करा

10. प्रत्येक ग्राहक विकत घेईलच असे नाही. सुरुवातीच्या अपयशाने धीर सोडू नका, प्रयत्न करत रहा !

===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
================ 
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments

प्रगल्भता म्हणजे काय?

9/11/2019

Comments

 
Picture
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.   

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.   

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.  

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.   

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.  

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.  

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.      

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.    

===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
================

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.  

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.   

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो. 

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.  

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता. 

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.   

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.   

आणि शेवटी अती महत्वाचे 

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.

Be Happy with Nothing, You will be Happy with Everything.

===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
================ 
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments

नेटभेट गणेशोत्सव ऑफर २०१९

8/31/2019

Comments

 
नमस्कार,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आपणा सर्वाना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा !

मित्रहो, आम्ही तुमच्या साठी एक खास गणेशोत्सव भेट आणली आहे. नेटभेटचे आतापर्यंत प्रसिद्ध झालेले २४ कोर्सेस आम्ही उपलब्ध करून देत आहोत ८५% सवलती मध्ये.

*नेटभेटच्या खालील सर्व २४ कोर्सेसची एकत्रित किंमत ४०००० पेक्षा जास्त आहे , पण आमच्या गणेशोत्सव स्पेशल मेगा ऑफरमध्ये तुम्हाला भरघोस सवलतीत हे कोर्सेस मिळवता येतील.*

१. Online Access - सरासरी किंमत रुपये २०८ प्रति कोर्स पासून ऑफर सुरु  
२. Offline Access (पेन ड्राइव्ह) - सरासरी किंमत रुपये २५० प्रति कोर्स
३. नेटभेट V.I.P Pass - आतापर्यंत प्रकाशित झालेले आणि पुढील ३ वर्षांत होणारे नेटभेट चे सर्व ऑनलाईन कोर्सेस एकाच आकर्षक किंमतीत !    

ऑफर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
फर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://offers.netbhet.com/

त्वरा करा !

ऑफर फक्त १२ सप्टेंबर २०१९ , रात्री १२ वाजेपर्यंतच उपलब्ध राहील !

नेटभेट मेगा ऑफर मध्ये खालील २४ कोर्सेस तुम्हाला मिळविता येतील -
१. उद्योजकता विकास प्रशिक्षण ( Entrepreneurship Development Course)
२. बिझनेस प्लान कसा तयार करावा ? (Business Plan)
३. वर्डप्रेस वेबसाईट बनवायला शिका (प्रोग्रामिंगशिवाय) (Wordpress Web Design)
४. अँड्रॉईड अ‍ॅप बनवायला शिका (Create Android Apps without Programming)
५. आर्थिक नियोजन (गुंतवणुकीतून श्रीमंतीचा मंत्र) (Personal Finance Expert)
६. संपूर्ण ब्लॉगिंग कोर्स (Blogging Expert)
७. ३० मिनिटात वेबसाईट बनवा तेही मोफत ! (Create Websites in 30 Minutes)
८. फेसबुक मार्केटिंग एक्स्पर्ट (Facebook Marketing Expert)
९. मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट (Microsoft Word Expert)
१०. मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट (Microsoft Excel Expert)
११. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट एक्स्पर्ट (Microsoft PowerPoint Expert)
१२. इंस्टाग्रामची ओळख (Instagram Fundamentals)
१३. इंस्टाग्राम मार्केटिंग एक्स्पर्ट (Instagram Marketing experts)
१४. ट्वीटरची ओळख (Twitter Fundamentals)
१५. ट्वीटर मार्केटिंग एक्स्पर्ट (Twitter Marketing Expert)
१६. मुलाखतीची तयारी (Interview Preperation)
१७. युट्युब मधून ऑनलाईन पैसे कमावण्याची कला (Earn Online with Youtube)
१८. HTML प्रोग्रामिंग शिका मराठीतून ! (HTML Programming)
१९. CSS प्रोग्रामिंग शिका मराठीतून ! (CSS Programming)
२०. वेळ व्यवस्थापन (Time Management)
२१. जीमेलचा प्रभावी वापर (Gmail Productivity Expert)
२२. लिंक्डईनचा प्रभावी वापर (Linkedin Strategies For Business Growth)
२३. ध्येयनिश्चीती ते ध्येयपुर्ती (Setting & Achieving Goals)
२४. ग्रेटभेट (विविध क्षेत्रांतील तज्ञांच्या मुलाखती) (Greatbhet)


*ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीच नाही !!*

​लक्षात ठेवा, शिक्षण ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! 

मातृभाषेतून शिकूया ! प्रगती करुया !!


अधिक माहिती साठी भेट द्या - https://offers.netbhet.com/ किंवा whatsapp/ फोन करा 9082205254

धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
www.netbhet.com
Comments

शेअर बाजाराची संपूर्ण माहिती मराठीतून

8/29/2019

Comments

 
Picture
​नमस्कार मित्रहो,

शेअर बाजार हा विषय आपल्याला जवळचाही वाटतो आणि तितकाच परकाही. अजूनही साधारण दहापैकी ८ लोक शेअर मार्केटपासून अनभिज्ञ आहेत.योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे शेअर बाजाराच्या नादाला आपण जातच नाही. 

यासाठीच नेटभेट तर्फे एक फेसबुक लाईव्ह चर्चा आयोजित करण्यात आली होती आणि यात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झाले होते श्री.चंद्रशेखर ठाकूर सर. 

ठाकूर सर गेली ५२ वर्षे मुंबई शेअर बाजारामध्ये कार्यरत आहेत. CDSL मध्ये गुंतवणुकदार प्रशिक्षण या विभागाचे ते माजी प्रमुख होते. आर्थिक साक्षरता प्रसारासाठी त्यांनी १५०० पेक्षाही जास्त व्याख्याने देशभरात दिली आहेत. शहरातच नव्हे तर अगदी खेडेगावातही त्यांनी आर्थिक साक्षरता प्रसाराचे काम केले आहे.

तेव्हा मित्रहो,ठाकूर सरांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुकीचे विविध पर्याय याबद्दल अतिशय मोलाची माहिती नेटभेटच्या या फेसबुक लाईव्ह चर्चेमध्ये आपल्यासोबत शेअर केली. त्यांच्या सोबतच्या चर्चेचा हा व्हिडीओ नेटभेटच्या वाचकांसाठी सादर करत आहोत.
​हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com
Comments

"आकर्षणाचा सिद्धांत (Law of Attraction):विचार बदला,आयुष्य घडवा"

8/27/2019

Comments

 
Picture
नमस्कार,

मित्रांनो ,प्रत्येकाला वाटतं की आपण आपले आयुष्य आपल्या मनासारखे जगावे ,नेहमी सकारात्मक विचार करावा..आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय? शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या मनाला कसे वळण लावायचे ,आपली जीवनशैली कशी बदलायची ,आपल्या मनानुसार जीवन कसे जगायचे अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी नेटभेटच्या #ग्रेटभेट या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात "आकर्षणाचा सिद्धांत : विचार बदला,आयुष्य घडवा" या विषयावरील  चर्चेमध्ये सहभागी झाल्या होत्या  वृंदा आचार्य.

त्यांच्या सोबतच्या चर्चेचा हा व्हिडीओ नेटभेटच्या वाचकांसाठी सादर करत आहोत.

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
​नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com

Comments

असा घडला मार्केटिंगचा प्रवास

8/27/2019

Comments

 
Picture
मित्रांनो,आपण मार्केटिंगच्या जगात वावरत आहोत. आपल्या आजूबाजूला सतत जाहिरातींचा भडीमार होत असताना आपल्याला दिसतं. मार्केटिंगचं हे युग यायला मार्केटिंगने खूप प्रवास केलेला आहे. मार्केटिंगच्या सुरुवातीपासून जेव्हा माणसांच्या आयुष्यात तसेच समाजामध्ये व्यापार,दळण वळण सुरु झालं तेव्हापासून ते आतापयंत मार्केटिंगने खूप मोठा पल्ला गाठलाय आणि यालाच Evolution of Marketing म्हणतात. 
​
मार्केटिंगचा हा जो विकास होत गेला त्याच्या ७ पायऱ्या/काळ आहेत ज्यामध्ये मार्केटिंग टप्प्याटप्प्याने विकसित होत गेले. मार्केटिंगच्या या प्रवासाबद्दल आपण या व्हिडीओ मध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यातूनच आजच्या काळात आपल्या उद्योगासाठी मार्केटिंग करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत तेव्हा हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com

Comments

कोणत्याही इमेजचा बॅकग्राऊंड काढा फक्त 5 सेकंदात

8/24/2019

Comments

 
Picture
कोणत्याही इमेजचा बॅकग्राऊंड काढा फक्त 5 सेकंदात


मित्रांनो, मी जरी बिझनेस आणि मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करत असलो तरी माझं पहिली आवड तंत्रज्ञान हेच आहे.अजून ही मी सतत नवनवीन अ‍ॅप, वेबसाइट्स, प्रोग्राम्स जे आपलं काम सोपं, सुकर करतील, यांच्या शोधत असतो.

सोशल मीडिया मध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेला अशी गरज भासते की एखाद्या इमेगमध्ये आपल्याला बॅकग्राउंड नको असते.कधी तो बॅकग्राऊंड चुकीचा आलेला असतो कधी चुकून एखादा माणूस आलेला असतो,किंवा इतरही अनेक कारणे असू शकतात.मग आपल्याला फक्त आपली मुख्य इमेज हवी असते.

खरंतर हे करण्यासाठी फोटोशॉप किंवा इतरही अनेक टूल्स आहेत पण ते शिकण्यासाठी बराच वेळ जातो आणि जरी आपण शिकलो तरी प्रत्यक्षात काम करणं वेळखाऊ असतं. म्हणूनच आज मी तुम्हाला अशी एक वेबसाईट दाखवणार आहे जी वापरून कोणत्याही इमेजचा बॅकग्राऊंड काढता येऊ शकतो तसेच दुसरा add ही करता येऊ शकतो.त्यासाठी हा व्हिडिओ  नक्की पहा.
​हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================ 
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com
Comments

बिलीफ सिस्टीम !

8/24/2019

Comments

 
Picture
लोक विचारतात, “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का?”

माझं उत्तर असतं, “आनंदी लोकंच यशस्वी होतात, आणि यशस्वी लोकं तर नेहमीच आनंदी असतात.”

मग प्रश्न पडतो, जगामध्ये आनंदी आणि यशस्वी लोकं इतके कमी का आहेत? त्यांना काय वरुन येताना देवाने काही वेगळी प्रोग्रॅमींग करुन पाठवलेले असते का?
शुन्यातुन साम्राज्य निर्माण करणार्‍या लोकांच्या मेंदुत एखादी स्पेशल चीप बसवलेली असते का? जी त्यांना एक्स्ट्रा ऑर्डीनरी बनवते?

धीरुभाई अंबानी म्हटलं की काय आठवतं?  – पैसा, प्रगती, झपाटलेपणा, संपत्ती!  
तेच जेआरडी टाटा म्हटलं की - पैशासोबतच सचोटी, दानशुरपणा आणि मुल्यांची जपणुक!
स्टीव्ह जॉब्ज म्हणजे – गॅझेटच्या जगातली क्रांती!
तेंडूलकर किंवा अमिताभ म्हणजे शिस्त, प्रचंड आणि कठोर परिश्रम!
जगाला प्रदुषणमुक्त करण्याचं स्वप्न बघणारा निकोल टेस्ला माहितीये?
जगप्रसिद्ध व्हर्जिन ग्रुपचा मालक ‘रिचर्ड ब्रॅन्सन’? बारा बारा उद्योगामध्ये एक नंबरवर असलेला हा माणुस तुम्हाला नेहमी समुद्रकिनार्‍यावर मजा करताना दिसेल! 
ह्या लोकांनी जगाला प्रभावित केलं ह्याचं कारण काय? 
ह्या लोकांपेक्षा असं काय वेगळं होतं,जे इतर लोकांकडे नव्हतं!
बिलीफ सिस्टीम!

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================ 


तुम्हाला त्या पायाला दोरखंड बांधलेल्या हत्तीची गोष्ट माहितीये? त्याच्या मनावर लहानपणापासुन बिंबवलेलं असतं, की तो दोरखंड तोडू शकत नाही, आणि हा जगातला सर्वात शक्तिशाली प्राणी शेळी बनुन जगतो, केवळ त्याच्या बिलीफ सिस्टिम मुळे!

आपल्या आयुष्यात आलेली संकटं, अपयशं आपल्याला असं भासवतात, की आपण दुर्बळ आहोत, पण आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तीचा प्रचंड साठा आपल्या मनात आणि शरीरात दडलेला असतो.
बिलीफ सिस्टीमचं एक उदाहरण देतो, 
समजा, तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या घरी एका कार्यक्रमात गेला आहेत, जेवणे चालु आहेत वाढण्यात तुम्हीही त्या परिवाराला मदत करत आहात आणि कोणीतरी सांगतं,
“जा बरं, किचनमधुन तेवढं मीठ घेऊन ये!”
तुम्ही किचन मध्ये जाता, पण मनात विचार येतो, “इथे मी नवीन आहे,मला यांच्या घरातलं मीठाचं भांडं कसं सापडेल, बरं?”

अस्ताव्यस्त किचनमध्ये आपल्याला ते मीठाचं भांडं दिसतच नाही, आपण रिकाम्या हाताने वापस आलेलं पाहुन ती व्यक्ती म्हणते, “अरे समोरचं तर ठेवलेलं आहे, ”आणि आपल्या हाताला धरुन ती किचन मध्ये येऊन भांडं दाखवते, आणि मीठाचं भांडं एकदम समोरच असतं,”
आपल्याला ते आधी सापडत नाही कारण आपण स्वतःला ऑर्डर दिलेली असते, की “मला ते सापडणार नाही आणि आपलं अंतर्मन अगदी तसचं घडवतं.” 

बिलीफ सिस्टीम माणसाला यशाच्या शिखरावर पोहचवते किंवा त्याची तरी धुळधाण करते,
चांगली बिलीफ सिस्टीम म्हणजे, ‘माझ्याकडे काय नाही’,  हे न पाहता, ‘माझ्याकडे काय काय आहे?’ याचा विचार करणं!

रजनीकांत कंडक्टर होता, त्याच्याकडे हिरोसाठी लागणारा गोरागोमटा, लोभस चेहरा नव्हता, पण त्याच्याकडे स्टाईल आणि डायलॉग डिलीव्हरी होती, त्याने त्याच्यावर फोकस केला आज तो जगातला असा एकमेव अभिनेता आहे. ज्याचे पिक्चर जपानमध्येही हाऊसफुल होतात.

अमिताभला सांगण्यात आलं होतं, तुझी उंची तुझा हिरो बनण्यातला अडसर आहे. अनेक रिजेक्शन नंतरही अमिताभ निराश झाला नाही त्याने स्वतःला विचारलं माझ्याकडे काय चांगलं आहे? त्याने असा काही आवाज कमवला दोन मिनीटांच्या निवेदनासाठी आज त्याला करोडो रुपये ऑफर होतात.

जेफ बेजोस असो वा जेक मा, 
स्टीव्ह जॉब्ज असो वा बिल गेटस. 
नारायण मुर्ती असो वा नरेंद्र मोदी.
दिपीका पदुकोन असो वा माधुरी दिक्षीत.
महेंद्रसिंग धोनीपासुन संदीप महेश्वरी पर्यंत.
स्वामी विवेकानंदांपासुन, विवेक बिंद्रांपर्यंत.
कोणतही, तुमच्या फेव्हरेट असलेलं कोणतंही कॅरॅक्टर तुमच्या डोळ्यासमोर आणुन बघा, 
त्याच्या यशाचं उत्तर तुम्हाला त्याच्या बिलीफ सिस्टीममध्ये सापडेल. 

तर मित्रांनो,
यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या बाबतीतही ही बिलीफ सिस्टीम आपल्याला एकतर खुप मदत करते, किंवा आपल्या मार्गात आडवी येते,
ज्याचा बिलीफ खुप सशक्त आहे, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात चमत्कार घडवु शकते.
असे कित्येक अविश्वसनीय चमत्कार मी माझ्या आयुष्यात कित्येकदा अनुभवले आहेत,
आणि रोज कित्येक जणांसोबत ते घडतानाही पाहतो आहे,  

तुमची बिलीफ सिस्टीम कशी आहे? ती तुम्हाला साथ देते की नाही?

का तीच्या मागे तुम्ही फरफटत जात आहात?
लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्वलायजेशन, स्वसंमोहन, अफर्मेशन अशा अनेक पद्धती माणसाचा बिलीफ सिस्टीम बदलवण्यासाठी उपयुक्त आहेत. 
बिलीफ सिस्टीम ला मजबुत करण्यासाठी,आपल्या स्वप्नांच्या पंखांना अतुट विश्वासाचं बळ देण्यासाठी, उत्तम जाणकार व अभ्यासु समुपदेशक मोठी मदत करू शकतात. 

तुमची बिलीफ सिस्टीम उतुंग भरारी घेवो यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा !....

ज्याची बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग...
त्याला या जगात अशक्य असे कांहीच नाही....

- डॉ. शिरीष राजे  (मानसशास्रतज्ञ)

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================ 
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com
Comments

मार्केटिंग म्हणजे काय ?

8/22/2019

Comments

 
मित्रानो,युट्युब मध्ये गेले काही दिवस मी मार्केटिंगचे व्हिडीओ बनवत आहे. हे व्हिडीओ बनवत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि मार्केटिंगबद्दलची बेसिक माहिती जसे कि मार्केटिंगची व्याख्या काय? मार्केटिंग म्हणजे काय? हे सांगणारा व्हिडिओच आपण बनवला नाही आहे. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंग म्हणजे नक्की काय हे माहिती करून घेऊ.

मी माझ्या ट्रेनिंग मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांना जेव्हा विचारतो मार्केटिंग म्हणजे काय? तेव्हा मला वेगवेगळी उत्तरे ऐकायला मिळतात. कोणी म्हणतं मार्केटिंग  म्हणजे  advertising, कोणी म्हणतं मार्केटिंग म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचणे, टेलिकलिंग, बॅनर्स, जाहिराती, स्कीम्स, ऑफर्स अशी वेगवेगळी उत्तरे येतात. हि उत्तरे बरोबरही आहेत आणि चुकीचीही आहेत. चुकीची यासाठी आहेत कारण तेवढच मार्केटिंग नाहीय आणि बरोबर का तर ते मार्केटिंगचा एक भाग आहे. म्हणूनच काही सोप्या उदाहरणाच्या साहाय्याने मार्केटिंग म्हणजे नक्की काय हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
​हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================ 
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com
Comments

बिझी लोक आणि उद्योजकांसाठी वरदान आहे गुगलचे हे अ‍ॅप

8/20/2019

Comments

 
Picture
​मित्रांनो,गुगलतर्फे अनेक वेगवेगळे उपयोगी अ‍ॅप,टूल्स बनवले जात असतात. त्यापैकी काही आपण नेहमी वापरतो परंतु काही अजूनही बऱ्याच लोकांना माहितीच नसतात. हे टूल्स उपयोगी तर असतातच तसेच काही फ्री देखील असतात. पण असे काही उपयुक्त टूल्स केवळ त्यांच्याबद्दल माहिती नसल्याने त्याचे फायदे आपण घेऊ शकत नाही. 

आज आपण या व्हिडीओ मध्ये अशाच एका अ‍ॅपबदद्दल जाणून घेणार आहोत. हे एक इतके उपयुक्त आहे कि अनेक बिझी लोकं, उद्योजकांना,प्रोफेशनल्सना याचा फायदा होतो.

आपण आज गुगलच्या गुगल कीप(Google Keep)याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. हे एक Note taking अ‍ॅप आहे.यामध्ये आपण नोट्स लिहू शकतो,रिमाइंडर सेट करू शकतो,लिस्ट बनवू शकतो. याव्यतिरिक्त याचे अनेक उपयोग आहेत. सततच्या धावपळीच्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी हे एक अत्यंत उपयुक्त  अ‍ॅप आहे. याचे फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
​हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com
Comments

गरज, इच्छा आणि मागणी

8/20/2019

Comments

 
Picture
​मित्रांनो,मार्केटिंगचं काम हे बाजारामध्ये गरज निर्माण करणं,Need निर्माण करणं हे आहे असं म्हणतात परंतु तसं नाहीय. बाजारामध्ये 'Need' हि आधीपासूनच असतेच त्या 'Need'चं  'Want' मध्ये म्हणजेच 'इच्छेमध्ये' रूपांतर करणं हे मार्केटिंगचं काम असतं, त्याही पुढे जाऊन त्या इच्छेचं 'मागणीमध्ये' म्हणजेच 'Demand' मध्ये  रूपांतर करणं हे मार्केटिंगचं काम असतं.

Need, Want आणि Demand या तीन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आहेत ज्यांना आपण मार्केटिंगचा गाभा म्हणू शकतो.या व्हिडिओ मध्ये आपण या तीन संकल्पनांनाबद्दल तसेच उद्योजक म्हणून या तिन्ही गोष्टीचा आपल्या उद्योगामध्ये कसा वापर करायचा याबद्दल माहिती करून घेणार आहोत.
​हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com
Comments

अजुनही उशीर झाला नाही आहे!

8/20/2019

Comments

 
जॉन स्टीथ पेंबर्टनने जेव्हा कोका कोला चा शोध लावला तेव्हा ते  55 वर्षांचे होते. 
 
रे क्रोक यांनी पेंटर पासून ते ट्रॅव्हलिंग एजन्ट पर्यंत अनेक प्रकाच्या नोकऱ्या केल्या. त्यांनी जेव्हा मॅक्डोनल्ड बंधूंकडून फ्रेंचायजी घेतली आणि मॅक्डोनल्ड चा जगभरात कमालीचा विस्तार केला तेव्हा  ते ५९ वर्षांचे होते.

कॉलोनेल सँडर्स ने केएफसी ची फ्रेंचायजी त्यांच्या वयाच्या  62 व्या वर्षी घेतली.त्याआधी त्यांनी खूप निरनिराळे व्यवसाय केले.त्यांचे फ्राइड चिकनचे पहिले रेस्टॉरंट फारसे चालले नाही.तरीही ते वेगवेगळे प्रयोग करत राहिले.असे म्हटले जाते कि कॉलोनेल यांनी एक होकार ऐकण्याआधी शंभर नकार पचवले.नंतर त्यांनी केंटुकी फ्राइड चिकन ची फ्रेंचायजी dyayla suruvat keli आणि आज केएफसीचे १७००० पेक्षाही जास्त आउटलेट्स उभे आहेत.  

टिम आणि नीना झगॅट या दाम्पत्यानी ‘झगॅट गाईड’ नावाचं पुस्तक जे पुढे खुपच लोकप्रिय झालंतेव्हा ते  51 वर्षांचे  होते. 

चार्ल्स डार्विन ने वयाच्या ५० व्या वर्षी उत्क्रांतीचा सिंद्धांत जगासमोर मांडला .

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================


ज्युलिया चाइल्ड हिने ५० व्य  वर्षी तीच पाककृतीवरचं पाहिलं पुस्तक लिहिलं.टाइम्स मॅगझीनने तिला फ्रेंच पाककृतीमधला एक महत्तवाचा सांस्कृतिक घटक म्हणून गौरवलं.

ओद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या मॉडेल टी कार चा निर्माता हेन्री फोर्ड त्यावेळीस ४५ वर्षांचा होता.त्याला असेम्ब्ली लाइन निर्मिती पद्धतीचा जनक म्हणूनहि ओळखले जाते.फोर्डच्या असेम्ब्ली लाइन पद्धतीमुळे उत्पादन प्रक्रिया सोपी झाल्याने उत्पादनक्षमता वाढवण्यास मदत झाली.
  

मायक्रो फायनान्सचे pranete मोहम्मद युनूस यांनी ४३व्य वर्षी ग्रामीण बँकेची स्थापना केली.ग्रामीण बँक स्थापन करण्यामागे प्रामुख्याने गरिबांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे हा आहे.यासाठी त्यांना नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला.

सॅम्युएल जॅक्सनचा ‘जंगल फिवर’ चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला त्यावेळीस तो ४३ वयाचा होता.त्याआधी सॅम्युएल ने खूप स्ट्रगल केले तसेच अनेक नकारहि पचवले होते. 

यश हे वयावर कधीच अवलंबून नसतं. पण अपयश मात्र आपण किती लवकर माघार घेतो यावर नक्कीच अवलंबून असत . 
नवीन स्वप्न पाहण्यासाठी आणि ते सत्यात उतरवण्यासाठी वयाची बंधने कधीच 
आडवी येत नाहीत. अंतिम ध्येय साध्य करताना तुम्ही किती लहान अथवा मोठे आहेत याने काहीच फरक पडत नाही.  

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com
Comments

जास्त मौल्यवान काय? ज्ञान कि पदवी?

8/19/2019

Comments

 
Picture
एका नामांकित कंपनीने काही कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत नोकरी दिली. 23 वर्षीय अनुज याला ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले, तर 32 वर्षीय राम यांना सुपरवायजर म्हणून अनुजच्या तीन स्तर खाली नियुक्त केले गेले. अनुजने एका नावाजलेल्या महाविद्यालयातून नुकतीच पदवी पूर्ण केली होती.
 राम एक पदवीधर असुन त्याच उद्योगात 12 वर्षांपर्यंत काम करत होता, तो एक निष्ठावान कर्मचारी होता आणि त्याच्या नोकरीबद्दल तसेच अशा कंपन्यांच्या कामकाजाविषयी त्याला भरपूर ज्ञान होते.
 
एके दिवशी अनुजचा  रामसोबत वाद झाल्याने,कमी दर्जाचा,कमी शिक्षित कर्मचारी म्हणून त्याने रामचा अपमान केला.राम हसला आणि निघून गेला.वर्षभरानंतर एके दिवशी कंपनीमध्ये अचानक एक समस्या निर्माण झाली.
 ही समस्या इतकी मोठी होती की संचालक, सीईओ आणि अध्यक्षांना त्वरित बैठक आयोजित करावी लागली.

 निर्यात होणाऱ्या संपूर्ण मालामध्ये एक दोषआढळला होता आणि दोष इतका मोठा होता की निर्यातीनंतर त्यांच्या सर्वात मोठ्या ग्राहक कंपनीने त्यांना सोडले असते आणि कंपनीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. संचालक,अनुजसह इतर अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पुढे काय करायचे ते कळत नव्हते. 
संध्याकाळ झाली होती, बहुतेक कामगार निघून गेले होते.
 रामने पूर्वपरवानगीशिवाय सीईओच्या केबिनचे दार ठोठावले.सीईओनी रागाने आणि काहीश्या निराशेने रामला विचारले की तो अजून येथे काय करीत आहे.

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
 SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============

रामने ही चूक सुधारवण्यासाठी एक सोपी युक्ती सांगितली , त्यासाठी साधारण एक महिना लागला असता आणि काही जास्तीचा खर्च देखील करावा लागला असता. त्याने सांगितले की त्याच्या आधीच्या कंपनीत असाच प्रोब्लेम सोडवण्यात त्यांना यश आलं होतं.

मुख्य कार्यकारी अधिकारी शांत झाले आणि त्यांनी उत्तर दिले की  ग्राहक हे मान्य करणार नाही.रामने किमान एकदा प्रयत्न करण्याचा आग्रह केला.सीईओने ताबडतोब आपल्या सेक्रेटरीला बोलावून, उत्पादनातील काही भाग बदलण्यासाठी पाठविला आणि रामला बसण्यास सांगितले.एका तासात आवश्यक ते बदल करून आणल्यानंतर त्यांनी फोटोज क्लिक केले आणि ग्राहक कंपनीच्या गुणवत्ता विभागासोबत व्हिडिओ कॉलची व्यवस्था केली. ग्राहककंपनीने थोड्या विवादानंतर, खात्री करून घेतल्यावर  त्यांची ऑफर स्वीकारली. सीईओच्या चेहऱ्यावरचा घाम क्षणात सुकून गेला.

एका वर्षात रामला अनुजच्या तीन स्तर वर पदोन्नती देण्यात आली आणि ऑपरेशन संचालक म्हणून नियुक्त केले गेले.राम यांच्याशी केलेल्या वादामुळे कामावर परिणाम होईल अशी भीती अनुजला वाटत होतीे,परंतु एके दिवशी रामने त्याला केबिनमध्ये बोलावून सांगितले की जे काही घडले होते त्याबद्दल आणि अनुजबद्दल त्याच्या मनात अजिबात राग नाही.


 एक पद आपल्याला चांगली सुरुवात करून देते परंतु ज्ञान आणि अनुभव हेच सर्वात मौल्यवान असतात.
जर तुमच्याकडे चांगली पदवी असेल तर चांगलंच आहे पण त्यातच समाधानी राहू नका,अजुन शिकत रहा आणि नवनवीन अनुभवासह समृद्ध व्हा आणि जर तुमच्याकडे चांगली पदवी नसेल तर काळजी करू नका, काम करत रहा, शिकत रहा,आपलं मन मोठं असेल आणि स्वत:वर विश्वास असला की कोणीही तुम्हाला गर्दीतुन पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही.

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
 SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============

धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments

डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी

8/17/2019

Comments

 
सध्याच्या युगामध्ये कोणत्याही बिझनेसला डिजीटल मार्केटिंगशिवाय पर्याय नाही.जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल,कमी खर्चामध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल,उत्कृष्ट मार्केटिंग करायची असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग करत असताना त्याचं प्लॅनिंग करणं आणि त्याची योग्य स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे.तुम्ही मार्केटिंग कशासाठी,कुठे,कधी आणि कशी करणार याचा पूर्ण अभ्यास करून ठरवावं लागेल.

या व्हिडिओ मध्ये आपण 4 स्टेप्स बघणार आहोत ज्या वापरून तुम्ही तुमच्या बिझनेस ची डिजिटल मार्केटिंगची प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी ठरवू शकता.
​हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com
Comments

रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणायचेयत?तर हा व्हिडीओ जरूर पहा!

8/12/2019

Comments

 
​मित्रांनो, नवीन सुरू झालेले साधारण ६०% बिजनेस हे पहिल्या वर्षातच बंद होतात.तिसऱ्या वर्षापर्यंत हा आकडा ८५% पर्यंत गेलेला असतो.रेस्टॉरंट बिझनेसमध्ये अपयशी होण्याचा दर तुलनेने जास्त आहे.पण तो का आहे हे तुम्हाला माहिती आहे का? 

तुमच्याकडील अन्नाची गुणवत्ता चांगली असेल,चव चांगली असेल,रेस्टॉरंट चांगलं आहे,जागा मोक्याची,प्रशस्त आणि चांगली असेल.या सगळ्या अंतर्गत बाबी झाल्या.पण मुख्य गोष्ट असते ती म्हणजे ग्राहक.ग्राहकांना तुमच्यापर्यंत घेऊन येणं ही महत्त्वाची गोष्ट असते. हेच बऱ्याच रेस्टॉरंटसना योग्य रीतीने जमत नाही आणि मग रेस्टॉरंटस बंद होण्याच्या मार्गावर वाटचाल करतात.

यावर उपाय म्हणजे योग्य मार्केटिंग करणे. मग नक्की कश्या प्रकारचे मार्केटिंग केल्याने तुमच्या रेस्टॉरंटचे ग्राहक वाढवतील हे आपण या व्हिडीओद्वारे जाणून घेऊ.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com
Comments

बिझनेस वाढवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत

8/10/2019

Comments

 
प्रत्येक उद्योजकाला स्वतःच्या बिझनेस मध्ये नेहमीच ग्रोथ करायची असते आणि त्यासाठी त्याचे नेहमीच प्रयत्न चालू असतात. 

आज आपण या व्हिडिओ मध्ये असे एक स्ट्रॅटेजी टूल पाहणार आहोत जे वापरून तुम्ही तुमच्या बिझनेस ची स्ट्रॅटेजी स्वतःच ठरवू शकता. बिझनेस वाढवण्यासाठी बऱ्याचदा अनेक पावलं उचलली जातात.काही काळानंतर लक्षात येत की ती आपली मोठी चूक होती आणि ज्यामुळे जास्तच नुकसान झालं.असे नुकसान होऊ नये म्हणून हे टूल फार उपयोगी ठरू शकतं.

मित्रांनो, जर तुम्हाला तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवायची असेल किंवा जर तुम्ही ती आधीच ठरवली असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात की नाही हे पाहणे देखील या टूल मार्फत पाहणे सोपे होईल.त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com
Comments

4 Steps Of Digital Marketing Strategy

8/10/2019

Comments

 
Comments
<<Previous
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet