नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बिझनेस कॅटेगरी काय आहेत हे पाहिलं. तर आता या बिझनेसमध्ये आपण बिझनेस मॉडेल्स बद्दल शिकणार आहोत.
बिझनेस मॉडेल्स म्हणजे काय? बिझनेस मॉडेल्स म्हणजे बिझनेसस स्वतःसाठी व्हॅल्यू कशी तयार करतात त्याला बिझनेस मॉडेल्स म्हणतात. आता तुम्हाला यामध्ये व्हॅल्यू क्रीएशन हा शब्द जरा अवघड वाटेल, परंतु या व्हिडिओसाठी आपण त्याला सोपं करूयात. या व्हिडिओसाठी आपण व्हॅल्यू क्रिएशन म्हणजेच बिझनेस पैसे कसे कमवतो त्याला म्हणतात बिझनेस मॉडेल. कोणत्याही बिझनेसची एक विशिष्ट पद्धत असते. ज्याच्यामधून तो बिझनेस पैसे कमवत असतो. तुम्हाला आता असे वाटेल की हे तर साहजिक आहे की माझं प्रॉडक्ट विकलं की मी पैसे कमवणार. कोणत्याही बिझनेसच तसंच असतं. परंतु मित्रांनो तसं नाहीये, बिझनेस मॉडेल्स कसे फसवे असतात, याच एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या आवडत उदाहरण म्हणजे गूगल किंवा फेसबुक. गूगल आणि फेसबुक या कंपन्या आपलं प्रॉडक्ट वापरण्यासाठी ग्राहकांकडून काहीच पैसे घेत नाही. परंतु त्या बदल्यात ते आपल्याला जाहिराती दाखवतात. त्यामुळे त्यांचं जे बिझनेस मॉडेल आहे ते ऍडव्हर्टाईजींग बिझनेस मॉडेल. ते पैसे जाहिरातींमधून कमवतात. ते आपल्याकडून म्हणजेच युझर्स कडून पैसे कमवत नाहीत. तर युझर्सना च जाहिराती दाखवण्याचे पैसे घेतात. हे एक वेगळं बिझनेस मॉडेल आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की, बिझनेस मॉडेल म्हणजे फक्त आपलं प्रॉडक्ट विकणं एवढंच नाही. वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस मॉडेल्स आहेत. हल्ली टेकनॉलॉजि मुळे आणखी नवीन बिझनेस मॉडेल्स आले आहेत. उदाहरणार्थ, पूर्वी तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉल मध्ये आपले प्रॉडक्ट्स विकत आहात तर ते एक रिटेलच उदाहरण झालं. परंतु, तुम्ही तेच जेव्हा ऑनलाईन विकता तेव्हा ते इ- कॉमर्स बिझनेस मॉडेल झालं. त्याचप्रकारे न्यूजपेपर प्रत्येकजण दररोज जाऊन पैसे देऊन विकत घ्यायचो. त्यानंतर न्यूजपेपरचे सब्स्क्रिप्शन स्कीम्स यायला लागल्या. किंवा आपण मॅगझिन्स घेतो. त्याची वार्षिक वर्गणी घेतो. हे झालं सब्स्क्रिप्शन बिझनेस मॉडेल. म्हणजे आपल्याला दर युनिट चे पैसे आकारले जात नाही तर पूर्ण महिना किंवा पूर्ण वर्षभराचे पैसे आकारले जातात. जर नेटभेट इ-लर्निंग सोल्युशन जर बघितलं तर हे एक सब्स्क्रिप्शन बिझनेस मॉडेल आहे. नेटभेट मध्ये आम्ही जे कोर्सेस विकतो ते कोर्सेस तुम्ही दर महिन्याला विकत घेऊ शकता किंवा वर्षभरासाठी किंवा मग लाईफ टाइमसाठी विकत घेऊ शकता. अशी खूप सारे बिझनेस मॉडेल्स आहेत. तर पुढील भगतमध्ये आपल्याला ट्रॅडिशनल बिझनेस मॉडेल म्हणजे पारंपरिक बिझनेस मॉडेल सांगणार आहे आणि त्याच्या पुढच्या भागात नवीन बिझनेस मॉडेल कशाप्रकारचे आहेत आणि उद्योजक त्याचा वापर किंवा फायदा कश्याप्रकारे करतात हे सांगणार आहे. तूर्तास फक्त बिझनेस मॉडेल म्हणजे काय हे लक्षात घेउयात. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट जी आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे बिझनेस मॉडेल हे काही फिक्स नसतं. एक उद्योजक जेव्हा नवीन उद्योक सुरु करतो त्यावेळी ते एक बिझनेस मॉडेल ठरवतात परंतु त्याच्या पुढे कदाचित ग्राहकांच्या अनुभवावरून किंवा मार्केट मधील रिस्पॉन्स वरून आपलं बिझनेस मॉडेल आपल्याला बदलता येऊ शकत. त्यामुळे कधीही बिझनेस मॉडेल जरी फिक्स केलं तरी सुद्धा इतर बिझनेस मॉडेल्सवर आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि आणखी कोणत्या मार्गाने आपल्या बिझनेस मधून पैसे कमावता येतील ते आपण पाहिलं पाहिजे. तर मित्रांनो मला खात्री आहे की बिझनेस मॉडेल म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल. ऑल द बेस्ट ! धन्यवाद !! नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कि, उद्योजक संधी कशी शोधतात आणि त्यानंतर त्या संधीवर काम कसे करतात. खरंतर एखादा बिझनेस लाँच करण्याची एक प्रोसेस असते. आणि त्या काय स्टेप्स किंवा कोणती प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जास्त सविस्तर शिकणार नाही. पुढील व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. आज आपण फक्त बिझनेस लाँच करण्यासाठी काय स्टेप्स असतात ते पाहणार आहोत. प्रॉडक्टची आयडिया आल्यापासून ते लाँच होईपर्यंत उद्योजकांनी कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत हे शिकणार आहोत.
१. संधी शोधा. (Identifying the Oppotunity ) संधी नक्की कुठे दडलेली आहे. हे जेव्हा एखाद्या उद्योजकाला कळतं की, या गोष्टींमध्ये मी व्यवसाय करू शकतो. इथे व्हॅल्यू एडिशन आहे किंवा मार्केटमध्ये गॅप आहे जी कोणतीही कंपनी देत नाही. तेव्हा असं उत्पादन करून मी एक गरज भागवू शकतो किंवा ती सर्विस आपण देऊ शकतो किंवा लोकांची गरज भागवू शकतो आणि आपला बिझनेस सुरु शकतो. अशाप्रकारची संधी जेव्हा उद्योजकाला समजते तेव्हा तो त्या संधीवर काम करायला सुरु करतो. तर सगळ्यात पहिली म्हणजे संधी शोधणे. एखादी संधी शोधल्यानंतर आपण लगेच ते प्रॉडक्ट किंवा आयडिया लाँच करत नाही. बरेच उद्योजक हि चूक करतात. परंतु ती चूक अक्षम्य आहे. ती चूक पुन्हा सुधारता येत नाही. त्यामुळे कधीही एखादी संधी मिळाल्यानंतर पुढची स्टेप जी आपल्याला करायची असते ती म्हणजे मार्केट रिसर्च. मार्केट रिसर्च : मार्केट रिसर्च हि एक मेंटल ऍक्टिव्हिटी आहे. आणि त्यासाठी आपल्याला रिसर्च करायचं असतं. गूगल, इंटरनेट किंवा प्रत्यक्ष मार्केटमध्ये रिसर्च करा. ग्राहकांना जाऊन भेटा. तुमच्या प्रतिस्पर्धीना जाऊन भेटा. त्या संधी बद्दल जेवढी माहिती गोळा करता येईल तेवढी करा. त्या माहितीमध्ये आपण जी संधी शोधली आहे ती खरी आहे का ? की फक्त आपल्यालाच असं वाटतंय की हा प्रॉब्लेम खरा आहे. आणि त्याच निरसन करून आपण पैसे कमवू शकतॊ किंवा आपला बिझनेस करू शकतो. तो खरंच एक प्रॉब्लेम आहे का ? तो प्रॉब्लेम कोणी सोडवला आहे का ? त्याचा कोणाला फायदा होणार आहे का ? इतरांना देखील त्याची गरज वाटते का? किंवा त्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध आहे का ? अशाप्रकारची रिसर्च आपण केली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे या संधीला भविष्यात काही पोटेन्शिअल आहे का? किंवा कदाचित तुम्ही निवडलेली संधी हि तात्पुरती असेल आणि त्या नंतर भविष्यात त्यासाठी नवीन काहीतरी पर्याय येईल किंवा लोकांच्या गरजा बदलतील. म्हणून हे असं होऊ नये म्हणून मार्केटच भविष्यातील पोटेन्शिअल किती आहे या सगळ्या गोष्टींचं नीट रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्रायमरी आणि सेकंडरी रिसर्च करणं गरजेचं आहे. प्रायमरी रिसर्च म्हणजे इंटरनेट किंवा गूगल किंवा इतर साईट्स वर जे रिसर्च करणार आहात किंवा रिपोर्ट्स वाचून जो करणार आहात तो. आणि प्रत्यक्ष मार्केट मध्ये जाऊन किंवा ग्राहकांशी संपर्क साधून जो रिसर्च करणार आहात तो सेकंडरी रिसर्च. अन अतिशय महत्वाची स्टेप आहे जी करणं गरजेचं आहे. एकदा तुमचं मार्केट रिसर्च झालं आणि त्यानंतर तुम्हाला समजलं की, हा प्रॉडक्ट, बिझनेस किंवा सर्विस आपण मार्केटमध्ये आणू शकतो. यात आपण बिझनेस करू शकतो. तर त्यानंतर जी स्टेप असते ती कन्सेप्ट टेस्टिंग. कन्सेप्ट टेस्टिंग : आतापर्यंत आपण मार्केट रिसर्चमध्ये मिळालेली माहिती आणि आपल्या मनात असलेलं उत्पादन यांचं मेळ घालून एक प्रोटोटाईप उत्पादन किंवा बेसिक सर्विस बनवतो. अगदी तुमची सर्व्हिस खरी नसली ती सध्या कागदावर बनवलेली असली तरी चालेल. याला म्हणतात कन्सेप्ट टेस्टिंग. प्रॉडक्ट लोकांना वापरायला द्या. लोकांशी संपर्क साधा. एक युझर म्हणून तुम्हाला आता ग्राहक शोधायचे आहेत. ते तुम्हाला पैसे देणार नाहीत परंतु तुमचा माल, उत्पादन किंवा तुमची सर्विस वापरून बघतील. जेव्हा ते प्रॉडक्ट किंवा सर्विस वापरली जाते किंवा टेस्ट केली जाते तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट बद्दल बरीचशी माहिती मिळते. त्यामध्ये काय चुकतंय ते कळतं. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या फायनल प्रॉडक्ट कडे जाऊ शकता. तर कन्सेप्ट टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते प्लॅनिंग. प्लॅनिंग : प्लॅनिंग मध्ये महत्वाचं असतं की आपण यातून पैसे कसे कमवायचे. आपलं बिझनेस मॉडेल काय असणार आहे. आपण कशाप्रकारे ग्राहकांना चार्जे करणार आहोत. आपण ही सर्विस किंवा प्रॉडक्ट कशाप्रकारे डिलिव्हरी करणार आहोत. तुम्ही रिटेल शॉप चालू करणार आहात की एखाद्या मॉलमध्ये तुमचं दुकान सुरु करणार आहात. तुम्ही ऑनलाईन इ- कॉमर्स मध्ये जाणार आहात, किंवा तुम्ही सब्स्क्रिप्शनवर प्रॉडक्ट देणार आहात. किंवा जाहिरातींमधून पैसे कमावणार आहात. कशाप्रकारे तुम्ही पैसे कमवणार आहात. कोणते ग्राहक तुम्हाला पैसे देतील, किती पैसे देतील, तुमची ऑर्डर साईझ किती असणार आहे. या प्रकारचा जो अभ्यास असतो तो प्लॅनिंग मध्ये येतो. पुढील काही व्हिडीओमध्ये आपण बिझनेस मॉडेल बद्दल बोलणार आहोत. मी इथे सविस्तरमध्ये सांगत नाही. प्लॅनिंग मध्ये आणखी एक गोष्ट येते आणि ती म्हणजे रिसोर्सेस. आपल्या बिझनेससाठी लागणारा जो काही पैसा आहे तो तुम्ही कुठून मिळवणार आहात. जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही कुठून मिळणार आहात हे देखील आपल्याला या प्लॅनिंग मध्ये ठरवायचं आहे. आपण स्वतः पैसे टाकणार आहोत की पार्टनर आणणार आहोत की इन्व्हेस्टर शोधणार आहोत, या सगळ्या गोष्टी आपल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असल्या पाहिजेत. आणखी दोन महत्वाचे रिसोर्सेस आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि पाहिलं म्हणजे तुमची स्किल इन्व्हेंटरी. तुमचा बिझनेस बनवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी तुम्हाला काय स्किल्स असल्या पाहिजेत किंवा तुमच्याकडे आहेत का? जर ते स्किल तुमच्याकडे नसेल तर त्यासाठी तुम्हाला काही माणसं कमला ठेवावी लागतील. कदाचित तुम्हाला त्यांना को-फाऊंडर म्हणून घ्यावं लागेल. किंवा त्यांना कर्मचारी म्हणून घ्यावं लागेल. आणखी एक रिसोर्स आपण बघितला पाहिजे आणि तो म्हणजे सोशल कॅपिटल. सोशल कॅपिटल म्हणजे या बिझनेसशी निगडित आपले कोणते कोणते कॉन्टॅक्टस आहेत. बिझनेस सर्कल मधील कोणत्या कोणत्या मोठ्या लोकांना आपण ओळखतो. आणि ते आपल्याला कोणत्या प्रकारे मदत करू शकतील. ते आपल्याला योग्य लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतात का? या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. तर मित्रांनो पहिल्या फेज मध्ये संधी शोधली गेली आहे, दुसऱ्या फेजमध्ये आपण मार्केट रिसर्च केलं, तिसऱ्या फेजमध्ये कन्सेप्ट टेस्ट केलं, आणि चौथ्या फेजमध्ये प्लॅनिंग केली. आणि आता पाचव्या फेज मध्ये तुम्ही प्रॉडक्ट लाँच करण्यासाठी तयार आहात. लाँच : तर आता लाँच कसं आणि कधी करायचं आणि तसेच बिझनेस मॉडेल कसे ओळखायचे ये देखील आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत ऑल द बेस्ट ! धन्यवाद !! नमस्कार मित्रांनो, उद्योजकांबद्दल किंवा Entrepreneurship बद्दल माहिती घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे उद्योजक पैसे कमावण्याकडे कसे बघतात. सर्वप्रथम आपण इन्कमचे दोन ढोबळ प्रकार करूया, ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. आता हा नक्की काय कन्सेप्ट आहे ते समजून घेऊया.
बहुतेक लोकांना ऍक्टिव्ह इन्कम हि फक्त एकंच इन्कम पद्धत माहित असते. म्हणजे कोणी आपल्याला काम करायला सांगितलं आणि आपण ते केलं आणि त्याबदल्यात पैसे घेतले. तुम्ही नोकरी करत असाल, फ्रीलान्सर असाल, शिक्षक असाल किंवा कोणत्याही प्रोफेशनमध्ये असाल तेव्हा ऍक्टिव्ह इन्कम मिळवण्याची पद्धत असते. उद्योजक मात्र असं करत नाही. उद्योजक हे पॅसिव्ह इन्कम मिळविण्यात भर देतात. पॅसिव्ह इन्कम म्हणजे ऍडिशनल काम करण्याची गरज न भासता जे इन्कम मिळवलं जातं ते पॅसिव्ह इन्कम असत. म्हणजे जसं ऍक्टिव्ह इन्कममध्ये आपण आठ तास काम करून त्याचे पैसे घेतो. तर पॅसिव्ह इन्कम मध्ये तसं नसतं. उदारणार्थ, इन्व्हेस्टमेंट हे एक पॅसिव्ह इन्कमच उदाहरण आहे. जेव्हा एखादा इन्व्हेस्टर शेअर्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्या शेअरची किंमत वाढण्यासाठी तो काही करत नाही. किंवा तो काही काम करत नाही. फक्त तो शेअर निवडताना मात्र काम करतो. आणि त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर जेव्हा त्याची किंमत वाढत जाते त्यावेळेला ते पॅसिव्ह इन्कम असतं.त्यामध्ये इन्व्हेस्टरचा डायरेक्ट रोल नसतो. उद्योजक जे असता ते अशाप्रकारे पॅसिव्ह इन्कम जनरेट करणाऱ्या कंपन्या बनवण्यात भर देतात. त्याला म्हणतात व्हॅलू क्रिएटिंग वेहिकल्स (Value Creating Vehicles ) म्हणजे एक अशी कंपनी जी बनवण्यामध्ये त्यांना सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करावी लागते, काम करावं लागतं परंतु, ती कंपनी बनल्यानंतर आपोआप रेव्हेन्यू जनरेट करायला लागते. उदाहरणार्थ, ओला किंवा उबर यांच्यामध्ये ते अँप बनवणं , नवीन गाड्या किंवा ड्राइव्हर्स, इ. ओलमध्ये सामावून घेणं हे ओलाच्या संचालकांनी केलं आणि त्याच्यानंतर तो मात्र सेल्फ रनिंग झाला. याचा अर्थ त्यांना ओला अँप परत परत बनवावा लागतं नाही त्यामुळे त्यांना ऍक्टिव्ह काम करावं लागत नाही. ते चालू ठेवण्यासाठी जे काही काम करावं लागत तेवढंच. परंतु तो बिझनेस आता वाढत चालला आहे, मोठा होत चालला आहे. जो काही प्लॅटफॉर्म तयार झाला आहे त्याच्यावर आता ते काम करतात. दुसरं उदाहरण आता मी माझंच देतो, नेटभेट इ- लर्निंग सोलुशनच. मी यामध्ये फक्त एकदाच कोर्स बनवतो.आणि तो मी कितीही वेळा विकू शकतो. कारण तो डिजिटल कोर्स आहे. तो फक्त एकदाच बनवून अपलोड करायचा आहे. त्यामुळे हे एक व्हॅलू क्रिएटिंग वेहिकल आहे.जेव्हा मी कोर्स बनवला तेव्हा मी एक व्हॅल्यू तयार केली. आणि आता ती व्हॅल्यू मला पुढचे कित्येक वर्ष त्यामधून इन्कम मिळवून देईल. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. मला तो पुन्हा कोर्स बनवायची गरज नाही. तो मी एकदाच रेकॉर्ड करून ऑनलाईन उपलब्ध करून दिला. आता आपण बघितलं की उद्योजक पॅसिव्ह इन्कम बनवण्यात भर देतात. पॅसिव्ह इन्कम मध्ये दोन चांगल्या रेवेन्यु जनरेट करणाऱ्या सिस्टम्स आहेत. सगळ्यात पहिली प्रसिद्ध जी आहे लेझर आणि ब्लेड या नावाने. तुम्ही कदाचित याबद्दल ऐकलं असेल. दाढी करण्यासाठी जो लेझर वापरला जातो तो त्या कंपन्या स्वस्तात विकतात.आणि नंतर त्यासाठी त्यांना ब्लेड्स विकता येतात. या बिझनेस मॉडेलला लेझर अँड ब्लेड बिझनेस मॉडेल असं म्हणतात. झेरॉक्स मशीन च्या ज्या कंपन्या असतात त्या सुद्धा मशीन थोडं स्वस्तात विकतात आणि नंतर त्या प्रिंटरची शाई म्हणजेच कारट्रिज ते जास्त विकून पैसे कमावतात. खूप साऱ्या कंपन्या किंवा बिझनेस मॉडेल्स हे या मॉडेलवर काम करतात. आणखी उदाहरण द्यायचं झालं तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे एकदा घेतल्यानंतर सारखं त्याला अपग्रेड करावं लागतं. अशाप्रकारे तुम्ही रिकरिंग रेव्हेन्यू साठी रेझर अँड ब्लेड मॉडेल तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये वापरू शकता. आणखी एक दुसरी गोष्टी जी उद्योजक खूप हुशारीने करतात ती म्हणजे, प्लॅन ऑबसेलेन्स (Plan Obselence ). प्लॅन ऑबसेलेन्स म्हणजे तुम्ही बनवलेल्या प्रॉडक्टच आयुष्य हे आपोआप संपतं. तुम्ही लक्षात घेतलं असेल की, आपण जे मोबाईल फोन्स, टॅबलेट इ. वापरतो काही वर्षानंतर ते जरी दिसायला चांगले असले तरी तो डिवाइस खूप स्लो होतो. किंवा त्यामध्ये मेमरी चे प्रॉब्लेम्स येतात. तर हा एक प्लॅन ऑबसेलेन्स चा एक भाग आहे. कारण कंपन्यांना नवीन प्रॉडक्ट्स विकायचे असतात. जर तुम्हाला घड्याळ बनवणारी एच एम टी (HMT ) कंपनी माहित असेल तर त्यांचे घड्याळ इतके चांगले होते की, ते कधी खराब च होत नव्हते. आणि त्यामुळे त्या कंपनीला नवीन सेल्स मिळायचा नाही. त्यांचा बिझनेसच व्हायचा नाही. आणि परिणामी ती कंपनीचं लयाला गेली. म्हणून प्लॅन ऑबसेलेन्स हा सध्याचा नवीन फंडा आहे. आजकाल सर्वच कंपन्या वापरतात. आणि ते एखादं प्रॉडक्ट लाँच करण्याआधीच ठरवतात की हे किती वर्ष प्रॉडक्ट मार्केटमध्ये असलं पाहिजे. आणि त्याला अपग्रेड करण्यासाठी नवीन प्रॉडक्ट लाँच करतात. उदाहरणार्थ अँपल आय फोन. आय फोन ५, ६ आणि आता आय फोन १० सुद्धा लाँच झाला. हे असं दर एक किंवा दोन वर्षानंतर नवनवीन प्रॉडक्ट अपग्रेड करून लाँच करत असतात. कारण त्यांना मागचं प्रॉडक्ट ओबसोल्यूट करायचं असतं. म्हणून ते प्लॅन ऑबसेलेन्स करतात. मित्रांनो तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये यापैकी नक्की काही करत आहात का? तुम्ही नक्की ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह इन्कम वर भर देताय का? जर तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम वर भर देत आहात तर तुम्ही तुमच्याच बिझनेसमध्ये नोकरी करत आहात. आणि जर तुम्हाला खरंच तुमचा बिझनेस मोठा करायचा असेल तर पॅसिव्ह इन्कम वर भर देणं गरजेचं आहे. तुमच्याकडे रिकरिंग रेव्हेन्यू स्ट्रीम असेल तर अगदी चांगलं. रेझर अँड ब्लेड बिझनेस मॉडेल असेल तरीही चांगलं. आणि जर तुमच्या बिझनेसच प्लॅन ऑबसेलेन्स असेल तर ते नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा सेल मिळेल. एकदाच बनवून एकदाच विकून तुम्हाला तुमची कंपनी भविष्यामध्ये मोठी करता येणार नाही. तर मित्रांनो या काही छोट्या टिप्स उद्योजकांसाठी उपयोगी ठरतील आणि त्या तुम्हाला आवडतील याची खात्री आहे. ऑल द बेस्ट ! धन्यवाद ! Enterpreneur म्हणजे नक्की काय?Enterpreneur,Bussinessmanआणि Freelancer यामधील फरक.. खरं तर Enterpreneur हा शब्द बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वापरला जातो. काही लोकांच्या मते जो बिझनेसमॅन/Bussinessman आहे, ज्यांनी बिझनेस सुरु केला आहे किंवा काही लोकांच्या मते कोणी नवीन सुरु केला आहे किंवा नवीन इनोव्हेशन म्हणजे शोध केलेले आहे मग त्याच रूपांतर बिझनेसमध्ये केलं आहे, तो Enterpreneur आहे. परंतु Enterpreneur ची कोणती व्याख्या म्हणजे डेफिनेशन असावी यावर मोठे वादविवाद आहेत. त्यामुळे अजूनही सर्वमान्य अशी वाख्या अजून बनली नाही. परंतु मला पटलेली एक व्याख्या आहे आणि ती म्हणजे "हार्वर्ड बिझनेस स्कूल" ची Entrepreneurship is the persuit of opportunity without regard to रिसोर्सेस. यातले दोन शब्द महत्वाचे आहेत, persuit of opportunity आणि without regard to resources. Enterpreneur म्हणजे अशी व्यक्ती जी कुठल्याही अपॉर्च्युनिटी / opportunity म्हणजेच संधीच्या शोधात असते, त्याचा सतत पाठपुरावा करते. नेहमी संधी शोधून काढते आणि ती पूर्ण करते without regard to resources म्हणजे त्याच्याकडे मॅनपॉवर, संपत्ती, इन्व्हेस्टमेंट किंवा अनुभव नसेल तरीही परंतु एखादी कल्पना , संधी शोधल्यानंतर त्याच्यावर ते तोपर्यंत काम करतात जोपर्यंत ते यशस्वी होत नाही. आणि त्या संधीला वास्तवात उतरवत नाही तोपर्यंत जे काम करता आणि काही रिसोर्सेस म्हणजे साधनं नसतानाही तरीही ते काम करून आपलं ध्येय प्राप्त करतात त्यांना Enterpreneur म्हणतात. उदाहरणार्थ, कामथ ग्रुप ऑफ हॉटेल चे विठ्ठल कामत. विठ्ठल कामत यांच्या वडिलांचे मुंबईमध्ये एक हॉटेल होते. तर विठ्ठल कामत यांनी जर तेच हॉटेल पुढे चळवळ असत तर ते Enterpreneur नसते तर ते एक बिझनेसमॅन असते. कारण त्यांनी चालू असलेला बिझनेस नवीन सुरु केला., त्यांनी कोणतीही नवीन संधी पहिली नाही, रिसोर्सेस आधीच त्यांच्याकडे होते. परंतु विठ्ठल कामत यांनी तसं न करता स्वतः च छोटंसं हॉटेल असून सुद्धा फाईव्ह स्टार इकोफ्रेंडली हॉटेल बनवायचं स्वप्न पाहिलं आणि कुठल्याही प्रकारचे रिसोर्सस नसताना त्याकाळी स्वतःकडे इतकी इनव्हेसमेंट म्हणजे गुंवणूक नसताना देखील त्यांनी ते स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाचा पाठलाग केला आणि ते शेवटी पूर्ण केलं, म्हणून विठ्ठल कामत ते Enterpreneur आहेत. अशाप्रकारे आपण बिझनेसमॅन आणि Enterpreneur यांच्यातील फरक बघितला. सर्व बिझनेसमॅन हे Enterpreneur असतीलच असे नाही, परंतु सर्व Enterpreneur हे बिझनेसमॅन असतात. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे फ्रीलान्सर जे सर्विस देतात ते Enterpreneur नसतात. फ्रीलान्सर/Freelancer म्हणजे कंसल्टंटकिंवा ट्रेनर असतात ते Enterpreneur नसतात कारण ते त्यांचा वेळ देऊन त्याचे पैसे घेतात. कंसल्टंट, ट्रेनर किंवा वेब डिझाइनर यांचा वेळ ते वेगवेगळ्या कंपनीशी करार करून त्यांना काम देतात, परंतु एकच सर्विस ते परत परत विकत असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचं ऍक्टिव्ह इनकम असते म्हणजे ते स्वतः त्यात काम करत नाही तोपर्यंत त्यांना पैसे मिळत नाही. त्यामुळे फ्रीलान्सर/ Freelancer हा एक नोकरीचाच एक प्रकार आहे फक्त त्यांच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे. नोकरीमध्ये आपण इतरांना सर्विसेस विकतात. Freelancer मध्ये त्याला जेव्हावाटते तेव्हा तो इतरांना सर्विस देतो. अशाप्रकारे नोकरी आणि फ्रीलान्सर/Freelancer मधला हा फरक आहे. त्यामुळे हा Enterpreneur आणि फ्रीलान्सर/Freelancer या दोनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मला खात्री आहे की, Enterpreneur म्हणजे नक्की काय हे तुम्हाला कळले असेल. ऑल द बेस्ट. धन्यवाद ! उद्योजक म्हणजे Enterpernuer कसा विचार करतात आणि NonEnterpernuer म्हणजे उद्योग न करणारे कसा विचार करतात या दोघांमधे मुलभूत फरक आहे.मग यशस्वी उद्योजक Enterpernuer होण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहीजे ते आपण पाहू.
*गोष्टी करून शिका:* साधारणतः आपल्याला जेव्हा एखादं काम करायचं असतं तेव्हा आपण त्याबद्दल माहिती गोळा करतो किंवा त्याबद्दल ज्ञान मिळवतो. पण उद्योजक मात्र तसं करत नाही ते एखादी गोष्ट आधी करून बघतात, त्यातून शिकतात आणि मग पुढे जातात. *परिणामांवर लक्ष केंद्रित करणे :* आणखी एक महत्वाचा फरक म्हणजे उद्योजक एखाद्या गोष्टीवर फोकस करतात आणि तिथपर्यंत फोकस करतात जिथपर्यंत त्यातून काही रिजल्ट मिळत नाही. उद्योजकांना पगार मिळत नसतो. पगार म्हणजे आपण जे काही महिनाभर काम करतो त्याचा आपल्याला मोबदला किंवा पगार मिळत असतो. आपल्या जे काही प्रयत्न करतो त्यावर पगार मिळतो, अंतिम रिजल्टवर पगार मिळत नाही. उद्योजकांचा मात्र तसं नसत. जोपर्यंत अंतिम रिजल्ट मिळवत नाही, साध्य करत नाही तो पर्यंत त्यांचा पगार मिळत नसतो. हा एक मुख्य फरक आहे. आणि हा एक रिव्हर्स माईंडसेट आहे. *गोष्टी पूर्ण करा:* उद्योजक इतरांकडून काम करून घेतात. तुम्हाला लक्षात असेल की शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना, आपल्याला सर्व काम स्वता:हून कसं करायचं किंवा स्वतःहून काम केलेलं किती चांगलं असतं यावर भर दिला जायचा, परंतु हे मूळतः खूप विरुद्ध आहे. उद्योजकाला स्वतःहून काम न करता इतरांकडून करून चांगल्या पद्धतीने करून घेता आले पाहिजे. त्यासाठी त्यांना पब्लिक सोबत चांगले रिलेशनशिप बनावता आली पाहिजे. *रिस्क/ धोका घ्या :* उद्योजक नेहमीच रिस्क घेण्यात माहीर असतात, हे नेहमीच रिस्क घेण्यासाठी तयार असतात. ते रिस्क घेतात आणि रिस्क घेणं म्हणजे अंधारात उडी मारण्यासारखं नसतं. जेव्हा ते रिस्क घेतात त्यावेळी ती कॅलक्युलेट करून घेतलेली रिस्क असते, त्यांना माहित असते की ते काय करत आहेत आणि ते का करत आहेत. त्यासाठी व्हिजन अतिशय महत्वाचे आहे. आणि त्याला जोडूनच एक भाग आहे आणि तो म्हणजे व्हिजन. *व्हिजन :* उद्योजकाला एक व्हिजन असतं. व्हिजन म्हणजे काय तर लांब किंवा दूर पाहण्याची दृष्टी. जो रिजल्ट येणार आहे किंवा जे साध्य करायचे आहे, ते उद्योजकाच्या डोक्यात आधीच असते. जस एखादा शिल्पकार दगडामध्ये मूर्ती कोरत असताना त्या दगडामध्ये मूर्ती फक्त त्यालाच दिसत असते. आणि उरलेला भाग तो काढून टाकत असतो. त्यावेळी ती मूर्ती इतरांना सोडून फक्त त्या शिल्पकारालाच दिसत असते. उद्योजकाच पण तसच आहे, त्याला ते व्हिजन दिसत असते. जे इतरांनी तिकडे पाहिलं तरी त्यांना दिसत नाही. मी जे साध्य करणार आहे किंवा जे काही मिळवणार आहे ते त्याचं स्वप्न आणि ध्येय असतं. आणि ते त्याच्या नजरेसमोर स्पष्ट असते, इतरांना ते नसतं. आणि ते व्हिजन लक्षात ठेवून जे मार्गक्रमण करत असतात तेच खरे उद्योजक असतात. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या सर्व बाबी आपल्याला शिकता येतात, आपल्या स्वभावामध्ये बदल आणता येतात आणि त्यामुळे कोणीही उद्योजक बनू शकतो. जर आता मी सांगितलेल्या या काही गोष्टी ध्यानात ठेवून त्यानुसार मार्गक्रमण केला किंवा त्यानुसार विचार पद्धतीमध्ये, आपल्या माईंडसेट आणि आपल्या स्वभावामध्ये बदल केला तर नक्कीच कोणीही उद्योजक बानू शकतो. Marathi business traning- कोणता व्यवसाय करावा हे माहित नसताना सुरुवात कशी करावी ? बिझनेस किंवा उद्योक कसा करावा ? किंवा मुळात सुरुवातच कशी करावी ? हे माहित नसते. काही लोकांना तर माहीतच नसते की, त्यांचा इंटरेस्ट एरिया काय आहे , प्रॉडक्ट कसं ठरवायचं हे सुद्धा माहित नसते, उद्योक सुरू करण्यासाठी किती भांडवल गुंतवावे लागेल माही नसते. त्यामुळे अशा लोकांसाठी एक उद्योक सुरु करण्याचा उत्तम मार्ग सांगणार आहे. आणि मला याची खात्री आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडेल. तुमची आवड कशात आहे ते शोधा: तुम्हाला आता असं वाटेल की सगळीच माणसे असं सांगतात की तुमची आवड कशात आहे ते शोधा, पण म्हणजे ते नक्की काय आहे. आपल्याला आवड किंवा आपली रुची ज्या प्रॉडक्ट मध्ये आहे किंवा ज्या बिझनेस बद्दल आपल्याला आत्मीयता वाटते किंवा आपल्याला ते काम करताना बरं वाटतं, आनंद मिळतो त्यामध्ये काम करण्यासाठी हे का शोधणं गरजेचं आहे, तर तुम्ही तसं शोधलं नाही तर बिझनेसमध्ये जेव्हा वाईट वेळ येईल , किंवा तुंगला ग्राहक मिळणार नाही, तुमच्यावर कर्ज येईल. तेव्हा बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असताना त्यावेळी तुमच्याकडे सय्यम, प्रेरणा राहिली पाहिजे की, रोज सकाळी उठून परत तेच काम करण्यासाठी त्याच व्यवसायात जाण्याची. जर तुम्ही फक्त पैसे कमावण्यासाठी बिझनेस करत असाल आणि तुमचं त्या बिझनेस मध्ये पॅशन म्हणजे आवड नसेल तर तुम्हाला त्यामध्ये लवकर कंटाळा येईल आणि तो बिझनेस सोडून द्यावासा वाटेल. असं होऊ नये म्हणून तुमची ज्यात आवड असेल, तुम्हाला जे जमत असेल असा बिझनेस शोधा. आणि फक्त तुमची आवड शोधा. सेल्स : अजून बिझनेस सुरु करू नका. बिझनेस सुरु न करता तुम्हाला ते जे आवडत किंवा प्रॉडक्ट जे तुम्ही निवडले आहे, त्या प्रॉडक्टमध्ये जाऊन सेल्स करा. आता सेल्स कसा करणार, आता जे प्रॉडक्ट तुम्ही निवडलत तर ते प्रॉडक्ट तुमचं स्वतःच तर नाही. म्हणून मग तुम्ही तुमचे जे स्पर्धक आहेत त्या व्यवसायामध्ये त्यांच्याकडे जा किंवा तत्सम विकणाऱ्या लोकांकडे तुम्ही नोकरी करा किंवा कमिशन वर सेल्स करा. पण सेल्स करणं अतिशय महत्वाचं आहे. जो पर्यंत तुम्ही सेल्स करत नाही तोपर्यंत तुम्हाला बिझनेस बद्दलच्या मागच्या गोष्टी तुम्हाला समजत नाही. सेल्स जेव्हा आपण करता तेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकांसोबत बोलता, आपले ग्राहक काय विचार करतात, तो प्रॉडक्ट का विकत घेतात, त्याची प्राईज पॉईंट काय आहेत, त्यांना काय आवडतं किंवा काय नाही आवडतं या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. आणि त्या गोष्टी तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये वापरू शकता. परंतु हे शिकण्यासाठी तुम्हाला कोणी दुसरा व्यक्ती पैसे देतोय करणं तुम्ही त्याच्याकडे सेल्सचा जॉब करत आहात. त्यामुळे दुसरा कोणता जॉब करू नका फक्त सेल्सचा अगदी पगार नाही दिला तरी चालेल किंवा मग तुम्ही पार्ट टाइम हा जॉब करा कारण तुम्हाला त्यातून काही गोष्टी शिकून व्यवसाय सुरु करायचा आहे. परंतु तुम्ही त्या व्यवसायात जाणार आहात त्या व्यवसायाचा, त्या उत्पन्नाचा त्या प्रॉडक्टच्या सेल्सचा अनुभव घेणे खूप महत्वाचं आहे. स्पर्धकांकडून शिका : एकदा तुम्ही सेल्सचा अनुभव घेतलात कि तुम्हाला ते कळेल की ते प्रॉडक्ट तुम्हाला आवडतं की नाही किंवा तो व्यवसाय जमेल की नाही.तुमचं ग्राहकांसोबत बोलणं होईल, त्यांची प्राईज पॉईंट कळतील आणि तुम्हाला मार्केट कसं आहे याचा अंदाज येईल, आणि तुम्हाला आत्मविश्वास येईल की त्या व्यवसायात जायचं की नाही. हे ठरवण्यासाठी तुम्ही त्यासाठी ३ ते ४ महिने एका स्पर्धकाकडे काम करा त्यानंतर पुन्हा दुसऱ्या स्पर्धकाकडे ३ ते ४ महिने काम करा. तिथे तुम्हाला कायमचे काम करायचे नाही. तिथे फक्त अनुभव घ्यायचा. अशाप्रकारे साधारतः वर्षभर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून अनुभव घ्या. आणि त्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार झाला असाल. तुम्हाला कुठल्या कोर्सची आवश्यकता नाही. सुरुवात तुम्हीच तुमची करू शकता. मला खात्री आहे की, या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या बिझनेसची सुरुवात कराल. निदान कुठून सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची ते तरी तुम्हाला कळेल. आणि त्यानंतर तुम्ही यशस्वी उद्योजक होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करायला सुरुवात कराल. ऑल द बेस्ट ! धन्यवाद. मित्रांनो,आज या video मध्ये आपण जाणुन घेणार आहोत Enterpreneurship myth-उद्योगजकते बद्दलचे गैरसमज.उद्योगजकते बद्दल आपल्या समाजामध्ये,आपल्या मनामध्ये काही गैरसमज पसरलेले आहेत....ते कय आहेत आणि ते कसे चुकीचे आहेत ते आपण बघुया.
१. You are born an Entrepreneur: म्हणजेच उद्योजक हा जन्माला यावा लागतो, तो जन्मापासूनच उद्योजक असतो. परंतु मित्रांनो ते माझ्यामते साफ खोटं आहे. बरीच अशी मला तुम्हाला उदाहरणे देता येतील, ज्यांना वयाच्या ३०, ४० किंवा ५० व्य वर्षापर्यंत उद्योजकतेचा गंध ही माहित नव्हता. कधीतरी आयुष्यात एखादी कल्पना सुचली आणि मग त्या कल्पनेवर काम करून मग ते उद्योजक बनले. असं मुळीच नाहीये कि अगदी शाळेत असतानाच माणूस तयारी करतो की, मला उद्योजकच व्हायचं आहे. हिंदी चित्रपटात तास चालत पण प्रत्यक्षात मात्र कधी तसं होत नाही. खरंतर बरेच उद्योजक तुम्ही पहिले असतील जे आपल्या भाषणामध्ये, इंटरव्युव्ह, आपल्या आत्मचरित्रामध्ये आपल्या बालपणाचे किस्से सांगतात, त्यानंतर त्यापासून आपण पुढे कसं डेव्हलप होत गेलो ते सांगतात. त्यावरून तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे की लहानपणापासूनच ही व्यक्ती हुशार होती आणि लहानपानापासूनच त्यांच्यात उद्योजकतेची कौशल्य होती. परंतु मित्रांनो , हे सगळे काँनेक्टिव्हिटी डॉट्स असतात, जेव्हा एखादा यशस्वी माणूस आपल्या जुन्या आठवणी, आपल्या भूतकाळाकडे बघतो तेव्हा त्याला असे काही डॉट्स दिसतात की ते जोडून ती ही स्टोरी बनवतो. आणि मीडियाला अशाच गोष्टी जास्त आवडतात, आणि त्या अगदी तश्याच छापल्या देखील जातात. आणि त्या लोकप्रिय देखील होतात. म्हणूनच कदाचित तो गैरसमज पसरलेला आहे. परंतु मुळात तसं काहीच नाही. त्यांचं बालपणही आपल्यासारखच असत. आता आपण ही मागे वळून पाहिलं आणि त्याच अवलोकन केलं तर आपल्या भूतकाळामध्ये अशा काही गोष्टी झाल्या असतील किंवा अशा काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या असतील. त्या जर तुम्ही पाहिल्यात आणि त्यातून काही शिकलात तर ते तुम्हाला उद्योजकतेकडे किंवा जीवनात यशस्वी होण्याकडे प्रेरित करणाऱ्याच असतील. २. Entrepreneur should be talented : दुसरा गैरसमज जो आहे की एन्त्रेप्रेनेर हा टॅलेंटेड किंवा हुशार असावा. परंतु जर तसं असत तर लहानपणी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना तुमच्या वर्गात जो कोणी पहिला येणार मुलगा किंवा मुलगीच आज सगळ्यात मोठे उद्योजक झाले असते. परंतु तसे नाहीये. तर उद्योजकाने स्मार्ट असणे गरजेचे आहे. स्मार्ट आणि टॅलेंटेड मध्ये फरक आहे. उद्योजकाला कळलं पाहिजे की, आपल्याला नक्की कुठल्या स्मार्ट माणसांकडून किंवा इंटेलिजन्ट माणसांकडून काम करून घेता आले पाहिजे. खरा उद्योजक हा महेंद्रसिंह धोनी सारखा असतो. जो भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान आहे. त्याच्याकडे सचिन तेंडुलकर सारखा बॅट्समन आहे आणि त्याच्याकडे झहीर खान सारखा बॉलर देखील आहे. ते सगळे आपापल्या खेळामध्ये , कौशल्यामध्ये पारंगत किंवा एक्स्पर्ट आहेत. परंतु त्यांच्या कडून योग्य काम कसं करून घ्यायचं हे कप्तानच काम असतं. उद्योजकच पण तसंच असतं. फायनान्स, सेल्स, आणि मार्केटिंगमध्ये हुशार माणसे खूप आहेत, त्यांना एकत्र आणून त्यांच्याकडून काम करून घेणं हे महत्वाचं काम आहे. एखाद्या ऑर्केस्ट्रा चा ट्रेनर किंवा कंडक्टर असतो , त्याच काम जे आहे अगदी तेच काम एन्त्रेप्रेनेरच असतं. त्यामुळे एन्त्रेप्रेनेर स्वतः टॅलेंटेड किंवा हुशार असणे गरजेचे नाही, परंतु स्मार्ट असणे गरजेचे आहे. त्याला कळलं पाहिजे की कोणत्या व्यक्तीकडून कसं काम करून घेता येईल. ३. Entrepreneur should have money : तिसरा गैरसमज जो आपल्याला उद्योजकते बद्दल ऐकायला मिळतो तो म्हणजे तुमच्याकडे खूप पैसा म्हणजे इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तरच बिझनेस होतो. परंतु असे खूप एन्त्रेप्रेनेर आहेत त्यांनी हे सिद्ध केलं आहे की कुठल्याही इन्वेस्टमेंटशिवाय , स्वतः कडे जास्त पैसे नसताना, आणि कुठलीही आर्थिक ताकद पाठीशी उभी नसताना देखील एखादी चांगली कल्पना चांगल्याप्रकारे राबवली किंवा सत्यात उतरवली तर बिझनेस मोठा होतो. आणि मग त्यात इन्व्हेस्ट करणारे देखील सापडतात. आता सॅम वॉल्टनच उदाहरण घेऊयात. वॉलमार्ट हि जगातील सर्वात मोठी रिटेल सेल्स चालू केली. तेव्हा त्या सॅम वॉल्टन कडे रिटायरमेंटला सापडलेले तेवढेच पैसे होते. त्यांनी ते त्यांच्या उतार वयात केलं तेव्हा त्यांची रेटायर्मेंट झाली होती. वॉल्टन यांनी या वयात आणि ते हि कमी पैशात एवढी मोठी चैन उभारली. जर भारतामधलं उदाहरण घ्यायचं झालं तर फ्लिपकार्ट. फ्लिपकार्टने केवळ ४ ते ५ लाख त्यांच्याकडे सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट होती आणि त्यातून त्यांनी बिझनेस उभा केला. आणि आज बघा फ्लिपकार्ट कुठे पोचली आहे. उद्योगासाठी पैसा असणे किंवा उद्योग सुरु करण्याआधी पैसा असणे हे चुकीचे आहे, हा केवळ एक गैरसमज आहे. उद्योगासाठी पैसा लागतो पण तो उद्योग वाढवण्यासाठी लागतो. आणि ते मिळवण्याचे खूप सारे प्रकार किंवा मार्ग उपलब्ध आहेत. असं नाही की, आज ज्याच्याकडे पैसा आहे तोच फक्त एन्त्रेप्रेनर किंवा बिझनेसमॅन बनू शकतो. तर मित्रानो हे गैरसमज जर तुमच्या मनात असतील तर ते काढून टाका. उद्योजकता हि कोणाचीही बांधिलकी नाही. एक चांगली कल्पना , त्याच्यावर काम करण्याची जिद्द आणि हिम्मत आणि कधीही न कंटाळता न घाबरता , मागे न पडता सतत त्याच गोष्टीचा पाठपुरावा केलात तर तुम्ही देखील एन्त्रेप्रेनर बनू शकता आणि जरूर बना. ऑल द बेस्ट. धन्यवाद ! नमस्कार मित्रांनो, नेटभेट तर्फे २७ ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी ५ वाजता “सोशल मिडीया मार्केटिंग” संबंधी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणारा Facebook Live कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चर्चासत्रात सलील सुधाकर चौधरी यांनी बऱ्याच प्रश्नाची उत्तरे देखील दिली. सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त ग्राहक कसे मिळवायचे हे देखील सांगण्यात आले.
मित्रांनो आजच्या स्पर्धात्मक युगात आपले उत्पादन आणि सेवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “सोशल मिडीया “ एक सर्वोत्कृष्ट माध्यम आहे हे सर्वांनाच ठाउक आहे. सोशल मिडीया म्हणजे केवळ तरुणांसाठीचा टाईमपास नसून एक अत्यंत प्रभावशाली बिझनेस टूल आहे. एवढच नव्हे तर सोशल मिडीया मार्केटींग केवळ बलाढ्य कंपन्यांकरीता नसून स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योगांसाठीही तेवढाच किंबहूना जास्त उपयुक्त आहे. सोशल मिडीयाचे तंत्र अवगत करुन प्रत्येकाला अत्यंत कमी "बजेट" मध्ये आपल्या व्यवसायासाठी ग्राहकांची एक न संपणारी पाईपलाईन तयार करता येईल. म्हणूनच नेटभेटने आयोजित केलेला “सोशल मिडीया मार्केटिंग” संबंधी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणारा Facebook Live कार्यक्रम ! तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com नमस्कार मित्रांनो, नेटभेट तर्फे १९ ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी ५ वाजता प्रसिद्ध इमेज सल्लागार "रुपाली गौतम" यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह चर्चा केली. मित्रांनो या चर्चेमध्ये एक चांगली इमेज बनवण्यासाठी, लोकांवर आपली छाप पाडण्यासाठी, आणि प्रसंगानुरूप कसा पेहराव असावा, कसं वागावं या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला मराठीतून शिकायला मिळाल्या. या चर्चेदरम्यान रुपाली मॅडम यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देखील दिली. If you fail to plan, then you are planning to fail.
नमस्कार मित्रांनो, बिझनेस सुरू करण्याची इच्छा बऱ्याच जणांना असते परंतु त्यासाठी योग्य प्रकारे योजना आखणे म्हणजेच बिझनेसचे प्लॅनिंग करणे मात्र प्रत्तेकाला जमतेच असे नाही. बऱ्याच जणांना तर बिझनेस प्लॅन ची गरज आहे तेच माहीत नसते. मित्रानो बिझनेसचं प्लॅनिंग करणे अत्यंत आवश्यक आहे कारण बिझनेस प्लॅन हा तुमच्या बिझनेस बद्दल काही उत्तरं देतो, काही प्रश्न महत्वाचे असतात जे तुमच्या बिझनेस बद्दल इन्व्हेस्टरला जाणून घ्यायचे असतात. बँक किंवा इन्व्हेस्टर यांना तुमच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवण्याआधी तुमच्या बिझनेसची माहिती देणं गरजेचं असतं. तुम्ही काय आणि कसे करणार आहात ते पाहायचं असतं. आणि त्यामुळे बिझनेस प्लॅन हे असं डॉक्युमेंट असतं, जे तुमच्या इन्वेस्टर्सला किंवा प्लॅन वाचणाऱ्या कोणालाही पाच प्रश्नांची उत्तरं देतं आणि ते प्रश्न म्हणजे Why ,What ,Who, When आणि How ! 👉तुम्ही बिझनेस का करताय ? (Why) 👉तो नक्की कसला बिझनेस आहे? (What) 👉नक्की हा बिझनेस कोण करणार आहे? (Who) 👉तो बिझनेस कधी प्रॉफिट करायला सुरुवात करणार आहे? किंवा कधी रेव्हेन्यु मिळविणार आहे? (When) 👉आपण तो बिझनेस कसा करणार आहात? (How) हे अगदी महत्वाचे प्रश्न आहेत. कारण तुम्ही बिझनेस कसा करणार आहात हे इन्व्हेस्टरला आणि सर्व स्टेक होल्डर्सना जाणून घ्यायचं असतं. आणि त्यासाठी बिझनेस प्लॅन हा महत्वाचा असतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही तुमच्या बिझनेस प्लॅन मध्ये असली पाहिजेत. बिझनेस प्लॅन म्हणजे काय आणि त्यामध्ये काय लिहाल? हे आम्ही नेटभेटच्या वाचकांसाठी या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. प्रत्येक उद्योजकाने नक्की पाहिलाच पाहिजे असा हा विडिओ जरूर पहा आणि आपल्या इतर उद्योजक मित्रांसोबत जरूर शेअर करा !👍 बायोडेटा हा आपल्या करीअरसाठी अतिशय महत्वाचा आहे. आपला बायोडेटा हा आपला प्रतिनिधित्व करत असतो. आपला बायोडेटा पाहत असताना मुलाखत घेणारी व्यक्ती आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहोत हे आखत असते. तर मित्रांनो आपण आपल्या करिअर साठी महत्वाचा असलेला बायोडेटा कसा लिहायचा हे आपण या व्हिडीओ मधून पाहणार आहोत. व्हॉट्सऍप चे संस्थापक जैन कॉम यांनी नुकताच फेसबुक सोडली. फेसबुक सोडल्यानंतर जान कॉम यांनी मीटर मध्ये केलेले एक वक्तव्य महत्त्वाचे आहे. "मी फेसबुकला माझ्या ग्राहकांची प्रायव्हसी विकली... आणि याबद्दल मी माझ्या ग्राहकांची माफी मागतो" असं ते विधान होतं.
मित्रांनो, चार वर्षांपूर्वी फेसबुक ने तब्बल 19 बिलीयन डॉलर्सना विकत घेतलेला व्हॉट्सऍप आता पूर्णपणे फेसबुकची संपत्ती आहे. आणि या संपत्तीचा फायदा फेसबुक ने नाही घेतला तरच नवल. आत्तापर्यंत जाहिरातींपासून मुक्त असलेला व्हॉट्सऍप 2019 नंतर मात्र तसं राहणार नाही. फेसबुक ने व्हाट्सअप मध्ये जाहिराती आणण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि ज्यान कॉम यांनी फेसबुक सोडण्याचा ते मुख्य कारण आहे. सुरुवातीला व्हाट्सएप स्टोरीज मध्ये जाहिराती दिसतील अशा काही बातम्या इंटरनेट जगात जगतामध्ये पसरल्या आहेत. काही अंशी त्यामध्ये तथ्य आहे असं वाटतंय. परंतु जाहिराती दाखवणे तितकं सोपं नाहीये. कारण व्हॉट्सऍप मधील आपण पाठवलेला प्रत्येक मेसेज हा एनक्रिप्टेड असतो. त्यामुळे ग्राहकांबद्दल ची माहिती आणि मेसेज बद्दलची माहिती कोणालाच कळत नाही. परंतु जर जाहिराती दाखवायचाच असतील तर मात्र इंक्रीप्शन थोडस सहील होईल हे नक्की. व्हाट्सअप स्टोरीज हे फीचर फार वापरला जात नाही, त्यामुळे सुरुवातीला कदाचित या जाहिरातींमुळे आपल्याला त्रास जाणवणार नाही. पण पुढे पुढे व्हाट्सअप मध्ये इतरत्र देखील जाहिराती येऊ शकतात. तर मित्रांनो मोफत होतं म्हणून एवढे दिवस आपण व्हाट्सअप वापरत होतो, आणि आता त्याची सवय लागल्यानंतर आपण अत्यंत महागडी किंमत देऊन म्हणजेच आपली वैयक्तिक माहिती देऊन व्हाट्सअप विकत घेणार आहोत. 2019 मध्ये जर असं झालं च , तर मला सांगा तुम्ही काय करणार? व्हाट्सअप वापरत राहणार? की नव्या एखाद्या जाहिरात मुक्त मेसेज प्लॅटफॉर्मचा वापर सुरू करणार? सलिल सुधाकर चौधरी नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू या ! www.netbhet.com नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वतःच एक Vision Statement बनवलेलं आहे का ? आपल्या आयुष्यातही आपण कुठे जाणार? आपली दूरदृष्टी काय आहे? कुठे आपल्याला पोचायचे आहे ? हे तुम्ही एका सिंगल पेजवर लिहिलेलं आहे का? मित्रांनो Vision Statement अतिशय उपयुक्त आहे कारण तुमच्या आयुष्यातले मोठे मोठे निर्णय घ्यायची जेव्हा वेळ येते त्यावेळी Vision Statement तुम्हाला दिपस्तंभ सारखं मार्गदर्शन करत. मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं सिंगल पेज Vision Statement कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपलं सगळ्यांचंच एक Vision Statement असतंच जे स्पष्ट नसेल, लिहिलेलं नसेल पण एक ढोबळ मानाने एक रफ आयडिया असते की, आपल्याला आयुष्यात कुठे पोचायचं आहे, काय मिळवायचं आहे. Vision Statement मध्ये सगळ्यात महत्वाचं कॉन्फयुजन काय असतं की आपण इतरांच्या व्हिजनलाच आपलं व्हिजन बनवतो. कोणी म्हणतो की मला १०० करोडची कंपनी बनवायची आहे तर आपण ते आपलं व्हिजन बनवतो. किंवा सोशल मीडियावर उद्योजक सोबत मोठी गाडी दाखवतात तर आपल्यलाहि तेच वाटत की आपल्यालाही हेच बनायचं आहे. प्रत्येकाचं व्हिजन सारखं नसतं. व्हिजन बाबत बेस्ट गोष्ट हीच आहे की तुम्ही निर्णय घेऊ शकता , की तुमचं व्हिजन काय असाल पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं व्हिजन होत की माझा बांधवाना यातून मुक्त करायचं आहे. त्यांचं व्हिजन जर चांगला वकील बनायचं किंवा खूप पैसे कमवायचं तर त्यांनी कमावले असते कारण ते खूप हुशारही होते. परंतु आज त्यांचं नाव इतक्या वर्षांनंतरही कोणाच्या लक्षात राहील नसतं. किती श्रीमंत माणसांची नावं आपल्या लक्षात आहेत. खूप कमी, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी. त्यामुळे प्रत्येकाचं वेगळं असतं. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, शिवाजी महाराज इ. च व्हिजन हे वेगवेगळं होत. त्यामुळे दुसऱ्याच्या व्हिजनला आपलं व्हिजन बनवायची चूक मात्र करू नका. तुमचं स्वतःच एक वेगळं व्हिजन असाल पाहिजे. तेव्हाच ते तुम्हाला काहीतरी वेगळं करण्यासाठी उत्तेजित करेल. मित्रांनो मी तुम्हाला आज व्हिजनसाठी ३ प्रश्न सांगणार आहे. मी तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं देणार नाही, कारण मग माझं व्हिजन हे तुमचं व्हिजन होईल. आणि जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरं नीट बनवलेत तर तुम्ही तुमचं Vision Statement चांगल्या प्रकारे बनवू शकता. सर्वप्रथम अशा एका ठिकाणी जा जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. तुमच्या रूममध्ये स्वतःला बंद करून घ्या. थोड्यावेळासाठी किंवा एकटेच फिरायला जा. तुमचा फोन, कॉम्पुटर, टीव्ही, म्युझिक बंद करा. काहीच करू नका फक्त शांतपणे १५ मिनिटे या प्रश्नांचा विचार करा. १५ मिनिटे पेजवर ही काही लिहू नका आणि फक्त विचार करा. आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात करा. तर आता आपण ते ३ प्रश्न बघुयात कोणते आहेत. १. तुम्हाला काय बनायचं आहे? २. तुम्हाला काय करायचं आहे ? ३. तुम्हाला काय मिळवायचं आहे ? आणि या प्रश्नाची उत्तरं फक्त पुढच्या ५ वर्षाचा विचार करून द्या. कारण त्याच्या पुढचं आपल्याला दिसत नाही. जग किंवा तंत्रज्ञान इतकं बदलणार आहे की तुम्ही आता तो निर्णय घेऊ शकत नाही. पुढे काय होणार आहे. पण पुढच्या ५ वर्षाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. त्यामुळे फक्त ५ वर्षाचा Vision Statement बनवा. आता मित्रांनो, हे ३ प्रश्न आपण आता बघुयात. १. मला काय बनायचं आहे? सर्वप्रथम जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता. तेव्हा तुमच्या बद्दल काय भावना त्यांच्या मनात अली पाहिजे किंवा तुमच्याबद्दल काय विचार मनात आले पाहिजेत हे लिहा. ते लोक तुमच्याशी बोलून परत जातात तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय छवी राहिली पाहिजे ते लिहा. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबा बरोबर तुमची बायको, नवरा किंवा आई-वडील किंवा मुलं त्यांच्यावर तुमचा काय आणि कसा प्रभाव राहिला पाहिजे ते लिहा. त्याचप्रमाणे तुमचे मित्र मंडळी, तुमचा समाज, तुमच्या आसपासची लोकं यांनी काय आणि कसा विचार केला पाहिजे ते तुम्ही लिहा. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला काय वाटतं ते नाही लिहायचं तर दुसर्यांना तुमच्याबद्दल काय वाटलं पाहिजे ते लिहायचं आहे. २. तुम्हाला काय करायचं आहे ? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला तुमच्या करिअर बद्दल लिहायचं आहे. तुम्हाला तुमचं करिअर आहे तेच ठेवायचं आहे की बदलायचं आहे. किंवा ते ५ वर्षात कधी बदलणार आणि ते बदलण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल ते लिहा. त्यानंतर तुम्ही आता कोणत्या लेवलवर आहात. समजा तुम्हाला हेच करिअर पुढे घेऊन जायचं आहे तर आता तुम्ही कोणत्या लेवलवर आहात आणि ५ वर्षानंतर तुम्ही कुठल्या लेवलवर पोहोचायचे आहे. तुम्ही लिहू शकता की तुम्हाला कंपनीचा CEO बनायचं आहे पण ते या पुढील ५ वर्षात होणं शक्य आहे का ? तुम्ही आता कोणत्या लेवलवर आहात आणि जर ते ५ वर्षात शक्य नसेल तर ते नका लिहू. तर CEO बनणं हे स्वप्न झालं आणि जनरल मॅनेजर बनणं हे व्हिजन झालं. त्यामुळे तुम्हाला स्वप्नांपासून मार्ग मिळत नाही तर व्हिजन पासून मिळतो. स्वप्न डिस्ट्रक्ट करतो तर व्हिजन तुम्हाला मार्ग दाखवतो. त्यासोबत तुम्ही लिहा की तुम्हाला तुमचा वेळ कसा घालवायचा आहे. तुम्ही काय शिकणार आहात. काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकयच्या आहेत का? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे का ? किंवा कोणता देश पाहायचा आहे का ? तुम्हाला फक्त काम काम नाही करायचं , फक्त पैसा पैसा नाही करायचं तुम्हाला फक्त करिअरचं नाही करायचं. तुमहाला तुमचं आयुष्य पण आहे आणि ते तुम्हाला जगायचं सुद्धा आहे. ३. तुम्हाला काय मिळवायचे आहे ? त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे मला काय मिळवायचं आहे. यात तुम्ही फिजिकल किंवा भौतिक गोष्टी लिहू शकता. जस की, घर कोणतं घ्यायचं आहे, 1BHK , 2BHK , बंगला, गाडी , जमीन, कार, इ. घ्यायचे का? एक Crystalclear Image त्याबद्दल लिहा. त्यानंतर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप बद्दल लिहा. तुमहाला काय अपेक्षा आहेत? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहा. लग्न करायचं आहे की नाही? बायको किंवा नवऱ्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ते लिहा. अशाप्रकारे या ३ प्रश्नाची उत्तरे शांतपणे विचार करून लिहा. आणि ती उत्तरं लिहिल्यानंतर एकाच पेजवर लिहा. एका पानावर ३ कॉलम करा, काय मिळवायचं, काय करायचं आणि काय बनायचं. या ३ गोष्टी जर तुम्ही लिहिल्यात तर ते तुमचं डॉक्युमेंट तुमचं Vision Statement तयार होईल. ते तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला नेहमी मदत करेल. तुम्ही जे काही लिहिलं आहे ते तुम्हाला रिव्युव्ह करायचे आहे, ३ किंवा ६ महिन्यांनी किंवा १ वर्षाने. आणि तुम्ही त्याच्यात थोडे थोडे बदल करू शकता. मी तुम्हाला एक माझंच उदाहरण सांगतो, माझ्या Vision Statement मध्ये माझं कुटुंब हे सगळ्यात पहिले आहे. आणि नंतर बिझनेस आहे. पैसा नंतर आहे. हे मी Vision Statement मध्ये लिहिल्यामुळे मला ज्या काही चांगल्या ऑर्डर्स येतात ज्या मुंबई, पुणे किंवा नाशिक पासून लांब आहेत जिथे मला खूप प्रवास करावा लागतो, लांब राहावं लागतं, त्यामुळे मी अश्या ठिकाणच्या ऑफर्स घेतच नाही. कारण मला माझं कुटुंब सगळ्यात पाहिलं आहे. मला त्यांच्यापासून लांब राहायचं नाहीये. तर मित्रांनो मला ही कॅलॅरिटी मला Vision Statement मधून आली. अशाप्रकारे तुमच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि नेहमीच मोटीव्हेट करेल. आणि आता व्हिजन म्हणजे तुमच्या दृष्टीला आता ते दिसायला लागलं आहे तेव्हा तुमच्या आत असलेल्या मोटिव्हेशनच्या टाळ्याला एक छवी मिळते आणि ते कुलूप उघडलं जात. आणि मग या व्हिजन डॉक्युमेंट मुळे तुम्हाला जरी कधी स्टेजवर उभं राहून जोरात बोलणाऱ्या मोटिव्हेशनची गरज नाही तुम्हाला ते तुमच्या आतून मिळतं. मला खात्री आहे की तुम्हाला हा छोटासा व्हिडीओ नक्की आवडला असेल. धन्यवाद ! अॅपल ने काल शेअर मार्केट मध्ये १ ट्रीलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला. या टप्प्यावर असलेली ती जगातील एकमेव कंपनी बनली आहे.
४२ वर्षांपूर्वी एका गॅरेज मध्ये सुरु झालेली कंपनी आज जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ही निश्चीतच उदयोन्मुख नवउद्योजकांसाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. पण मित्रांनो, अॅपल इथे पोहोचू शकलं याचं एकमेव कारण आहे "फोकस" . होय फोकस. - पण स्टीव्ह जॉब्सच्या मते फोकस म्हणजे एकाच अतिमहत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे असे नव्हते तर त्यासोबत इतर १००० गोष्टींना "नाही" म्हणणे हे देखिल त्याला अभिप्रेत होते. हजारो चांगल्या कल्पना समोर येतात त्यापैकी ९९९ कल्पनांना नाही म्हणून उरलेल्या एकावर काम करणे याला स्टीव्ह जॉब्स फोकस करणे असे म्हणत असे. १९९७ साली वायर्ड मासिकाच्या कव्हर वर "अॅपल" कंपनी संपायला आली आहे आणि तिच्यासाठी "प्रे" (प्रार्थना) करा अशा आशयाचं चित्र छापून आलं होतं. ईतकी अॅपलची वाईट अवस्था झाली होती. स्टीव्ह जॉब्स तेव्हा अॅपल मध्ये नव्हता. नंतर त्याला जेव्हा पुन्हा हंगामी सीईओ (Interim CEO म्हणजेच iCEO, यावरुनच पुढे त्याने कंप्युटरला iMac असे नाव दिले. !) म्हणून पुन्हा बोलावण्यात आलं तेव्हा त्याला आढळलं की अॅपल मध्ये अनेक वेगवेगळी उत्पादनं डीझाईन करणारे प्रोजेक्ट्स चालू आहेत. सर्वप्रथम त्याने फक्त २ प्रोजेक्ट्स चालू ठेवले आणि बाकी सर्वच्या सर्व प्रोजेक्ट्स बंद केले. कंपनीचं पुर्ण लक्ष, मॅनपॉवर, पैसा केवळ दोनच प्रोजेक्ट्सवर फोकस केला. आणि त्यातूनच पुढे अॅपलने प्रगती केली. कारण स्टीव्हच्या मते अॅपल प्रॉडक्ट्स निवडताना ग्राहकांच्या मनात गोंधळ होत होता. नक्की कोणतं प्रॉडक्ट माझ्यासाठी आहे हे ग्राहकाला ठरवता येत नव्हतं. केवळ एकच पण बेस्ट प्रॉडक्ट आम्ही ग्राहकांना देणार हा संदेश स्टीव्ह जॉब्स ने ग्राहकांना दिला आणि तेच अॅपलच्या यशाचं कारण ठरलं. पुढे गुगलच्या लॅरी आणि सर्गी बरोबर चर्चा करत असताना स्टीव्ह ने हाच सल्ला त्यालाही दिला. गुगलने तेव्हा मुनशॉट्स म्हणजे भविष्यात मोठे होतील पण आता त्याची कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक बिझनेसेस मध्ये काम करायला सुरुवात केली होती. स्टीव्हच्या या सल्ल्यानंतर अनेक मुनशॉट्स बिझनेस मधून गुगलने काढता पाय घेतला होता. त्यातूनच पुढे अल्फाबेट ही स्वतंत्र कंपनी स्थापन करुन लॅरी आणि सर्गी भविष्यातील बिझनेसेस वर फोकस करु लागले आणि गुगलला वेगळे ठेवून "सुंदर पिचाई"ला गुगल च्या उत्पादने आणि सेवांवर फोकस करायला सांगितले. आजही जर आपण बघितलंत आयफोनचं एका वेळी केवळ एकच मॉडेल अधिकृतरित्या बाजारात उपलब्ध करुन दिलं जातं. (आपफोन एक्स चा अपवाद वगळता). आणि त्यामुळे ग्राहकांच्या मनात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतो आणि आयफोनच सगळ्यात चांगला पर्याय आहे हे त्यांच्या मनात ठसते. मी बर्याच व्यावसियाकांना भेटतो तेव्हा जवळपास प्रत्येकजण मला व्यवसाय वाढविण्यासाठी मी नविन प्रॉडक्ट्स बाजारात आणतोय, नविन ठिकाणी शाखा उघडतोय किंवा अगदी नवे बिझनेस सुरु करतोय असं सांगत असतात. त्यावेळी त्यांचा "फोकस" कमी होतोय हे मला जाणवत असतं आणि मी प्रकर्षाने त्यांना ते तितक्याच कळकळीने सांगतही असतो. अर्थात बिझनेस वाढवू नये असं नाही. पण बर्याचदा नव्या प्रॉडक्ट्स किंवा बिझनेसेस साठी वेळेची, माणसांची आणि पैशांची मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते आणि सध्या चालू असलेल्या पहिल्या बिझनेसवर याचा ताण पडू लागतो. शेवटी एक गुटगुटीत बाळ होण्याऐवजी दोन कृष बाळं तयार होतात. तेव्हा अॅपल कडून आपण हे शिकूया आणि जास्तीत जास्त फोकस आपल्या मुख्य बिझनेसकडेच ठेवूया. पुढची ट्रीलीयन डॉलर कंपनी बनवायची असेल तर तिथे पोहोचवायला हेच वाहन उपयोगी ठरणार हे नक्की ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया ! WWW.NETBHET.COM नमस्कार मित्रांनो, हा जमाना डिजिटलचा आहे, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट आहे. मोबाईल अधाशासारखा वेगवेगळ्या जुन्या क्षेत्रांना खाऊन टाकतोय. संगीत क्षेत्रही मोबाईल आणि इंटरनेटच्या वापरामुळे डबघाईला गेलय. कॅस्सेट्स आणि सीडी विकून एकेकाळी बक्कळ कमाई करणाऱ्या म्युझिक कंपन्यांची युट्युब, gaana.com, सावन सारख्या म्युझिक ॲप्स मुळे घुसमट होत आहे. पण मित्रांनो भारतातल्या एका जुन्या म्युझिक कंपनीने या कठीण काळातही स्वतःसाठी एक नवीन मार्केट शोधलं आणि इनोव्हेशन करून अभूतपूर्व यश मिळवलं. मित्रांनो, या कंपनीचं नाव आहे सारेगामा आणि त्यांच्या नवीन प्रॉडक्टच नाव आहे कारवा, सारेगामा च कारवा हे उत्पादन म्हणजे नवीन आणि जुन्या चा अनोखा संगम आहे. करावा हा ऑटो डिजिटल आडियो प्लेयर आहे, आतून डिजिटल असला तरी बाहेरुन तो जुन्या रेडिओ सारखाच दिसतो. हा नुसता म्युझिक प्लेअर नाही तर यामध्ये 5000 जुनी गाणी सुद्धा देण्यात आलेले आहेत. ही गाणी कलाकार आणि गाण्याच्या मोड्सप्रमाणे ऐकता येतात तसेच यामध्ये अमीन सयानी यांच्या गाजलेल्या गितमाला कार्यक्रमाचे सर्व भाग देण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत एफएम रेडिओ, यूएसबी, ब्लूटूथ म्युझिकचा पण पर्याय देण्यात आलेला आहे. गेल्यावर्षी मे 2017 ला सारेगामा कारवा बाजारात आले, तेव्हा असे उत्पादन आजच्या जगात चालेल का? हा प्रश्न सर्वांच्याच तोंडावर होता. सहा हजार रुपये किंमत असलेल्या कारवा चे पहिल्या वर्षात एक लाख पिसेस विकण्याचे कंपनीचे लक्ष होते. प्रत्यक्षात मात्र सारेगामा ने पहिल्याच वर्षी 360000 पिसेस विकले म्हणजेच साधारण 216 करोडचा बिझनेस फक्त एकट्या कारवा या म्युझिक प्लेअर केला. जुनी गाणी ऐकवून ग्राहकांना गतकाळातल्या जून्या आठवणीत घेऊन जाणारं आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या रेडिओ सारखा दिसणारा हे उपकरण एवढं चालतंय की मार्केटिंग च्या इतिहासात याचं नाव नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. सारेगामा ने प्रॉडक्ट नक्की कस बनवलं आणि कारवाच्या यशामागे काय स्ट्रॅटेजी होत्या ते आपण यामध्ये बघणार आहोत. बाजाराचा अभ्यास : विक्रम मेहरा यांनी 2015 मध्ये सारेगामा चे एमडी म्हणून काम सुरू केलं तेव्हाची गोष्ट. सारेगामा हा ब्रँड तरुणाईला भावेल यासाठी नवीन काहीतरी करण्याचे कंपनीने ठरवले. त्यासाठी काय काय करता येईल हे पाहण्यासाठी विक्रम मेहरा यांनी द वॉर्म या एजेन्सी सोबत मार्केट रिसर्च हाती घेतली. या रिसर्चच्या संधर्भात कानपूर येथे गेले असताना त्यांना एका वयस्कर बाईने सांगितलं कि बेटा विविध भरती चे जुने दिवस फार छान होते, पुढे कोणत गाणं लागणार आहे ते माहित असायचं त्यामुळे प्रत्येक गाणं ऐकायला एक वेगळाच आनंद असायचा. आता मात्र टेकनॉलॉजीमुळे सगळंच मिरज झालंय. तेव्हा विक्रम मेहरा यांच्या लक्षात आलं की, कॅस्सेट आणि सीडी शी जुळून घेतलेल्या एका जुन्या पिढीचा संगीतातील नातं तुटलंय, कारण स्मार्टफोन आणि म्युझिक अँप्स काही त्यांना जमत नाहीत. या एका इन्साईटवरून त्यांनी तरुणाईचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवला आणि चाळीस वर्ष आणि अधिक वय असणाऱ्या सेगमेंटवर फोकस करायला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा नव्याने मार्केट रिसर्च करून आणि नंतर अनेक मिटींग्स नंतर कारवा हे प्रॉडक्ट आकार घेऊ लागलं. उत्पादनाची घडण : कारवा हे जुन्या ट्रांझिस्टर रेडियो सारखा दिसणारा उपकरण असेल हे ठरलं. तसेच गाणी गायकांचे नावानुसार मांडावित हे ही ठरवलं. विक्रम मेहरा त्यांच्या जुन्या बॉसच्या एका पार्टी मध्ये गेले होते, तिथे त्यांच्या बॉसने सांगितलं की एफएम रेडिओ पण ॲड करा, कारण रेडिओ ऐकला सगळ्यांना आवडतं पण कार शिवाय इतर ठिकाणी गाणी ऐकताच येत नाही, गाणी नेमकी किती आणि कोणती असावीत याबाबत तर फारच चर्चा झाली, सारेगामा च्या एवढ्या वर्षांच्या गाण्यांचा डेटाबेसचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि वेब डेटा वापरून अनालिसिस करण्यात आला आणि मग ५००० गाणी ठरवण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रसिद्ध अमीन सयानी यांच्या गीतमाला या कार्यक्रमाचे भाग ऍड करण्याचा सल्ला विक्रम यांच्या वडिलांनीच दिला. त्यांनी सांगितलं की, किशोर कुमार वगैरे ठीक आहे पण आमच्या काळात खरे सुपस्टार अमीन सयानी हेच होते. गीतमाला चे सर्व अधिकार सारेगामा कडे आधीपासूनच होते त्यामुळे ते ऍड करण देखील सोपं होत. अमीन सयानी यांचा नुसता आवाज जरी ऐकला तरी जुनी लोक भारावून जातात. आता हे उपकरण अतिशय सोप असावं म्हणून मुद्दाम त्यात कमीत कमी बटन दिले आहेत. टच स्क्रीन न देता जुनी रेडिओ सारखी गोल बटने देण्यात आलेली आहेत. करावा उपकरण जरी वयस्कर लोकांसाठी होतं तरी ते स्वतःहून खरेदी करणार नाहीत हे सारेगामाच्या टीमला देखील माहीत होतं म्हणून तरुणांना देखील भावतील असे ब्लूटूथ, यूएसबी असे फीचर्स देखील यामध्ये दिलेले आहेत. पण हे फीचर्स कारवाच्या उजव्या बाजूला दिलेले आहेत. समोरून ते दिसणार नाहीत या खुबीने ते लपवले गेले आहेत. विपणन आणि वाटप : कारवा उपकरण कितपत चालेल याचे अनुमान करता येणं कठीण होतं, म्हणून सारेगामा ने सुरुवातीला मार्केटिंग वर खर्च न करण्याच ठरवलं. सारेगामा च युट्युब चॅनेल चांगला चालू होता, त्यामध्ये व्हिडिओ दरम्यान त्यांनी आपल्या जाहिरातीत आपली सुरुवात केली आणि काही रेडिओ ऍड केल्या. पहिले वर्षभर म्हणजे साडेतीन लाख उपकरणांची विक्री करेपर्यंत कारवा ची टीव्ही जाहिरात बनवली गेली नव्हती, त्यानंतर मे 2018 मध्ये सारेगामा ने पहिल्यांदा कारवासाठी टीव्ही ऍड चालू केली. असं म्हणतात की, एखादं गाणं आपल्याला आवडतं कारण त्या आपल्या सोबत घडलेल्या एखाद्या घटने सोबत किंवा भावने सोबत जोडलं गेलेलं असतं, असं गाणं ऐकताना मन आपोआप आठवणीत रमतो आणि गतकाळाची हुरहुर लागते. बरोबर हीच थीम सारेगामा कारवाच्या मार्केटिंग मध्ये वापरण्यात आली आहे. हे प्रॉडक्ट पाहताना, वापरताना आणि ऐकताना जुन्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अगदी करावामध्ये वापरण्यात आलेले स्पीकर्स पण आधुनिक काळातले सुस्पष्ट आवाज देणारे वापरलेले नाहीत. जुन्या रेडिओचे असायचे त्यापेक्षा थोडे चांगले स्पीकर्स वापरण्यात आले आहेत.एवढा बारीक सारीक विचार या प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट मध्ये करण्यात आला होता. कारवा ची पोझिशनिंग एक भेटवस्तू अशी करण्यात आली. आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना भेट देण्यासाठी एक उत्तम उपाय अशी मार्केटिंग तरुणांना टार्गेट करून करण्यात आली. त्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. यासाठी सारेगामा ने बनवलेली ऍड तर अप्रतिम आहे. पाच मिनिटांची ही ऍड बघितलीत तर कारवा विकत घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. कॉपी राईटमुळे मी येथेही जाहिरात दाखवत नाही पण खालील लिंक देतो आहे, ती जाहिरात अवश्य बघा. कॅस्सेट्स आणि सीडीचा जमाना गेल्यापासून सारेगामा चा रिटेल मार्केट आणि डिस्ट्रिब्युशनशी संबंध तुटला होता, कारवा लाँच करण्याआधी वर्षभर पडद्यामागे डिस्ट्रिब्युशन सुधारण्यासाठी काम सुरू होते. चार हजार दुकानांमध्ये हे उत्पादन पोहोचवले गेले. तरुणांना विकत घेण्यासाठी ऑनलाइन आणि इतरांना विकत घेता यावे यासाठी ऑफलाईन अशी दोन्हीकडे रिटेल स्ट्रॅटेजी काम करत होती. केवळ एका वर्षातच 200 करोडचा पल्ला गाठणारे हे उत्पादन मार्केटिंगचा इतिहासातील एक जबरदस्त केसस्टडी ठरले आहे. सारेगामाने आपल्याकडे आधीपासूनच असलेल्या गाण्यांना नव्या प्रकारे विकले त्यामुळे त्यांची कॉस्ट खूपच कमी झाली आणि जास्तीत जास्त चांगला फायदा त्यांना यामधून मिळवता आला. एवढ्यावरच न थांबता आता एक्सपोर्टसाठी आणि प्रादेशिक भाषा यांवर फोकस करून कारवा चे नवीन प्रकार बाजारात आणण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे. सारेगामा कारवा अशाप्रकारे अतिशय विचारपूर्वक बनवले गेलेले ग्राहकांची लपलेली भावनिक गरज ओळखून बनवले गेलेले, कमी खर्चात बनवले गेलेले आणि अतिशय कमी मार्केटिंग करून बाजारात आणलेले उपकरण आहे. मराठी उद्योजकांना यातून काय शिकता येईल ? मित्रानों सारेगामा च्या केस स्टडी म्हणून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, सगळ्यात पाहिलं म्हणजे ग्राहकांची योग्य गरज ओळखणे. त्यासाठी मार्केट रिसर्च महत्त्वाचे आहे, दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट सेगमेंटेशन. सगळ्यांनाच सगळं काही विकता येत नाही, तेव्हा आपला ग्राहक वर्ग नीट ओळखून त्यांच्यासाठी उत्पादन बनवण्यात जास्त गरजेचा आहे. ग्राहकांची भावनिक गरज ओळखून इमोशनल मार्केटिंग करणे आणि प्रॉडक्ट इतकं चांगलं बनवणं की ते स्वतः स्वतःची जाहिरात करेल असे काही महत्वाचे धडे आपल्याला सारेगामा कारवा या केस स्टडी मधून नक्कीच शिकता येतील. मित्रांनो मला खात्री आहे सारेगामा कारवाची ही युनिक केसस्टडी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि यातून तुमचा उद्योग पुढे नेण्यासाठी तुम्हाला बऱ्याच कल्पना देखील सुचल्या असतील. मित्रांनो, भारतामधील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड कोणता असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर कदाचित तुमचे उत्तर Samsung असे असेल. पण नुकताच Xiaomi या कंपनीने हा बहुमान पटकावला आहे. मित्रांनो Xiaomi या केवळ ४ वर्षांपूर्वी भारतात आलेल्या कंपनीने Samsung आणि Apple सारख्या बलाढ्य कंपन्यांना मागे टाकण्याचा पराक्रम करून दाखविला. ही आश्चर्याची बाब आहे. फक्त ४ वर्षात Xiaomi ने हे यश कसे मिळविले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. Xiaomi या कंपनीची सुरुवात एप्रिल २०१० मध्ये चीन मध्ये झाली. "ली ज्यून" यांनी इतर सात लोकांबरोबर या कंपनीची सुरुवात केली. खरंतर Xiaomi ही एक इंटरनेट कंपनी आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असलेले MiUi हे फोनचे सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यासाठी फोन रूट करणे गरजेचे होते त्यामुळे बरेच जण इच्छा असूनही MiUi वापरू शकत नव्हते. म्हणून Xiaomi ने MiUi आधीपासूनच असलेले फोन बाजारात लाँच केले. केवळ ३ वर्षातच Xiaomi भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बानू शकली यामागे Xiaomi च्या बऱ्याच स्ट्रॅटेजिज आहेत. चला तर मग बघूया काय आहेत Xiaomi ला यशस्वी बनविणाऱ्या स्ट्रॅटेजिज. सध्या अॅमेझॉनचे जेफ बेझॉस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
मित्रांनो बेझॉस यांची संपत्ती आहे १४३०० करोड डॉलर्स दुसर्या क्रमांकावर आहेत मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस. बिल गेटस यांची संपत्ती आहे ९३३० करोड डॉलर्स. म्हणजे या दोघांच्या संपत्तीमधील फरक आहे ४९७० करोड डॉलर्स. आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती आहे ४२३० करोड डॉलर्स. याचाच अर्थ जगातील पहिल्या आणि दुसर्या क्रमांकामध्ये जो फरक आहे त्याहूनही कमी संपत्ती मुकेश अंबांनींची आहे. अर्थात या आकड्यांमधील फरक सांगण्यासाठी काही मी ही पोस्ट लिहित नाही आहे मला इथे वेगळाच मुद्दा मांडायचा आहे १. जेफ बेझॉस आणि बिल गेट्स हे दोनीही स्वकर्तुत्वा वर उभे राहिले आहेत. त्या दोघांनीही शून्यापासून सुरुवात केली होती. मुकेश अंबांनीं प्रमाणे त्यांना वडिलोपार्जित व्यवसाय मिळाला नव्हता. तेव्हा माझ्या आई बाबांनी पैसा कमावला नाही म्हणून मला व्यवसाय करता येत नाहीये, किंवा त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो बिझनेस करतोय आणि माझ्याकडे नाही म्हणून मला जमत नाही ही कारणे जगाला आणि मुख्य म्हणजे स्वतःला द्यायची सोडून द्या. २. मुकेश अंबांनी काळाची पाऊले ओळखून बरोबर पुढे जात आहेत. डेटा हाच एकमेव मोठा बिझनेस आहे हे ओळखूनच त्यांनी "जिओ" ची सुरुवात केली आहे. अॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स ई-कॉमर्स क्षेत्रात उतरत आहेत. तेव्हा पुढील १०-१५ वर्षात अंबांनी बेझॉसच्या पुढे किंवा जवळपास जाऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच वडीलोपार्जित आहे आणि चांगला चाललं आहे म्हणून आहे ते तसच पुढे चालवण्यात धन्य मानू नका. नविन संधी काय आहेत ते शोधून त्यावर उडी मारायला तयार रहा. त्यासाठी सतत अभ्यास करत राहिलं पाहिजे. तुम्ही नव्या संधी शोधण्यासाठी काय करताय ? ३. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा - मुकेश आणि अनिल अंबांनी यांच्या अंतर्गत वादामुळे जेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीज दोन भावांमध्ये वाटली गेली तेव्हा टेलिकॉम व्यवसाय अनिल अंबांनी यांच्याकडे गेला. करारानुसार दहा वर्षे मुकेश अंबांनी यांना टेलिकॉम उद्योगात येता येणार नव्हते. त्यामुळे तसं म्हंटलं तर जिओ यायला दहा वर्षे उशिरच झाला. अन्यथा एव्हाना कदाचित मुकेश अंबांनी हे संपत्तीचं समीकरण बदलवू शकले असते. इतिहासामध्ये अंतर्गत कलहामुळे अपिरीमित हानी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, परंतु आपण त्यातून काही शिकत नाही. आपल्या मित्रमंडळींवर आणि नातेवाईकांवर विश्वास ठेवून सलोख्याने गोष्टी सोडवता आल्या पाहिजेत. मित्रांनो, हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि लेख आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा ! ------------------------------------------------------------------ आता नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर देखील उपलब्ध आहे. नेटभेट चा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://chat.whatsapp.com/8yooBdNGgI05Ud12Hda80Q ---------------------------------------------------------------------------------------------- ======================================= आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही. नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक मराठी कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत. अधिक माहितीसाठी भेट द्या - http://www.netbhet.com मातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा ! नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे मराठी ऑनलाईन कोर्सेस - - वेळ व्यवस्थापन - https://goo.gl/VGDU5u - युट्युबच्या माध्यमातून पैसे कमावण्याची कला ! - https://goo.gl/4wFkwo - मायक्रोसॉफ्ट एक्सेल कीबोर्ड शॉर्टकट्स - https://goo.gl/yJFwcX - जीमेलचा प्रभावी वापर - https://goo.gl/cCkQu9 - फेसबुकसाठी महत्वाच्या टिप्स - https://goo.gl/UVcFu3 - उद्योगवाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञान ! - https://goo.gl/ZNNj4E - ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती ! - https://goo.gl/sSP59a - फोटोशॉप - बेसिक ते अॅडवान्स - https://goo.gl/QCTbVL - कोरल ड्रॉ - बेसिक ते अॅडवान्स - https://goo.gl/Ldkntv - मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट - https://goo.gl/xxRrNE - मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट - https://goo.gl/hCTnyA - मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट - https://goo.gl/C542j3 - वेबसाईट बनवायला शिका ! - https://goo.gl/CwZdey - व्यवसाय वाढीसाठी Linkedin मधील डावपेच ! - https://goo.gl/DMxYmp - सोशल मिडीयाचा प्रभावी वापर ! - https://goo.gl/sSe8oY - मुलाखतीची तयारी - https://goo.gl/iMB9NG - उद्योजकांनो जागे व्हा ! - https://goo.gl/8jkqqZ ======================================= धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया ! नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स www.netbhet.com जबरदस्त मराठी मोटीव्हेशन - जिंकणं आणि पहिलं येणं यातील फरक ! २९ ऑगस्ट २००४ अथेन्स ओलिम्पिक साली वेनडरले-डी- लिमा हा ब्राझीलचा धावपटू मॅरेथॉन शर्यतीत सर्वात पुढे होता. तो ज्या प्रकारे धावत होता, सुवर्ण पदक तोच जिंकणार he निश्चित होत. अजून शर्यत पूर्ण व्हायला ६ किलोमीटर अंतर बाकी होते. पण तितक्यात एक माथेफिरू प्रेक्षकाने मध्येच त्याला शर्यतीतून बाहेर ढकललं. त्यातून सुटका करून परत शर्यतीत येईपर्यंत महत्वाचा वेळ डी- लिमाने गमावला होता. आणि तितक्यात दिन स्पर्धक डी-लिमाच्या पुढे निघून गेले. डी-लिमाने शर्यत तिसऱ्या क्रमांकावर पूर्ण केली. शर्यत पूर्ण करताना मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. ते हास्य एका खेळाडू वृत्तीचे उत्तम उदाहरण होते. पुढे २०१६ मध्ये ब्राझील ऑलिम्पिकच्या उदघाटनाची मशाल डी-लिमाच्या हाती देउन त्याचा उचित सम्मान केला गेला. फेसबुकने सोशल मिडीयाचा पुरता कब्जा घेतलाय, फेसबुक.कॉम सोबतच व्हॉटस अँप आणि इंस्टाग्राम या दोन मोट्या सोशल प्लॅटफॉर्मवर नियंत्रण मिळविल्यानंतर तर मार्क झुकरबर्ग सोशल मिडीया साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट बनला आहे. मार्क झुकरबर्गच्या या सिंहासनाला धक्का लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्याला फारसे यश आले नाही. पण मित्रांनो एक अशी कंपनी आहे जी फेसबुकला मागे टाकू शकते. किंबहुना २०१७ साली एकदा मार्केट व्हॅल्यू मध्ये त्या कंपनीने फेसबुकला मागे टंकलेही होते. मिडीया पासून दूर राहणाऱ्या या कंपनीबद्दल तुम्ही कदाचित कधिकच ऐकलेही नसेल हि होऊ शकते. मित्रांनो मी ज्या कंपनीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे टेनसेंट. काय नव्हतं ऐकलं ना या कंपनीचं नाव कधी? त्याला कारणही तसाच आहे. टेनसेंट हि कंपनी आणि तिचं उत्पादन सध्या फक्त एकाच देशात वापरली जात आहेत आणि तो देश आहे आपला शेजारचा "चीन ". विचार करा जी कंपनी फक्त एका देशात ऑपरेट करून एवढी मोठी होऊ शकते ती जर जगाच्या बाजारपेठेत उतरली तर किती अवाढ्य आणि किती अजस्त्र होऊ शकते ? टेनसेंट ही सध्या जगातील नववी मोठी कंपनी आहे आणि अँपल, गुगल, अमेझॉन आणि फेसबुक नंतरची पाचवी मोठी इंटरनेट कंपनी आहे. १९९८ साली सुरु झालेली ही कंपनी फक्त २० वर्षात एवढी मोठी कशी झाली याचा आढावा आपण आज या व्हिडीओ मध्ये घेणार आहोत. आधी घरट्यातून बाहेर तर पडा. स्वतःवर विश्वास ठेवलात तर तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. शेवटी तोच पक्षी उडायला शिकतो, जो पडण्याची भिती न बाळगता घरट्यातून बाहेर पडतो. मित्रांनो दररोज आपण एक ग्राहक म्हणून दुकानांमध्ये, मोठमोठ्या मॉल्समध्ये खरेदी करत असताना अनेक ब्रॅण्ड्सची निवड करत असतो. अगदी साधा पांढरा शर्ट जरी विकत घ्यायचा असला तरी त्यामध्ये अनेक ब्रॅंड्समुळे आपण गोंधळून जातो किंवा त्याहीपेक्षा साधं उदाहरण म्हणजे मिनरल वॉटर . अगदी पाण्याचेही अनेक ब्रँड्स असतात, उत्पादन बहुतांशी सारखंच असलं तरी प्रत्येकाच्या किमती वेगवेगळ्या असतात. ग्राहकांना ही चॉईस सुखावणारी असते. परंतु मित्रांनो बिझनेसच्या दृष्टीने बघितलंत तर चॉईस हे एक मोहजाल आहे. बऱ्याचदा अनेक मोठ्या कंपन्या आपलेच अनेक ब्रँड्स market मध्ये उपलब्ध करून देतात. ग्राहकांना याबाबतीत माहितीही नसते आणि आपल्याला निवडीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत या भ्रमात ते असतात. आणि ग्राहकांना भ्रमात ठेवून अनेक कंपन्या भरपूर नफाही कमावतात. मित्रांनो आज मी तुम्हाला अशाच एका कंपनीबद्दल सांगणार आहे. या कंपनीचं नाव बऱ्याच जणांना माहित नाही पण त्यांच्या जगप्रसिद्ध ब्रँड्सने सारं जग काबिज केलं आहे. चष्मे आणि गॉगल्स बनवणाऱ्या या कंपनीचं नाव आहे लक्झॉटीका. चला तर बघूया लक्झॉटीकाने जगभरातील चष्म्याचा व्यवसाय कसा एकहाती ठेवला आहे ते पाहूया. बिझनेस कसा करावा हे एलॉन मस्क कडून शिकूया ! एलॉनचा बिझनेस आणि त्यामागच्या स्ट्रॅटेजी समजावून सांगणारी ही बिझनेस गाथा नेटभेटच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे. आपण या जगात येताना "काहीच" घेऊन येत नाही आणि तसेच या जगातून जातानाही "काहीच" घेऊन जाणार नाही. नम्र राहूया, देवाचे आभार मानूया ! २००४ साली विजय शर्मा यांची १९७ कॉम्युनिकेशन नावाची कंपनी होती. ती त्यावेळी जास्त प्रॉफिट मध्ये नव्हती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या कंपनी मध्ये सीईओ या पोस्टवर फक्त ३००००/- रुपये इतक्या पगारावर पार्ट टाइम नोकरी केली. आणि त्यातून त्यांनी आज पेटीएम नावाचा ब्रँड चालू केला. संस्थापक "विजय शर्मा" यांची प्रेरणादायी कथा ! ५ गोष्टी ज्या यशस्वी व्यक्ती कधीही बोलत नाही . आपण पुष्कळवेळा पाहतो कि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींपैकी काहीजण आयुष्यात फार पुढे निघून गेलेले असतात . तर काहीजण आहेतत्या परिस्थितीतच जगत असतात .मग एखादी यशस्वी व्यक्ती आणि अयशस्वी व्यक्ती यामध्ये नेमका काय फरक असतो ............ मित्रांनो, तो फरक आहे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत म्हणजेच (Mindset ) याच एका गोष्टीमुळे यशस्वी व्यक्ती इतरांना अशक्य वाटणार्या गोष्टी करु शकतात . या व्हीडीओ मध्ये मी तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या यशस्वी व्यक्ती कधीहे करत नाही, आणि बोलतसुद्धा नाही. हो तुम्ही या पाच गोष्टी यशस्वी लोकांकडून कधीही ऐकणार नाही कारण त्यांच्या मनातच या गोष्टी कधीही येत नाहीत. मित्रांनो, तर मग नीट लक्ष देऊन पहा, मी तुम्हाला या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते सांगणार आहे |